Sign In New user? Start here.

खाकी वर्दीतला रावसाहेब कसबे - गणेश यादव

खाकी वर्दीतला रावसाहेब कसबे - गणेश यादव

 
 
 

हललच्या गाजलेल्dया हिंदी चित्रपटांतून चुलबूल पांडे, बाजीराव सिंघम यांनी आपला पोलिसी खाक्या दाखवत पेक्षकांची मनं जिंकली. मराठीसोबतंच हिंदी चित्रपटांमध्येही उल्लेखनीय कामगिरी करणारे गणेश यादव या कलासक्त अभिनेत्याचा अभिनय नेहमीच कौतुकास्पद ठरला आहे. ‘मोरया’ चित्रपटात इन्स्पेक्टर राणेंची भूमिका गाजवल्यानंतर गणेश यादव येत्या 9 डिसेंबरला पदर्शित होणा-या ‘पतिबिंब’ चित्रपटातून रावसाहेब कसबे या तडफदार पोलिस अधिका- यांच्या भूमिकेत झळकणार आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत –

1) ‘पतिबिंब’ या चित्रपटात भूमिका तुम्ही साकारलेल्या भूमिकेबद्दल काय सांगाल ?

- ‘पतिबिंब’ या चित्रपटातील माझ्या भूमिकेचं नाव आहे रावसाहेब कसबे. हा रावसाहेब कसबे अतिशय शंकास्तद असं व्यक्तीमत्व आहे. तो चांगला आहे की वाईट हे चित्रपटाच्या शेवटपर्यंत कोणालाचं कळत नाही. त्याच्या मनात काय चालू आहे हे समोरच्या माणसालाही कळत नाही असं हे शंका निर्माण करणारी भूमिका आहे. रावसाहेब हसतो तेव्हा तो खरचं हसत आहे की तो रागवतो, तो खरच रागवलेला आहे हे कोणालाचं कळत नाही. खूपच वेगवेगळया छटा असलेली अशी ही माझी भूमिका आहे. खूपच स्ट्रांग असलेलं असं हे व्यक्तीमत्त्व आहे.

2) रावसाहेब कसबे ही भूमिका उभी करण्यासाठी दिग्दर्शक गिरीश मोहीते यांची कशा पकारे मदत झाली ?

- ‘पतिबिंब’ चित्रपटातील रावसाहेब कसबे या पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेवर पाच - सहा कलाकारांचा डोळा होता. पण दिग्दर्शक गिरीश मोहीते यांच्या डोक्यात रावसाहेब कसबे या भूमिकेला न्याय देऊ शकतो असा एकच कलाकार आहे तो म्हणजे गणेश यादव. अशा पकारे ही भूमिका मला त्यांच्यामुळे मिळाली. भूमिकेतील बारकावे, महत्त्वाचे पॉंईट, त्या भूमिकेतील लकबी सांगितल्या. त्यामुळे ही भूमिका उभी करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन लाभले.

3) ‘पतिबिंब’ या चित्रपटाबद्दल काय सांगाल ?

- हा सिनेमा खरं तर जमून आलेला आहे. एक रहस्यमय, चित्तथरारक असा हा सिनेमा आहे. पत्येक बाबतीत हा सिनेमा श्रेष्ठ ठरला आहे. चित्रीकरणाच्या बाबतीत, तंत्रज्ञानाच्या बाबतीत, संगीत हया सर्व बाबतीत सिनेमा श्रेष्ठ आहे. तसेच हिंदी चित्रपटाशी टक्कर देणारा असा हा सिनेमा पशांत हिरे (निर्माता) यांनी बनवला आहे. आजपर्यंत तामीळ, हॉलीवूड चित्रपटांचे रिमेक बनवले जात पण ‘पतिबिंब’ या चित्रपटाने हा ट्रेड नक्कीच बदलेलं. पतिबिंब या चित्रपटाचा हिंदीत रिमेक बनवण्यासाठी निर्माते पुढे सरसावतील. इतका उत्कृष्ट असा हा सिनेमा आहे.

4) ‘मोरया’ चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका आणि आता परत ‘पतिबिंब’ या चित्रपटात तीच भूमिका साकारत आहात अशा पकारच्या भूमिका करायला आवडतात का ?

- असं काही नाही. सर्व पथम मी स्किप्ट वाचतो. त्यात माझी भूमिका किती महत्त्वाची आहे, त्या भूमिकेत काय नावीन्य आहे हे जाणून घेतो. ती व्यक्तिरेखा आवडली तर मग ती भूमिका स्वीकारतो. ती भूमिका लहान आहे की मोठी याचा विचार करत नाही. पतिबिंब मधील पोलीसाची भूमिका दमदार वाटली म्हणून पुन्हा एकदा मी पोलीस इन्स्पेक्टर साकारला आहे. ‘पतिबिंब’ चित्रपटातील माझी ही भूमिका पेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आहे. वेगवेगळया भूमिका करायला मला आवडतात. पुढे जर अशा दमदार भूमिका करायला मिळाल्या तर मी अशा भूमिकांचा स्वीकार नक्की करेन.