Sign In New user? Start here.

कधीही न केलेली भूमिका करायला मिळाली - अनिकेत विश्वासराव

Aniket Vishavasrao interview

कधीही न केलेली भूमिका करायला मिळाली - अनिकेत विश्वासराव

 
 
 

- अमीत इंगोले
( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )

अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे अनिकेत विश्वासराव. अनिकेत हा तसा मालिकांतील भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या जास्त लक्षात आहे. पण सद्या चित्र वेगळे आहे. गिरीश जोशी यांच्या जोरात चालू असलेल्या ‘लव्ह बर्डस’ या नाटकातून तो चांगलाच चर्चेत आला आहे. वेगळ्या विषयावर असलेल्या या नाटकाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. बीएमएम शिकागो अधिवेशन २०११ मध्ये या ‘लव्ह बर्डस’ नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला आहे. त्यानिमित्ताने या नाटकाबद्दल अनिकेत विश्वासराव बरोबर साधलेला संवाद...

अनिकेतशी गप्पा मारायला सुरवात करताच तो नाटकाबद्दल सांगायला लागला, तो म्हणाला की, "या नाटकाच्या Title वरून हे नाटक खूप Romantic असेल असा समज प्रेक्षकांचा होतो. पण हा अतिशय वेगळा आणि Suspence Thriller विषय असून यात मी विश्वास इनामदार याची भूमिका करतोय. ज्याची एका अपघातात स्मृती हरवते. त्याला जेव्हा आधीचं आठवायला लागतं तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात, असं हे कथानक आहे".

नाटकाच्या तालमी आणि प्रयोगादरम्यानचे काही खास किस्से सांगतांना तो म्हणाला की, "संपूर्ण प्रोसेस खूप एन्जॉय केली. गिरीश जोशी यांची नाटकं मी पाहीली होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याची माझी खूप होती. आणि असं कॅरेक्टर मी याआधी कधी केलं नव्हतं. ते यातून करायला मिळालं. सर्वजण पहिल्यांदाच एकमेकांबरोबर काम करत होतो. पण सगळे आधीच एकमेकांना ओळखत होतो. त्यामुळेही चांगलीच मजा आली". यावेळी प्रयोगादरम्यानचा किस्साही त्याने सांगितला की, "गडकरी ला प्रयोग सुरू होता. आणि प्रयोगादरम्यान एका व्यक्तिचा मोबाईल फोन दोन/तीनदा वाजला. आणि इतर लोक चांगलेच चिडले. प्रयोग बंद करून त्या व्यक्तिला प्रेक्षक चांगलेच ओरडले. नंतर प्रयोग पुन्हा सुरू झाला. थोड्या वेळाने परत मोबाईल वाजला. बाजूचा व्यक्ती चांगलाच तापला. पण यावेळी वाजलेला मोबाईल हा कोणत्या प्रेक्षकाचा नसून नाटकातील अभिनेत्याचाच होता. हे त्याच्या लक्षात आल्यावर सर्व नाट्यगृहात हास्य फुलले. आणि तो प्रेक्षकही हासायला लागला".

अमृता बरोबरही अनिकेत पहिल्यांदाच काम करतोय त्यामुळे तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगतांना तो म्हणाला की, "चांगला होता..! अमृता आणि मी जरी आधी एकत्र काम केले नसले, तरी आम्ही चांगले मित्र आहोत. त्यामुळे काम करतांना कम्फर्ट होता. सगळी टीमही अतिशय उत्तम असल्याने काम करण्यात खूप मज्जाही आल्याचं", त्याने सांगितलं.

तू चित्रपट, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात काम करतोय, यापैकी तुला जास्त आवडणारं माध्यम कोणतं? यावर तो म्हणाला की, " नाटक आणि चित्रपटात काम करायला मला जास्त आवडतं. मला या माध्यमांची काम करण्याची प्रोसेस खूप आवडते. अनेक नवीन गोष्टी ट्रायआऊट करायला मिळतात. म्हणून मला या दोन माध्यमांमध्ये काम करायला जास्त आवडतं", असं तो म्हणाला.

तिथल्या प्रेक्षकांचा विचार करता नाटकात काही बदल केलेत का? या प्रश्नाला उत्तर देतांना तो म्हणाला की, " स्क्रिप्टमध्ये काही बदल नाहीत. पण तिथल्या नाट्यगृहांनुसार टेक्निकल बाजूत नक्कीच काहीतरी बदल करावे लागणार आहेत. कारण तिथली नाट्यगृहे प्रचंड आणि वेगळे असतात. त्यामुळे त्यानुसार नाटकाच्या टेक्निकल गोष्टींमध्ये काही बदल केले जाणार", असल्याचं तो म्हणाला.

सध्या कोणत्या नवीन प्रोजेक्टसवर काम करत असल्याचं विचारता, तो म्हणाला की, "महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘फक्त लढ म्हणा..!’ या चित्रपटात त्याची भूमिका असल्याचं त्याने सांगितलं".