Sign In New user? Start here.

कुटुंबात सामावलेले एक छान कॅरेक्टर 'शुभांगी जोशी'

 

कुटुंबात सामावलेले एक छान कॅरेक्टर -शुभांगी जोशी

 
 
 

ऑल्ट एन्टरटेन्मेंट आणि फ्रायडे फिल्म वर्क्स यांची संयुक्त निर्मिती असलेल्या तसेच किरण यज्ञोपवीत दिग्दर्शित `ताऱयांचे बेट' या मराठी चित्रपटाने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पटकथेसाठी आणि अभिनयासाठी असे दोन पुरस्कार पटकावून साऱयांचे लक्ष वेधून घेतले ... हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेमळ आजीची भूमिका साकारण्यासाठी नावलौकिक असलेल्या शुभांगी जोशी यांनी या चित्रपटातली आजी हुबेहूब रंगवली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद. ताऱयांचे बेट या चित्रपटातल्या आजीच्या भूमिकेबद्दल शुभांगी जोशी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, सचिन हा सिनेमाचा हिरा आहे आणि त्याला एक छोटा मुलगा आहे. आणि त्याला एवछोटा मुलगा आहे. त्याच्यावरच गोष्ट बेतलेली आहे. अशा या लहान मुलाच्या आजीचा रोल मी केलाय... यातली आजी जशी चिडते आणि रागावते तसेच त्याला प्रेमाने समजावते देखील, असा तो छान गोड रोल आहे.

तुम्ही आजवर आजीचे रोल तर असंख्य केले आहेत, पण त्या सगळ्यांपेक्षा ताऱयांचे बेटमधील तुमची आजी वेगळी कशी काय? असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, आधीचे जे रोल केले ते मध्यमवगा- &तल्या आजीचे होते. खाऊन-पिऊन सुखी घरातले होते. मध्यंतरी चिन्या नावाची एक सीरियल आली होती, त्यातही मी आजी होते; पण त्यातली आजी श्रीमंत घरातली होती. घर श्रीमंताचं या मालिकेमध्येही माझी आजी चांगल्या परिस्थितीतली अशीच होती. खरे सांगायचे झाले तर आजीचे रोल आभाळमाया या मालिकेपासून करायला सुरुवात केली, त्याच्या आधी काही मी आजी केली नव्हती. ताऱयांचे बेटमध्ये एक गरीब कुटुंब आहे. आणि या गरीब कुटुंबातली ही आजी आहे. आर्थिक परिस्थितीत फरक असला की आपल्या बोलण्या-चालण्यातही थोडा फरक येतो. तसा फरक मी त्याच्यात दाखवला. कोकणाची पार्श्वभूमी असल्यामुळे त्याप्रमाणे ते तसे मला हेल काढून बोलणे किंवा कोकणात असतात तसला कॉस्च्युम्स वगैरे कॅरी करायला लागले. त्याला जरा मला वेळ लागला एवढंच. बाकी तो रोल खूपच छान होता. अगदी छोटा असला तरी छानच होता. तो रोल करतानाही मला खूप आवडला. कॉस्च्युम्सवाईज, हेअरस्टाईलवाईज किंवा आपले बोलणे, वावरणे याच्यामध्ये खूप फरक होता, तो मी या सिनेमात दाखवू शकले. यातली आजी सर्वसाधारण असते तशी नव्हती. यातल्या आजीला खोटे आवडत नव्हते, ते मुलाने करू नये असे तिला वाटायचे, मुलांना तसे समजावायचा प्रयत्न ती करायची, मग कधी ती नातवावर चिडायचीसुध्दा, कुटुंबात सामावलेले एक छानसे कॅरेक्टर ते होते.

सचिन खेडेकर किंवा विनय आपटेंसोबत ताऱयांचे बेटमध्ये काम करताना तुम्हाला काय अनुभव आला असे विचारल्यावर त्या म्हणाल्या की, सचिनबरोबर माझे फारच कमी सीन होते, विनयबरोबर तर या चित्रपटात मला सीनच नव्हता, पण डिरेक्टर म्हणून विनयसोबत काम केले आहे तसेच नाटकातही त्याच्याबरोबर पूर्वी काम केले आहे. किरण यज्ञोपवीत या दिग्दर्शकाबद्दल काय सांगाल असे विचारल्यावर त्या म्हणाल्या की, ताऱयांचे बेटचा दिग्दर्शक किरणची आणि माझा ओळख फार जुनी आहे. पूर्वी टीव्हीवर तेरा-तेरा भागांच्या रेशीमगाठी वगैरे मालिका व्हायच्या. त्यात मी त्याच्याबरोबर काम केले होते, पण तेव्हा तोही आर्टिस्टच होता. ताऱयांचे बेटच्या निमित्ताने तो दिग्दर्शक झाला. यातल्या आजीची भाषा कशी असेल? स्वभाव, बोलण्याची पध्दत कशी असेल हे सगळे किरणने समजावून सांगितले होते त्याप्रमाणे यातली आजी उभी केली. थोडक्यात सांगायच झाले तर दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच प्रयत्न होता आणि तो चांगला होता, असेही शुभांगी जोशी यांनी सांगितले.