zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra टेरर नव्हे वर्ल्ड ट्रेडचा जमाना
टेरर नव्हे वर्ल्ड ट्रेडचा जमाना

टेरर नव्हे; वर्ल्ड ट्रेडचा जमाना!!

सद्यस्थितीत आंतराष्ट्रीय पातळीवर मोठा वाद निर्माण करणारे लोकर्बी बॉम्बहल्ला प्रकरण

कॅन्सरग्रस्त मॅकग्राही तीनच महिने जगणार असल्यामुळे त्याची मुक्‍तता करणे योग्य आहे?

आपल्याकडे भाजप आणि रा. स्व. संघाच्या नेत्यांचा जिनांविषयक निवेदनांनी राजकारण, इतिहास आणि मीडियांच्या रखवालदारांना एक गरमागरम विषय मिळाला आहे. बरोबर याच कालावधीच्या आसपास घडलेल्या एका महत्वाच्या आंतराष्ट्रीय घटनेची आपण विशेष नोंद घेतलेली नाही.

अमेरिका, युरोप आणि मध्य पुर्वेतील देशांमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये हा नाट्यात्मक प्रसंग आणि त्याच्या अनुषंगाने जे वलय-वर्तुळ निर्माण झाले आहे तो केंद्रस्थानी आहे. अमेरिकेचा कट्टर शत्रू असलेल्या लिबियाचा भूतपूर्व गुप्तहेर अधिकारी तसेच लिबियन अरब एअरलाइन्सचा मुख्य सुरक्षा अधिकारी मॅकग्राही प्रथमदर्शनी भले एखाद्या संस्थेचा उच्चपदस्थ वाटत असला तरी प्रत्यक्षात अमेरिकासहीत मोठ्या प्रमाणावर पश्चिमी देशांच्या दृष्टीने थंड डोक्याने काम करणारा अतिक्रूर भेजेबाज दहशतवादी आहे.

मॅकग्राहीमुळे सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीची गोष्ट वाचण्यापूर्वी दहशतवादाचे आंतराष्ट्रीय जाळे आजच्या एवढे सक्रीय नव्हते, त्यावेळच्या एका खतरनाक प्रकरणाची झलक पाहू या: बुधवार, २१ डिसेंबर, १९८८ रोजी अमेरिकच्या पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेजच्या फ्‍लाइट १०३ विमानाने लंडन्च्या हिथ्रो विमानतळावरून न्यूयॉर्कसाठी आकाशाकडे झोप घेतली होती. विमान स्कॉटलंडच्या दक्षिणेला असलेल्या लोकर्बी गावावरून उडत असताना एकाएकी विमानाच्या ठिकर्‍या उडाल्या होत्या. विस्फोटामुळे आगीचा लोळ उठून विमान लोकर्बी गावावर कोसळले होते. यामुळे या प्रकरणाला ’लोकर्बी बॉम्बिंग’ असे म्हटले जाते. विमानात असलेले २४३ प्रवाशी, १६ कर्मचारी तर विमान हवेत असतानाच होरपळले गेले होते; पण पेटते अवशेष लोकर्बी गावात पडल्याने ११ ग्रामस्थाना प्राण गमवावा लागला होत आणि पन्नासहून अधिकांना गंभीर जखमा झाल्या होत्या. या बोईंग ७४७-१२० विमानाचे नाव ’क्‍लीअर मेड ऑफ दसी’ होते. जागतीक व्यापार केंद्रावरील दहशतवादी हल्यानंतर अमेरिका आणि जगात हाहाकार माजला होता; तशीच लोकर्बी बॉम्बिंगमध्ये प्राण गमावलेल्यांमध्ये अधिकतर अमेरिकन असल्याने आंतरराष्ट्रीय खळबळ माजणे स्वाभाविक होते. भारतात न्यूज चॅनलचा जमाना नसल्याने त्यामुळे आपणास लोकर्बी सनसनाटीचा अंदाज येऊ शकला नाही. त्या काळात अमेरिका आणि लिबियाचे संबंध अति तणावाचे होते. क्‍युबाचे कॅस्ट्रो आणि लिबियाचे गडाफी दबावापुढे न झुकल्यामुळे अमेरिकेचे नाक कापले गेले होते. लोकर्बी बॉम्बिंग एवढ्या शिताफीने घडवून आणले होते की तो तांत्रिक त्रुटींमुळे झालेला अपघात आहे की दहशतवादी कृत्य आहे हेच निश्चित होऊ शकत नव्हते याचमुळे लिबियावर अमेरिकेच्या एफबीआय गुप्तहेर संस्थेचा संशय होत असला तरी ठोस पुरावा मिळत नव्हता. अन्यथा त्याचवेळी अमेरिकेने लिबियावर युध्दाप्रमाणे एखादा हल्ला चढविला असता. घटना स्कॉटलंडच्या भूमीवर घडली होती म्हणून स्कॉटलंड पोलीस आणि अमेरिकेची एअरलाइन आणि प्रवासी असल्याने एफबीआय त्याच्या बरोबर तपास कार्यात सामील झाली होती. युनायटेड किंग्डमच्या इतिहासात सर्वाधिक दिर्घकाळ चाललेल्या फौजदारी खटल्याचा निकाल १३ वर्षानी म्हणजे २००१ साली लागला. या काळात १५ हजार साक्षीदारांच्या जबान्या नोंदविल्या गेल्या होत्या. तसे तर तीन वर्षातच म्हणजे १९९९मध्ये सबळ पुराव्यापायी चौकशीसाठी मॅकग्राहीला सोपविण्यास नकार देताच, संयुक्‍त राष्ट्रसंघाने लिबियावर पश्चिमी देशांकडून आर्थिक प्रतिबंध लादण्याची धमकी दिल्यावर गडाफीला झुकावे लागले होते. या धमकी आधीच अमेरिका व ब्रिटनसहित काही देशांनी तर या प्रतिबंधाच्य प्रक्रियेला सुरुवातही केली होती. गडाफी त्याच्या समर्थक देशांमुळे संयुक्‍त राष्ट्रसंघात मागे हटण्यास नव्हता. शेवटी या प्रकरणाची कार्यवाही नेदरलॅंडसारख्या तटस्थ राष्ट्रात करण्यात यावी यावर शिक्कामोर्तब झाले. ही अट गडाफीने मान्य केली आणि मॅकग्राहीला सोपविण्यात आले. ३१जानेवारी, २००१ रोजी मॅकग्राहीला २७ वर्षे शिक्षा झाली; आणि फलियाहीची निर्दोष मुक्‍तता करण्यात आली. त्यानंतर मॅकग्राहीने युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राइटस्‌, स्कॉटिश रीव्यू कमिशनसारख्या काही संस्थांकडे निर्दोषात्वाचे अपील केले होते; पण तो स्कॉटलंडच्या ग्रीनोक तुरुंगातून आपली सुटका करुन घेऊ शकला नाही. असे करीत करीत आठ वर्षाचा काळ लोटला आणि अचानक त्याची प्रकृती बिघडली. वैद्यकीय अहवालात मॅकग्राहीला सर्वांग पसरलेला कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले. ब्रिटनच्या निष्णात डॉक्‍टरांनी मॅकग्राही तीन महिन्यांहून अधिक काळ जगणार नसल्याचा लिखित अहवाल दिला. २० ऑगस्ट २००९ रोजी मॅकग्राहीच्या दयेच्या अर्जावर विचार करून वैद्यकीय अहवालाच्या आधारे ब्रिटनच्या संमतीने स्कॉटलंड सरकारने मॅकग्राहीला मुक्‍त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि एवढेच नव्हे तर २२ ऑगस्ट २००९ रोजी सुरु होणार्‍या रमझानपुर्वीच तो लिबियाला पोहोचला पाहिजे असे अधिसुचनेद्वारे संबंधित यंत्रणेला कळविण्यात आले. अमिरिका तर स्कॉटलंड आणि ब्रिटन सरकारांच्या अशा असाधारण निर्णयाने स्तब्ध झाली होती. २७० निरपराध लोकांचे बळी घेणार्‍याचे आयुष्याचे शेवटचे तीन महिने तुरूंगात आजारपणात घालवून मृत्यू ओढवला तर त्या वावगे का वाटावे? लिबियन गुप्तहेर एजन्सीने २००३ मध्ये एक पत्र लिहून संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीला लोकर्बी बॉम्बिंग प्रकरणात आपला हात असल्याचे मान्य केले होते. कर्नल गडाफी आणि लिबियन एअरलाइन्सचा मुख्य सुरक्षा अधिकारी ए.ए.ए. मॅकग्राही यांच्या ’मास्टर माईंड’ची ही निर्मिती होती. अमेरिकेच्या नौकादलाने १९८०च्या दशकात लिबियाच्या सागरी नियंत्रणाखालील ’गल्फ ऑफ सिद्रा’ प्रदेशात घुसखोरी करून लिबियाची जहाजे, सैन्यावर वेळोवेळी हल्ले करून जीवितहानी केली होती. लिबियाची लढाऊ विमाने, दळणवळण जहाजाना उडवून देण्यात आले होते. एका हल्यात कर्नल गडाफी यांची दत्तक मुलगी हन्ना गडाफी ठार झाली होती. विशेष करून लिबियाच्या सागरी हद्दीत अमेरिकेच्या जहाजांची आणि नौकादलाची घुसखोरी तसेच जीवित-वित्तहानीमुळे हैराण झालेल्या गडाफी आणि मॅकग्राहीने अमेरिकेला धडा शिकविण्यासाठी विमान उडवून देण्याचे षडयंत्र रचले होते. जर याच न्यायाने भयंकर दहशतवाद्याने वैदकीय अहवालाधारे संयुक्‍त राष्ट्रसंघ वा ज्या त्या देशाला मुक्‍त करण्याचे आवाहन केल्यास तर जगात कोलाहल माजल्याशिवाय राहणार नाही. याचे कारण म्हणजे अमूक दिवस वा अमूक महिनेच दहशतवादी जगायचा असेल तर त्याच्या भयानक मेंदूतून नवे षडयंत्र घडविण्याचे कार्य घडतच राहणार आहे. लिबियाचे गडाफी सरकारला मॅकग्राहीला सहकार्य करून लोकर्बी बॉम्बकांड घडविणे महाग पडले होते. संयुक्‍त राष्ट्रसंघाने त्याच्याकडून लिबियाला मिळण्यार्‍या अर्थसहाय्य व अन्य मदतीवर प्रतिबंध लादले होते. अमेरिकेने व्यापारावर प्रतिबंध लादले. लिबिया व्यापार, उद्योग आणि अनुदानरित्या जमीनदोस्त झाला. २००२ मध्ये लिबियाने जर त्याच्यावरील प्रतिबंध उठविल्यास मृतकांच्या कुटुंबाना २.६ अब्ज डॉलर्स मदतीपोटी देण्याची तयारी दर्शविली होति. प्रत्येक कुटुंबाला ३० कोटी रुपये मिळणार होते; पण अमेरिकेने आजवर कडक धोरण अंगिकारले आहे. तटस्थ देशात या खटल्याची कार्यवाही झाली पहिजे यापायी नेदरलॅंडमध्ये खटला चालविण्यास भाग पाडले होते. अधिकृतरित्या तर मॅकग्राहीची सुटका करण्याचा निर्णय स्कॉटलंड सरकारचा आहे; पण पडद्यामागे ब्रिटनचे विद्यमान ब्राऊन सरकारच मोठी भूमिका बजवत आहे. लिबियाशी करोडो डॉलर्सचा धंदा करण्याचा जो सौदा ब्रिटनने केला आहे त्याच्या बदल्यात मॅकग्राहीची सुटका करणे ही लालूचही होती. लिबियावरील आर्थिक प्रतिबंधामुळे ब्रिटनचेच विशेष नुकसान झाले होते. स्कॉटलंडचे सरकार मॅकग्राहीलाच गोवण्याएवढा सबळ पुरावा आमच्याकडे नव्हताच असा बचाव करीत आहे. ’मिसकॅरेज ऑफ जजमेंट’ सारख्या शब्दांचा आधार घेत मॅकग्राहीची मुक्‍तता करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांना मॅकग्राहीच्या सुटकेमुळे धक्का बसला आहे. लोकर्बी बॉम्ब प्रकरणातील मृतांच्या कुटुंबांना नैराश्यातच ढकलले जाईल अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे.

ब्रिटनने मात्र लिबियाच नव्हे; तर आणखी मुस्लिम राष्ट्रांबरोबर तसेच अमेरिकाविरोधी देशांशीही धंदा-व्यापार करण्याचे स्वतंत्र धोरण अवलंबिले आहे. असे राजकीय विवेचन म्हणतात. आता जगात एखाद-दुसरी दहशतवादी घटना घडतच राहणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण देशावर आर्थिक प्रतिबंध लादणे आता कोणालाही पोषक नाही, असा संदेश जगभर परविण्यात येत आहे. अमेरिका सिआए व एफबीआय ज्या देशाविरुध्द आघाडी उघडतात त्या देशावर दहशतवादी घटना लादतात. त्यापायी त्या देशाची आर्थिकरीत्या कोंडी करतात. देशाच्या व्यवस्थेवर आणि सीमेवर कब्जा करतात. असेही ब्रिटन आता जगाला सम्गू लागला आहे. अमेरिका आणि ब्रिटनमधील दरी मॅकग्राहीच्या सुटकेमुळे वाढणार आहे. एक नवेच वैश्विक समीकरण निर्माण होणार आहे. लोकर्बीच्या मुख्य षडयंत्रकारांचा मॅकग्राही आता पर्दाफाश करूनच अल्लाघरी जाईल, असे त्याने जाहीर केले आहे. लिबिया आणि त्याच्या स्वतःच्या कबुलीला तो अमेरिकेचा निर्णय असलेला पुरावा म्हणतो. लोकर्बी प्रकरणाचा भाग-२ जास्त रोमांचक असेल.

---------------------------------------------------------------------------------------------

२७ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या आणि २७० हून अधिक लोकांचे प्राण घेणार्‍या लिबियाच्या मॅकग्राहीची आठ वर्षांनीच तुरूगातून स्कॉटलंड यार्डने मुक्‍तता केल्याने अमेरिकेत खळबळ माजली आहे!!

----------------------------------------------------------------------------------------------

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners



Transaction Processing
Terms and Conditions