Sign In New user? Start here.

बदलत्या समाजाच्या प्रवाहात सामील व्हा: आशिष चौघुले

Aashish Choughule interview

बदलत्या समाजाच्या प्रवाहात सामील व्हा: आशिष चौघुले

 
 
 

- अमीत इंगोले
( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )

बीएमएम सारख्या मोठ्या संस्थेच्या विविध उपक्रमांचा आवाका इतका मोठा आहे की, त्यासाठी अनेक कमिटींची आणि पदांची निर्मिती करण्यात आली आहे. बीएमएमचं असंच एक महत्वाचं पद म्हणजे बीएमएम अध्यक्षपद. दर दोन वर्षांसाठी या अध्यक्षपदाच्या निवडणूकी घेऊन दर दोन वर्षांनी भरवल्या जाणा-या अधिवेशनात नवीन अध्यक्षांची निवड केली जाते. यावेळी २१ ते २४ जुलै दरम्यान शिकागो येथे अधिवेशन आयोजित केले आहे. या पदाच्या दावेदारांनी आपापली उमेदवारीही जाहीर केली असून त्यांनी आपली उद्दीष्ट्य़े आणि ध्येयही तयार केली आहेत. आशिष चौघुले हे अध्यक्षपदाच्या तीन उमेदवारांपैकीच एक आहेत. श्री. चौघुले बीएमएमबरोबर अनेक वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी आत्तापर्यंत बीएमएमच्या अनेक महत्वाच्या जबाबदा-या पार पाडल्या आहेत. या अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या निमित्ताने आशिष चौघुले यांच्याशी चर्चा करून त्यांच्याबद्दल आणि त्यांची उद्दिष्ट्ये जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.....

* बीएमएमबद्दल काय सांगाल?

- उत्तर अमेरिकेतील बीएमएम सारख्या एवढ्या मोठ्या संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षपदासाठी(२०११-२०१३) उमेदवारी जाहीर करतांना मला फार अभिमान वाटतो आहे. कै.विष्णू वद्य, कै.शरद गोडबोले आणि जयश्रीताई हुपरीकर यांच्या पुढाकाराने २५ वर्षापूर्वी स्थापन केलेल्या बॄहन्महाराष्ट्र मंडळाला एक जाज्वल्य आणि अभिमानास्पद परंपरा आहे. महाराष्ट्राची संस्कृती इथं बीएमएमनं चांगल्या रितीने जोपासली आणि वाढवली. गेल्या २५ वर्षात विविध मंडळांनी या संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली आणि या परिवाराला वाढवलं. २५ वर्षापूर्वी लावल्या गेलेल्या बीएमएमच्या रोपट्याचा आज मोठा वटवृक्ष झाला आहे ज्याच्या छायेखाली हजारो मराठी बांधव एकत्र येतात आणि आपल्या संस्कृतीचं जतन करतात.

* तुम्ही बीएमएमसाठी ज्या महत्वाच्या जबाबदा-या पार पाडल्या त्याबद्द्ल काही सांगा?

मी बीएमएमसाठी फक्त एक जबाबदारी पार पाडली नसून अनेक महत्वाची कामे केली आहेत. चार वर्षाच्या माझ्या कार्यकारिणी मधल्या सहभागात treasurer चे काम तसेच भारतीय कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करणे, टॅलेंन्ट ट्रान्सफर कार्यक्रम, बीएमएमचा लोगो तयार करणे तसंच बीएमएमच्या संकेतस्थळाचा विकास करणे आणि बीएमएमच्या विविध उपक्रमांना प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचवणे तथा त्यांना प्रसिद्धी देणे, NAME ची स्थापना अशी अनेक महत्वाची कामे केली आहेत.

* एवढ्या महत्वाच्या जबाबदा-या पार पाडतांना बीएमएमच्या कामकाजाचा चांगलाच अभ्यास झाला असेल?

- हो नक्कीच..! ना नफा ना तोटा तत्वांवर चालणा-या बीएमएम सारख्या संस्थेला आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी एका मोठ्या फायनॅन्शिअल पार्श्वभूमीची अत्यंत गरज असल्याचं मला आढळून आलं. मी बीएमएमसाठी ट्रेजरर म्हणून गेल्या २००७-२००९ या काळात काम पाहिले आहे. यात माझ्या सिटी ग्रुपच्या पार्श्वभूमीचा आणि University of Delaware येथून घेतलेल्या इंटरनॅशनल बिझनेसमधल्या MBA चा बीएमएमची फायनॅन्शिअल परिस्थिती अधिक चांगली करण्यात खूप फायदा झाला. जागतीक मंदीच्या काळातही बीएमएम ठामपणे उभं होतं. उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याने बीएमएमच्या उद्देशाबाबत आणि उपक्रमांबाबतचा मी चांगला अभ्यास केला आहे.