Sign In New user? Start here.

आदिनाथ कोठारे

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

हे कॅरेक्टर मला खूप रिलेट होतं - आदिनाथ कोठारे

‘झपाटलेला २’ च्या घवघवीत यशानंतर आदिनाथ कोठारे आपला नविन सिनेमा प्रेक्षकांसमोर आणायला सज्ज झाला आहे. सिनेमाचं नाव आहे हॅलो नंदन.... हा चित्रपट १४ मार्च ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, या निमित्ताने झगमग टिम ने आदिनाथ बरोबर केलेली खास बातचीत.

* तुझ्या ‘हॅलो नंदन’ ह्या वेगळ्या सिनेमाबद्दल काय सांगशील ?

- आज मराठी सिनेमात खूप नवनवीन विषय येत आहेत. नवनवीन प्रयोग होत आहेत. आजपर्यंत मराठीत कधीही वापरला न गेलेला असा विषय ‘हॅलो नंदन’ मराठी सिनेमा अतिशय सुंदररित्या मांडण्यात आला आहे. या सिनेमाची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन एका अतिशय हुशार आणि अनुभवी असलेल्या राहुल जाधव यांनी केलं आहे. यात मृणाल ठाकूर नावाची एक नवी अभिनेत्री माझ्याबरोबर दिसणार आहे. नीना कुलकर्णी आणि अनंत नाग यांच्याही यात महत्वाच्या भूमिका आहेत.

* या सिनेमाचं वेगळेपण काय आहे ?

- ही फिल्म एक डार्क कॉमेडी आणि त्याचबरोबर थ्रिलर आहे. हा जॉनर मराठीत फार जास्त कधी वापरला गेला नाहीये. अतिशय सुंदर पद्धतीनं राहुल जाधव यांनी या सिनेमाची कथा रेखाट्ली आहे. नंदन या सिनेमातील अभिनेत्याची एक वस्तू हरवते आणि ती शोधण्याच्या प्रयत्नात काय काय उलगडत जातं. तो सगळा प्रवास कसा होतो हे या सिनेमात दाखवण्यात आला आहे. या सिनेमात खास आकर्षण ठरणार आहे ते या सिनेमाचं संगीत. अतिशय उत्तम असं संगीत प्रफुल्लचंद्र या नव्या संगीतकाराने दिलं असून अमितराज यांनीही एक रोमॅंटिक गाणं संगीतबद्ध केलं आहे.

* तुझी भूमिका कशी आणि काय आहे ?

- मी याआधींच्या सिनेमांमध्ये केलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूप वेगळी आहे. या भूमिकेचं वेगळेपण म्हणजे नंदनला कुठल्याही प्रकारचा इनजस्टिस चालत नाही. तो म्हणतो की, तुम्हाला इनजस्टिस चालतो, मला नाही चालत ! आणि हे कॅरेक्टर मला खूप रिलेट होतं. दिग्दर्शक राहूल जाधव ह्यांना नंदन माझ्यात दिसला म्हणूनच ही भूमिका माझ्या वाट्याला आली. खरंतर हे कॅरेक्टर साकारताना मला खूप मजा आली. या भूमिकेच्या निमित्ताने काही दिवस का होईना मला खूप वेगळं आयुष्य जगायला मिळालं.

* सिनेमटोग्राफर-दिग्दर्शक राहुल जाधव यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

- एकाचवेळी सिनेमटोग्राफी आणि डिरेक्शन करणं खूप कठीण गोष्ट आहे तरी सुद्धा राहुल जाधव यांनी खूप अप्रतिम काम केलं आहे. कन्टेन्ट आणि टेक्निकॅलिटीला धरून त्यांनी प्रोजेक्त हाताळलाय. त्यांची एक दिग्दर्शक म्हणून आणि एक सिनेमटोग्राफर म्हणून विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे. एक अभिनेता म्हणूनही मला त्यांच्या खूप शिकायला मिळालं. कलाकारांकडून अभिनय कसा काढून घ्यायचा याची त्यांना चांगली जाण आहे.

* प्रेक्षकांनी हा सिनेमा का बघावा ?

- कसं आहे की, मोबाईल फोन आपल्या खूप जवळची गोष्ट असते. अनेकांचा मोबाईल फोन चोरीलाही गेला असेल. लोकांसाठी हा कॉम्सेप्ट खूप जवळचा आहे असं मला वाटतं. आणि हा जो नंदन चा प्रवास आहे त्याची हरवलेली गोष्ट शोधण्याचा त्यात तो स्वत:लाही शोधत आहे. हे सुद्धा या सिनेमात बघण्यासारखं आहे.

-----------