Sign In New user? Start here.

अभिजीत कवठाळकरचं ‘झकास’ पार्श्वसंगीत

अभिजीत कवठाळकरचं ‘झकास’ पार्श्वसंगीत

 
 
 

- संगीतकार अभिजीत कवठाळकरचं मुलाखत

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झकास’ या चित्रपटाच्या संगीताचं खूप कौतुक होतंय. ‘टारगेट’ च्या संगीत दिग्दर्शनानतंर ‘झकास’च संगीत आणि पार्श्वसंगीत यशस्वी करणारा तुरुण कलाकार म्हणजे अभिजीत कवठाळकर. वेस्टर्नबरोबर शास्त्रीय संगीताचा अभ्यास यामुळे त्याच्या प्रयोगात्मक अविष्काराचं स्वरुप म्हणजे ‘झकास’. आगामी ‘मॅटर’ आणि ‘छमिया’ चित्रपटाबrरोबरच त्याच्या हातात बरेच महत्वकांक्षी प्रोजेक्टस आहेत. अभिजीतसोबत साधलेला हा संवाद .....

* ‘झक्कास’ च्या संगीताच्या वैशिष्ट्याबद्दल काय सागशील ?

- या चित्रपटाच्या संगीतासाठी तसंच पार्श्वसंगीतासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. जवळपास दिन महिने या चित्रपटाच्या पार्श्वसंगीतावर आम्ही काम करत होतो. उदाहरण सांगायचं झालं तर चित्रपटात एके ठिकाणी आम्हाला रेट्रो पीस हवा होता, साधारण सत्तरच्या द्शकातला हा पीस आम्हाला हवा तसा मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागले. तो तसा साऊंड क्रिएट करायला आम्हाला फार वेळ द्यायला लागला. शेवट अंकुशला हवा तसा पीस क्लिक झाला, असे आम्हा अनेक चित्रपटाच्या पर्श्वसंगीतासाठी केले. तुम्ही सगळ्या चित्रपटाचं बॅकग्राऊंड ऎकलं तर तुम्हाला जाणवेल की इतर चित्रपटापेक्षा या चित्रपटाचं बॅकग्राऊंड खूप वेगळ आहे आणि हेच या चित्रपटाच यश आहे. असं मला वाटत

* चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आर्वजून पार्श्वसंगीताचा उल्लेख केला जातोय, आत्तापर्यंत तुमच्याकडे या चित्रपटाचा प्रतिसाद कसा पोहोचला आहे?

- प्रतिसाद उत्तमच पोहोचला आहे. याचं सर्व श्रेय अंकुशला जातं. कारण तो फार पूर्वीपासून क्लिअर होता की त्याला संगीत कसं हवंय ते त्याला माहीत होतं. त्यासाठी त्याने वैयक्तिक खूप मेहनत घेतली. जवळपास १०-१५ दिवस आम्ही सोबत होतो. चित्रपटाचं पोस्ट प्रॉड्क्शनचं काम सुरु होतं तेव्हा एके दिवशी अंकुशचा मला फोन आला की मी ‘झकास’ फिल्म तयार केली आहे. फिल्मचा विषय आणि एकंदर कामाविषयी त्याने मला सांगितलं. मात्र या कामासाठी तुला बाहेरगावी यावं लागेल कारण तो एका शुटमध्ये बिझी होता. त्या दिवसापासून मी या प्रोसेसमध्ये इन झालो. आणि मग या कामासाठी मी नांदेडला गेलो. काही दिवस मुंबईला काम केलं. या सगळ्या प्रोसेसमध्ये मी बरंच शिकलो. हे काम मी खूप मनापासून एन्जॉय केलं.

abhijit kavthalkar

* झी टॉकीज आणि अंकुशची फिल्म हे कळल्यावर तुझी पहिली रिअ‍ॅक्शन काय होती?

- सगळ्यांनाच ही फिल्म करायला आवडली असती. झी टॉकीजची फिल्म आणि अंकुश डिरेक्टर अशी फिल्म मला मिळाली. झी टॉकीज आणि अंकुशनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांना मी केलेलं काम आवडलं. पुढेही मला झी टॉकीजचे सिनेमे करायला आवडतील.

* या चित्रपटापुर्वी ‘टारगेट’ चित्रपटासाठी तू संगीत दिलं होतं त्याचा अनुभव कसा होता?

- प्रत्येकजण आपल्या पूर्वीच्या कामातून कहीनाकाही तरी शिकत असतो. मी देखिल माझं काम जेव्हा ऎकतो ते ऎकूनच मी माझं पुढचं काम करत असतो. म्युझिकली मी ज्या चुका केल्या आहेत त्या पुढे टाळण्याचा प्रयत्न करतो. यापूर्वी मी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. मात्र पार्श्वसंगीत म्हणून काम केलेला हा माझा पहिला चित्रपट आहे.

* संगीत दिग्दर्शक म्हणून करियर करायचं असं तू ठरवलं होतं का?

- संगीत दिग्दर्शक म्हणून काम करावं असं मी यापूर्वी ठरवलं नव्हतं. कॉलेजमध्ये पुरुषोत्तम करंडक किंवा इतर स्पर्धासाठी काम केलं होतं. एमएमसीसीत माझ्या कॉलेजमध्ये आमच्या बॅड होता. त्यावेळी आम्हा अनेकवेळा छोट्या मोठ्या कार्यक्रमांना म्युझिक द्यायचो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण चांगल्या ट्युन करु शकतो, आपण केलेल्या ट्युन लोकांना आवडतात त्यातूनच ‘लागली पैज’ हा मिलिदं शित्रेंचा चित्रपट मला मिळाला. चित्रपट मला मिळाला. तो माझा पहिला चित्रपट होता. त्यानंतर मी ‘टारगेट’ केला, ‘मॅटर’ आणि नंतर ‘झकास’ केला. यादरम्यान एक हिंदी अल्बमही केला. यातून संगीतात करियर करण्याचा विचार पक्का झाला.

* संगीताचं रीतसर शिक्षण तू घेतलं आहे का?

- लहानपणी मी थोडं शास्त्रीय संगीत शिकलो आहे. राम बोरगांवकर मंगेशचे बाबा त्यांच्याकडे मी काही दिवस शिक्षण घेतलं आहे. पंडित सी. आर. व्यास यांचे शिष्य त्यांच्याकडे ही मी संगीत शिकलो आहे. पण पूर्वीपासूनच माझा कल वेस्टर्न स्टाईलकडे होता. गिटार, पियानो वाजवायला मला फार आवडतं, आजही मी गिटार शिकतो आहे.

* तुझ्या पुढ्च्या प्रोजेक्टसविषयी काय सांगशील? तुला कोणत्या संगीतकाराचं संगीत आवडतं?

- मला पंचमदांच म्युझिक खूप आवडतं त्याच्यासारखं काम करायला मला आवडेल. चित्रपटांबरोबर मला नाटकांसाठीही काम करायला आवडेल. कॉलेजात असल्यापासुन मी नाटकांना संगीत दिलं आहे. माझी सुरुवात तिथुनच झाली त्यामुळे मला नाटकाला संगीत द्यायला नक्कीच आवडेल. सध्या मी मोतलिंगची ‘छमिया’ फिल्म करतोय. तसंच राजेश कोलनबरोबर काम करतोय. अजुनही बरीच काम करतोय. आता मी केलेलं काम लोकांना आवडेल आणि पुढेही मला काम मिळेल, अशी आशा करुया.