Sign In New user? Start here.

वेगवेगळे विषय रंजकपणे रसिकांसमोर मांडायचे आहेत... - अतुल काळे

atul kale interview

director atul kale's interview

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

वेगवेगळे विषय रंजकपणे रसिकांसमोर मांडायचे आहेत... - अतुल काळे

   दिग्दर्शक हा सिनेमारुपी जहाजाचा कप्तान असतो. त्यामुळेच सिनेमा चांगले की, वाईट असणे हे सर्वस्वी दिग्दर्शकाच्या कामगिरीवर अवलंबून असतो. मराठी सिनेसॄष्टीत आज बरेच नवनवीन दिग्दर्शक येत आहेत, पण हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच इथे टिकतात आणि लोकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होतात. ‘मातीत चुली’ नावाच्या सिनेमाने असाच एक अतुल काळे नावाचा हरहुन्नरी दिग्दर्शक मराठी सिनेजगताला दिला. त्यानंतर ‘दे धक्का’ , ‘शहानपण देगा देवा ’ आणि ‘तिचा बाप त्याचा बाप’ यांसारख्या अतुलच्या सिनेमांनी मराठी रसिकांचे मंनोरजन केले. सध्या आपल्या नवीन सिनेमाच्या कामात व्यस्त असलेल्या अतुलने मारलेल्या गप्पा -

   १) ‘मातीच्या चुली’ सारखा गंभीर सिनेमा बनवल्यानंतर मनात नेमका काय सुरु होते?

   - ‘मातीच्या चुली’ हा घराघरातील विषय पडद्यावर मांडला आणि रसिकांना तो खूप भावला. त्यानंतर पुन्हा एखाद्या गंभीर सिनेमा न आणता वास्तवाला धरुन असलेली कॉमेडी पडद्यावर सादर करायची होती. त्यासाठी ‘दे धक्का’ चा विषय योग्य असल्याचे वाटले. केवळ हसण्यावर विदोन न करता वास्तवाशी त्याची सांगड घालून तो सादर केला आणि या सिनेमानेही विक्रमी यश मिळवले. त्यानंतर एक मॅड कॉमेडी करायची होती. त्यामुळे ‘शहानपण देगा देवा’ सारखा डोके घरी ठेवून पाहावा असा सिनेमा बनवला. मग विनोदाला रोमांसची जोडी देऊन‘ तिचा बाप त्याचा बाप’ ही रोमॅटिक कॉमेडी रसिकांसमोर सादर केली. एकूणच एकाच पठडीतील सिनेमा बनवण्यात मला जराही रस नसून विविध विषयांना हात घालून ते रंजकपणे मांडण्याची मी प्रयत्न करत असतो.

Atul Kale

   २) आजवरच्या कारकिर्दीमधील अनुभवाबाबत थोडक्यात काय सांगाल?

   - ‘स्ट्रगलर’, ‘देह’, ‘ विरुध्द'; `लाईफ हो तो ऎसी’, ‘रक्त’ तसेच ‘लालू प्रसाद यादव’ यांसारख्या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शनाकदे वळलो. त्यामुळे आधी पाया भक्कम केला आणि मग दिग्दर्शनासोबतच एकूण चित्रपट निर्मितीची प्रक्रिया जवळून पाहिली. त्याचा फायदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळ्ण्यासाठी सज्ज झालो. एकूणच मराठी आणि हिंदी सिनेमांसाठी सहाय्यकाचे काम करताना दिग्दर्शनासोबतच एकूण निर्मितीची प्रक्रिया जवळून पाहिली. त्याचा फायदा दिग्दर्शनाच्या वेळी झाला आणि भविष्यातही होईल.

   ३) दिग्दर्शनासोबतच अभिनेता आणि गायकही जगाने पाहिला आहे.

   - होय, जरी मी अभिनय आणि गायन करत असलो तरी मूळात दिग्दर्शनाकडे ओढ असल्याने गायनाकडे जास्त लक्ष द्यायला वेळी मिळाला नाही. अभिनय माझ्याकडून अगदी सहजपणे होतो. दिग्दर्शक असल्याने अभिनय करण्यासाठी वेगळी काही करावे लागत नाही.

Atul Kale

   ४) तुम्ही अभिनय केलेले सिनेमे कोणते?

   - मी फार मोठया भूमिका साकारल्या नाहीत, पण ‘स्ट्रगलर’, ‘देह’, ‘मि. ब्लॅक दि.व्हाईट’, ‘लाईफ हो तो ऎसी’,‘विरुध्द’,‘ रक्त’, ‘लालू प्रसाद यादव’,‘ हथियार’, प्राण जाए पर शान ना जाए’, ‘तेरा मेरा साठ रहे’, ‘पिताह’,‘ जिसे देश में गंगा रहता है’, ‘वास्तव’, ‘निदान’, यासारख्या सिनेमांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. याशिवाय ‘गॉड ओन्ली नोज’ या इंग्रजी भाषेतील सिनेमासोबतच ‘जन्नत टॉकिज’ या टेलिफिल्ममध्येही काम केले आहे. जाहिरातीबाबत बोलायचे तर व्हिसा कार्ड, एव्हरेस्ट का तिखा लाल, इंडिका हेअर डाय, हिमालया फूट केअर क्रिम, इनो, मारी चॉईस दुधवाला, अ‍ॅक्वा फ्रेश टूथ पेस्ट, गुड नाईट मॅटस , अशोक फूडस, हाईट अँड सिक बिस्किट यांसारख्या ब-याच जाहिरातीमध्ये अभिनय केला आहे.

   ५) तुम्ही काही नाटकांमध्येही अभिनय केला आहे. त्याबाबत काय सांगाल?

   - रंगमंचावर अभिनय करताना अतिशय अ‍ॅलर्ट राहावे लागते. रंगभूमीवर अभिनय केलेला कलाकार कूठेही फेल होऊ शकत नाही. दिग्दर्शक भरत दाभोळकरांच्या जोडीला देवेंन्द्र पेम यांच्या ‘ऑल दी बेस्ट’ या सहाबहार नाटकातही काम आहे.

   ६) गायकाच्या रुपातील कामगिरीबाबत समाधानी आहात का?

   - होय, कारण गायन ही माझी हॉबी आहे. त्यामुळे दिग्दर्शन करतानाही आपला छंद जोपासण्याची संधी मिळत असल्याचे समाधान आहे. एमटीव्हीसाठी ‘धरती के लाल’ या सिरीजसाठी व्हॉइस ओव्हर दिला होता. याशिवाय एका मराठी सिनेमासाठी श्रेया घोषालसारख्या आजच्या आघाडीच्या गायिकेसोबत गाण्याची संधी मिळाली. ‘मातीच्या चुली’ चे पार्श्वसंगीतही केले आणि यात एक सोलो सॉंग गायले आहे. ‘तेरा मेरा साठ रहे’ साठी सुनिधी आणि बेला शेंडेसोबत दोन ड्युएट सॉंग गायले आहे. ‘तेरा मेरा साथ रहे’ साठी सुनिधी आणि बेला शेंडेसोबत दोन ड्युएट गाणी म्हटली आहेत. ‘रहता है...’ हे गोविंदासाठी सोलो सॉंग गायले आहे. याशिवाय ‘प्यार किया नही जाता’ साठी सोलो गीत गायले आहे. ‘ वास्तव’ सिनेमासाठी कुमार सानू आणि विनोद राठोड यांच्यासोबत गायला केले. ‘अस्तित्व’ साठी गायलेल्या शीर्षक गिताला महाराष्ट्र टाईम्सचा सर्वोत्कॄष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला आहे. इअतकेच नाही तर ‘गोल्ड ओन्ली नोज’ या इंग्रजी सिनेमातील बरीच गाणी गायली आहेत.

   ७) सध्या नवीन कोणता प्रोजेक्ट सुरु आहे?

   - ‘तिचा बाप त्याचा बाप’ नंतर एका विषयावर काम सुरु केले असून लवकरच त्याला मूर्त रुप देण्याची प्रक्रिया सुरु केले असून लवकरच त्याला मूर्त रुप देण्याची प्रक्रिया सुरु होणारा आहे. अद्याप सर्व गोष्टी प्रायमरी स्तेजला असल्याने त्याबाबत सध्या काही बोलता येणार नाही. पुन्हा एकदा वेगला विषय घेऊन समोर येणार आहे एवढे मात्र खात्रीलायक सांगू शकतो.

   झगमग टिम -