Sign In New user? Start here.

दिलीप प्रभावलकर

 

Dilip Prabhavalkar

दिलीप प्रभावलकर

दिलीप प्रभावलकर यांनी आपल्या तीस वर्षाच्या प्रदीर्घ नाट्यकारकीर्दीत स्वत:च्या अभिनयचा खास ठसा उमटविला आहे. त्यांच्या व्यक्‍तिमत्वाबद्दल फार कमी जणांना माहित असेल की ते जैविक-भौतिकशास्त्र (Bio-Physics) या विषयात प्रथम श्रेणीचे द्विपदवीधर आहेत.

दिलीप प्रभावलकर हे एक मराठी रंगभुमी, चित्रपट आणि दुरचित्रवाहिन्यातील कलाकार आहेत. त्यांनी अनेक नाटके, चित्रपट आणि वाहिन्यांमध्ये काम केले आहे. त्याच बरोबर त्यांनी लेखन सुद्धा केले आहेत.

रंगभुमीवर त्यांनी सुरुवात १९६८ साली ’लोभ नसावा ही विनंती’ ह्या विजय तेंडुलकर लिखित अरविंद देशपांडे दिग्दर्शित नाटकापासून केली. त्यानंतर त्यांनी ’अलबत्या गलबत्या’ ह्या रत्‍नाकर मतकरी यांच्या नाटकामध्ये चेटकीणीचा अभिनय केला. पुढे त्यांनी प्रेम कहाणी, आरण्यक, पोर्ट्रेट, सुर्याची पिल्ले, कशात काय लफड्यात पाय, पळा पळा कोण पुढे पळे तो..., वट वट सावित्री, विठठला, पप्पा सांगा कुणाचे, वासूची सासू, एक झुंज वा-याशी, नाती-गोती, लास्ट टॅन्गो इन हेवन, घर तिघांचं हवं, एक हट्टी मुलगी, हसवाफसवी, कलम ३०२, संध्याछाया, जावई माझा भला, चूक-भूल द्यावी घ्यावी, नांदा सौख्य भरे, बटाट्याची चाळ, वाटचाल, आप्पा आणि बाप्पा यांसारख्या नाटकांमध्ये काम केले. हसवाफसवी हे नाटक त्यांनी स्वत: लिहिले आणि दिग्दर्शित केले. त्यामध्ये त्यांनी अतिशय भिन्न अश्या ६ व्यक्‍तिरेखा केल्या. हे नाटक प्रेक्षकांना फार आवडले होते.

त्यांनी आपल्या चित्रपट करियरला सुरुवात १९७९ साली ’चिमणराव गुंड्याभाऊ’ ह्या विनय धुमाळे दिग्दर्शित चित्रपटा पासुन केली. त्यानंतर त्यांची १९८१ साली ’एक डाव भुताचा’ ह्या रवी नेमाडे यांच्या चित्रपटातील ’देशमुख मास्तुरे’ची भुमिका गाजली. १९९१ साली आलेला संजय सूरकर दिग्दर्शित ’चौकट राजा’ हा चित्रपट विशेष गाजला तो त्यातील दिलीप प्रभावळकर यांनी साकार केलेल्या मानसिक अपंगत्व असलेल्या व्यक्‍तिरेखाच्या अभिनयाबद्दल. १९९३ साली महेश कोठारे यांच्या ’झपाटलेला’ चित्रपटातील त्यांची तात्या विंचूची भुमिका छोटी होती पण तात्या विंचूच्या बाहुल्याला दिलेला आवाज (ऒम फट स्वाहा: हा डायलॉग) लोकांना अजुनही लक्षात आहे. लपवा छपवी, धरलं तर चावतंय, एक होता विदूषक, सरकारनामा, पछाडलेला हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.

’बेकाबू’ ह्या एन. चंद्रा यांच्या चित्रपटापासून त्यांनी हिन्दी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी निदान, एन्काउन्टर-द किलिंग अश्या काही हिन्दी चित्रपटांमध्ये काम केले. २००६ साली राजकुमार हिरानी यांच्या ’लगे रहो मुन्नभाई’ या चित्रपटातील मोहनदास करमचन्द गांधी ही  भुमिका खुप गाजली.

’चिमणराव गुंड्याभाऊ’  या मालिकेतुन त्यांनी दूरचित्रवाहीनीवरील अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी झोपी गेलेला जागा झाला, नो प्रॉब्लेम, एका हाताची टाळी, टूर - टूर, श्रीयुत गंगाधर टिपरे, व्यक्‍ति आणि वल्ली, आमच्या ह्या हस-या घरात अश्या काही मालिंकामध्ये अभिनय केला.

त्यांनी अभिनयाबरोबर लेखनाचाही छंद जोपासला आहे. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके पुढील प्रमाणे गुगली, हसगत, कागदी बाण, झूम, बोक्या सातबंडे, हसवाफसवी, नवी गुगली, अनुदिनी, एकांकीका, चूकभूल द्यावी घ्यावी, हाउज दॅट?, अवती भवती, आवाज दिलीप प्रभावळकरांचा, एका खेळियाने..., एकपात्रिका आणि बालनाटिका.

दिलीप प्रभावलकर यांना वेगवेगळ्या क्षेत्रातुन अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
१९७२ सर्वोत्‍कुष्ट हौशी अभिनेता ’प्रेम कहाणी’
१९८१ सर्वोत्‍कृष्ट विनोदी अभिनेता ’कशात काय लफड्यात पाय’
१९८७ सर्वोत्‍कृष्ट कलाकार  ’वासूची सासू’.
१९८८ विशेष लक्षवेधी अभिनेता ’एक झुंज वा़-याशी’
सर्वोत्‍कृष्ट विनोदी वाडमय ’गुगली’
१९८९ सर्वोत्‍कृष्ट अभिनेता ’नाती गोती’
१९९० सर्वोत्‍कृष्ट व्यावसायिक अभिनेता
सर्वोत्‍कृष्ट प्रादेशिक कलाकार ’झोपी गेलेला जागा झाला’
१९९१ उत्‍कृष्ट अभिनेता ’चौकट राजा’
१९९२ लक्ष्यवेधी अभिनेता ’कलम ३०२’
११९३ लक्ष्यवेधी नाट्य निर्मितीसाठी विशेष पुरस्कार ’हसवाफसवी’
११९४ सर्वोत्‍कृष्ट  व्यावसायिक अभिनेता ’जावई माझा भला’
१९९७ उत्‍कृष्ट अभिनेता ’ सरकारनामा’
१९९९ सर्वोत्‍कृष्ट  अभिनेता ’रात्र आरंभ’
मराठी चित्रपटातील सर्वोत्‍कृष्ट अभिनेता ’रात्र आरंभ’
२००२ टी. व्ही. मालिकेतील सर्वोत्‍कृष्ट अभिनेता ’श्रीयुत गंगाधर टिपरे’
२००५ राजेंद्र बनहट्टी पुरस्कार, पुणे ’हसगत’ ह्या पुस्तकाला
सर्वोत्‍कृष्ट अभिनेता ’आप्पा आणि बाप्पा’