Sign In New user? Start here.

दाहक 'उचल्या'चे शिवधनु्ष्य

दाहक 'उचल्या'चे शिवधनु्ष्य

 
 
 

- अमीत इंगोले
( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )

सध्या मराठीत चित्रपटांच्या विषयांसंबंधी एक नवीन ट्रेंड आलाय. तो म्हणजे अनेक गाजलेल्या कादंबरीवर आधारीत विषयांवर चित्रपट तयार करणे. नटरंग, पांगिरा या कलाकृतींनंतर आता ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मण गायकवाड लिखीत ’उचल्या’ या कादंबरीवर चित्रपट बनविला जात आहे. ’हुप्पा हुय्या’ या चित्रपटाचे निर्माते अमर कक्कड आणि पुष्पा कक्कड यांनी ही कथा रूपेरी पडध्यावर आणण्याचे ठरविले आहे. दिग्दर्शक समीत कक्कड ’उचल्या’चे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाबाबत दिग्दर्शक समीत कक्कड याने ’झगमग डॉट नेट’शी संवाद साधला.

’उचल्या’ या लोकप्रिय कांदबरीवर चित्रपट बनवतो आहेस. काय पाहिले या कथेमध्ये, या प्रश्नावर समीतने सुरुवातीलाच सांगितले, की 'या कलाकृतीवर चित्रपट करणे ही काही साधारण गोष्ट नाहीय. त्यामुळे मुळ कथेवर अतिशय काटेकोरपणे संहिता बनविली जात आहे.' 'चित्रपटाचा विषय खूप खास आणि वेगळा आहे. त्यात दाहकता आहे. ज्या पद्धतीचं जीवन त्या कथानकात आहे, ते जीवन जगासमोर यायला हवं, हाच आमचा मूळ उद्देश आहे. समाजातील एक घटक ज्यांना समाजातीलंच काही लोकं वाईट वागणूक देतात. तीही इतकी वाईट त्यांना जगणं मुश्किल होऊन जातं. ही कुठली माणूसकी आहे? त्याच दुर्लक्षित घटकातील लोकांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत चित्रीकरण पूर्ण होईल,' असे समीतने सांगितले

एक दिग्दर्शक म्हणून या कलाकृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोनही समीतने उलगडला. 'या कादंबरीत जे आहे ते सगळं खरं आहे. ती सत्य कथा आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झालीत. तरीही जी समानता असायला हवी ती अजूनही रूजलेली नाही. मला तर वाटतं ही कथा सगळ्या जगासमोर यायला हवी. काय होतं की, सगळ्याच लोकांनी हे पुस्तक वाचलं असेलच असं नाही. म्हणून चित्रपटाच्या माध्यमातून ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवायचं आहे. त्यासाठी मराठी बरोबरंच हिंदी आणि तेलगू मध्येही हा चित्रपट करण्याच्या मी विचारात आहे,' असा प्लॅनही त्याने सांगितला.

 

मूळ कथानकात काही बदल करणार नसल्याचे समीतने अगदी ठामपणे स्पष्ट केले. ' मुळ कथानकात काहीच बदल केले जाणार नाहीत. जे सत्य आहे जसं आहे तसंच मांडलं जाणार आहे. हा चित्रपट, यातील कथानक कुठून कॉपी केला जाणार नाहीये. त्यामुळे त्या पुस्तकातील पानं जशीच्या तशी पडद्यावर दाखवायची आहे,' अशी भूमिका त्याने मांडली.

खरे तर एखादी सत्यकथा लिहिणे आणि तीच पडद्यावर दाखविणे यात मुलभूत फरक आहे. ती पडद्यावर दाखवितांना त्या कथेला न्याय मिळेल का?, अशी शंका स्वाभाविक मनात येतेच. समीत त्या शंकेवर उत्तर देतो, 'हे चित्रपट बनवणा-यावर डिपेन्ड असतं. जे सांगायचं आहे तेच जर दाखविलं तर त्याला नक्कीच न्याय मिळू शकतो. जे इमोशन त्या मूळ कलाकृतीत आहे. त्याला धक्का न लावता जर ते समोर आणलं तर त्याला न्याय मिळणारंच,' असा त्याचा ठाम विश्वास आहे.

इतक्या गाजलेल्या आणि लोकप्रिय कलाकृतीवर चित्रपट बनविण्याचे ठरविले, तेव्हा दडपण येतं का, या प्रश्नावर समीतनं दिलेलं उत्तर त्याचं आणि कादंबरी लेखकाचं नात सांगून जातं. 'दडपण मूळीच नाही...त्याचं कारण हे की, या कादंबरीचे लेखक लक्ष्मणजींनी मला सांगितलं की, तू करू शकतोस. त्यांनी माझ्यावर दाखविलेला हा विश्वास खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे दडपण काही उरलंच नाही. आणि त्यांच्या या विषयावर वारंवार चर्चा सुरू आहे. ते आमच्या बरोबर गावोगावीं फिरत आहेत. त्या लोकांना भेटत आहेत. आमच्या बरोबर तेही तेवढीच मेहनत घेत आहेत. त्यामुळे काही टेन्शन नाहीच,' असं समीत सांगून जातो.

अजित-समीर ’हुप्पा हुय्या’साठी काम केलेल्या संगीतकार जोडीने 'उचल्या' संगीत दिलं आहे.. आश्वासक समीतच्या आत्मविश्वासाने 'उचल्या'मधून मराठी प्रेक्षकांना सकस काही पाहायला मिळेल, याची शाश्वती वाटते आहे. त्याच्या वाटचालीला 'झगमग'तर्फे शुभेच्छा !