Sign In New user? Start here.

मला नाटकात काम करायलाच जास्त आवडतं..- अमृता सुभाष

Amrut Subhsh interview

मला नाटकात काम करायलाच जास्त आवडतं- अमृता सुभाष

 
 
 

- अमीत इंगोले
( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )

नाटक, मालिक आणि चित्रपट या तिनही माध्यमात यशस्वी ठरलेल्या काही मोजक्याच अभिनेत्री आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे अमृता सुभाष..सध्या अमृता सुभाष चांगलीच चर्चेत आहे ती तिच्या सुपर डुपर हीट ठरलेल्या ‘पुनश्च हनीमून’ या नाटकाने. या नाटकानंतर ती आणखीन प्रसिद्धीस आली ती सध्या जोरात सुरू असलेल्या ‘लव्ह बर्डस’ या नाटकाने. बीएमएमच्या शिकागो येथे होणा-या अधिवेशनात तरूणांना डोळ्यांसमोर ठेवून सद्या गाजत असलेलं, अमृता सुभाष आणि अनिकेत विश्वासराव यांच्या मुख्य भूमिका असलेलं ‘लव्ह बर्डस’ हे नाटक सादर केल्या जाणार आहे. याबाबत अभिनेत्री अमृता सुभाष बरोबर केलेल्या गप्पा....

अमृता सुरवातीलाच नाटकाच्या कन्सेप्टबद्द्ल सांगायला लागली, "या नाटकाचा जॉनर वेगळा आहे. Romantic Suspence Thriller अशी या नाटकाची Concept असून एक प्रेयसी आपलं प्रेम मिळवण्यासाठी काय काय करू शकते. कितपत ती जाऊ शकते, हे यात दाखविण्यात आलं आहे. यातील नायकाची एका अपघातात स्मृती हरवते. त्याला त्याच्या आधीच्या जीवनातील काहीच आठवत नसल्याने त्याला जीवनाची सुरवात पुन्हा नव्याने करायची आहे. तो एका Advt Company चा Partner आहे. त्या Company तून तो परत काम करायला सुरवात करतो. त्यात त्याची Secretary त्याला मदत करते. पण त्याचं कशात मन लागत नाही. तो या विचारांनी अस्वस्थ होतो की, मी कोण आहे? ही Secretary कोण आहे? मी माझ्या पत्नीला दगा तर देत नाही ना? असे अनेक प्रश्न त्याला पडू लागतात. अचानक त्याच्या टेबलवर त्याला पाच लाख रुपयांचे लव्हबर्ड पक्षी विकत घेतल्याचे बील आढळते. तो याचा शोध घ्यायला लागतो आणि त्याच्या आधीच्या जीवनातल्या अनेक गुढ आणि धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागतात. यात त्याची पत्नी त्याला कशी साथ देते ही आणि त्याच्या प्रवासाची ही कथा आहे. या नाटकातील रहस्यमय निती प्रेक्षकांना एकाच जागी खिळवून ठेवते. तसेच यात काही दृश्य Screen वरही दाखविण्यात आले आहेत", असं ती म्हणाली.

या मूळ नाटकात काही बदल करण्यात आले आहेत का? यावर ती म्हणाली की, "अर्थातच..! बदल करण्यात आले आहेत. याआधी हे नाटक येऊन गेलं होतं. यावेळी तरूणांना डोळ्यांसमोर ठेवून गिरीश जोशी यांनी यात काही बदल केले आहेत. या नाटकातील Costume गीता गोडबोले यांनी अतिशय सुंदर आणि आज-कालच्या तरूणांना भावणारे असे केले आहे. मला यातील Costume खूप आवडले", असल्याचे तिने सांगितलं.

भारतात आणि भारताबाहेरील प्रेक्षकांचे काही अनुभव सांगताना ती म्हणाली की, "बाहेर देशात येणारे प्रेक्षकही मराठीच असतात. तेथील नाट्यरसिक खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात नाटकाला. काय होतं की, आपल्याकडे एका नाटकाचे अनेक प्रयोग वेगवेगळ्या शहरात होत असतात. मात्र तिकडे फार क्वचीत नाटकांचे प्रयोग केले जातात. त्यामुळे त्यांचा नाटकाबाबतचा उत्साह फार जास्त असतो. अर्थात हे आपल्याकडेही असतं. पण त्यांच्यात नाटकाविषयी एक वेगळंच Passion असतं. त्यात आपल्या महाराष्ट्रातून कुणीतरी आलंय त्यामुळे तर त्यांना आणखीनच आनंद झालेला असतो. खूप आपुलकीने ते येतात, भेटतात, बोलतात. मला या गोष्टींचा खूप आनंद होतो. खूप बरं वाटतं मनाला...",असं तिने व्यक्त केलं.

आपल्याकडील आणि तिथल्या नाट्यगृहांमध्ये फरक असतो, मग ते कसं Mannage केल्या जातं याबद्दल ती म्हणाली की, "मुळात दडपण वैगेरे काही नसतं, पण व्यावसायिक नाटक करत असतांना वेगवेगळ्या शहरांमधील नाट्यगृहात काम करण्याची आम्हाला सवय असते. या गोष्टींचं दडपण येत नाही पण पूर्वतयारी मात्र करावी लागते. यावेळीही या नाटकासंबंधी गिरीश जोशी तिकडे जाऊन सगळ्या गोष्टींची खातरजमा करून घेणार", असल्याचं अमृता म्हणाली.

‘पुनश्च हमीमून’ आणि ‘लव्ह बर्डस’ नाटकांच्या यशस्वीतेमुळे रसिकांच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत, त्यानुसार पुढे काय Plan असणार यावर ती म्हणाली की, हो खरंच...!मला ब-याचदा अनेक मोठ्या मंड्ळीचे फोन येतात आणि या दोन्ही नाटकांतील भूमिकांचं कौतुक करतात खुप आनंद होतो. सध्या एका सिनेमाची बोलणी सुरू आहे. सप्टेबर महिन्याच्या आसपास ते काम सुरू होईल. त्याचबरोबर केदार शिंदेच्या एका Project मध्ये मी असणार आहे. हा कर्यक्रम झी मराठीवर येईल. त्यामुळे प्रेक्षकांना भेटण्यास मी लवकरच येणार असल्याचं", अमृताने सांगितलं.

सध्या कोणते प्रोजेक्ट्स सुरू आहे याबद्द्ल विचारले असता, ती म्हणाली की, केदार शिंदे यांच्या ‘मधु इथे चंद्र तिथे’ या झी मराठीवर येणा-या कार्यक्रमात मी असणार आहे. त्याचबरोबर आणखी प्रोजेक्टबद्द्ल बोलणी सुरू असल्याची अमृताने माहिती दिली".