Sign In New user? Start here.

शास्त्रीय संगीत तरूणांना आवडू लागलंय

Aanad Bhate interview

शास्त्रीय संगीत तरूणांना आवडू लागलंय

 
 
 

- अमीत इंगोले
( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )

नुकत्याच येऊन गेलेल्या ‘बालगंधर्व’ या चित्रपटातील शास्त्रीय संगीत आज प्रत्येकाच्या ओठांवर सजल्याचं दिसून येत आहे. याच श्रेय जातं ते संगीतकार कौशल इनामदार आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद भाटे यांना. आनंद भाटे यांच्यामुळेच आज तरूणांनाना देखील शास्त्रीय संगीतात रस वाटायला लागलाय. शिकागो येथे होत असलेल्या २०११ च्या अधिवेशनात गायन करणार आहेत. आज २७ वर्षानंतर परत हा योग जुळून आला आहे. त्याबाबत त्यांच्याशी झगमग टीमने साधलेला संवाद....

इतक्या वर्षानंतर परत एकदा त्याच रंगमंचावर तूम्ही गायन करणार आहात कसं वाटतंय? "खरंच खूप आनंद होत आहे की, परत त्याच अधिवेशनात मला गाण्याची संधी मिळत आहे. हा चांगला योग आहे, नॉस्टॅल्जिया आहे असं मी म्हणेन. तेव्हाच्या काही आठवणींबद्दल सांगतांना ते म्हणाले, "त्यावेळी मी आणि माझी फॅमिली तेथे गेलो होतो. ते अधिवेशन ऑर्गनाईझ करण्यासाठी मिसेस हुपरीकर यांनी त्यावेळी खुप कष्ट घेतले होते. त्यांनी माझं गाणं टिव्हीवर ऎकलं आणि मला गाण्यासाठी नेण्याचं ठरविलं. त्यावेळी फार कमी लोकं जायचे तिकडे तरी खूप मोठा इव्हेंट ऑर्गनाईझ करण्यात आला होता..माझ्यासाठी अॅंकच्युअल अधिवेशनाचा खूप छान अनूभव होता. लोकांनी तर तो प्रोग्राम खूप उचलून धरला होता".

तुम्हाला भारतीय आणि भारताबाहेरच्या प्रेक्षकांमध्ये काही फरक जाणवतो का? असं विचारताच ते म्हणाले की, खरंतर रसिकता दोन्हीकडे सारखीच असते. पण दाद देण्याची पद्धत आपल्याकडच्या पेक्षा थोडी वेगळी आहे. आपल्याकडे रसिक गाण्यांच्यामध्ये येणा-या हरकतींना, सुरांना दाद देतात. पण तिकडे अशी दाद कधीच मिळत नाही. गाणं संपलं की मग भरभरून दाद देतात. त्याचबरोबर तिकडे कधी आवडत्या गाण्याची फर्माईश केली जाते का विचारल्यावर ते म्हणाले की, "हो..! कधी कधी केली जाते. जर एखादं त्यांच्या माहितीचं किंवा पर्टीकुलर शैलीचं गाणं असेल तर नक्कीच फर्माईश करतात.

तरूणांमध्ये शास्त्रीय संगीत जास्त लोकप्रिय नसण्याच्या कारणांबद्दल विचारता ते म्हणाले, हल्ली ब-याचप्रकारचं संगीत येतंय. त्यांना एक्स्पोजर चांगलं मिळतंय. पण सध्याच येऊन गेलेल्या ‘बालगंधर्व’ या चित्रपटातील संगीतामुळे अनेक तरूण त्याकडे वळत आहे. बालगंधर्वच्या माध्यमातून नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत तरूणांना आवडू लागलं आहे" असं ते म्हणाले.

या अधिवेशनाचा शास्त्रीय संगीताच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल यावर ते म्हणाले की, "वेगवेगळ्या थिम तयार करून, नवीन प्रयोग करून संगीत सादर केलं गेलं, तर नक्कीच फायदा होईल. तरूणवर्ग त्याकडे आकर्षित होईल"असे त्यांनी सांगितले.

शास्त्रीय संगीताबद्दल तरूणांना काय संदेश द्याल, "ब-याचदा शास्त्रीय संगीत समजण्यास क्लिष्ट आहे, असं म्हट्लं जातं. पण क्लिष्ट असण्याचा विचार डोक्यातून काढून टाकला आणि जर संगीत ऎकलं, तर त्यात नक्कीच गोडी निर्माण होईल. त्यासाठी नेहमी ऎकत राहिलं पाहिजे", असा संदेश त्यांनी तरूणांना यावेळी आमच्याशी बोलतांना दिला.

यावेळी या अधिवेशनात काय खास सादरीकरण करणार याबद्दल बोलतांना ते म्हणाले की, "यावेळी मी आणि मंजूषा पाटील सोबत गाणार आहोत. यात शास्त्रीय संगीताची व्हरायटी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार असून नाट्यगीत आणि नाटकातले अभंग सादर करणार आहोत. नाट्यसंगीताची वाटचाल सांगणारा हा सुरेल कार्यक्रम असणार आहे", ते म्हणाले.

‘बालगंधर्व’ चित्रपटाचे संगीतकार कौशल इनामदार बरोबरच्या अनुभवाबद्दल ते म्हणाले की,"खूपच छान अनुभव होता त्याच्याबरोबर काम करण्याचा. आमच्यासाठी ते एक चॅलेंज होतं. पारंपारिकतेला कुठेही धक्का न लावता. नवीन तंत्रांच्या सहाय्याने ते सजवायचं होतं. डॉल्बीत करायचं होतं. त्यात आदित्य, कमलेश भडकमकर यांनी तो अॅास्पेक्ट खूप चांगला सांभाळला ", असं ते म्हणाले.

शेवटी त्यांना या अधिवेशनाबाबत काय वाटतं ते विचारता त्यांनी सांगितले की, "अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. परदेशात वेगवेगळ्या शहरात ते केल्या जातं. याचा स्कोप खूप मोठा आहे. त्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना एकत्र आणल्याने ऎकमेकात सुसंवाद घड्तो. विविध कला एकाच छताखाली आणल्या जातात हे खूप महत्वाचं आहे", असं त्यांनी बीएमएम अधिवेशनाबद्दल बोलतांना व्यक्त केलं.