Sign In New user? Start here.

‘White Lilly आणि Night Rider’ माझं आणि रसिकाचं ड्रिम प्रोजेक्ट - मिलिंद फाटक

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

‘White Lilly आणि Night Rider’ माझं आणि रसिकाचं ड्रिम प्रोजेक्ट - मिलिंद फाटक

Interview of director actor milind pathak
Sonali Kulkarni
Add Comment
White Lilly आणि Night Rider’ या नाटकाचे दिग्दर्शक मिलिंद फाटक यांनी हे नाटक तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर आणले आहे. रसिका जोशी आणि मिलिंद फाटक यांनी या नाटकाचे दिग्दर्शक केले होते. आता रसिकानंतर ‘White Lilly आणि Night Rider’ हे नाटक दिग्दर्शक मिलिंद फाटक हे घेऊन आले आहेत. आधीच्या नाटकात रसिका आणि मिलिंद यांच्याच मुख्य भूमिका या नाटकात होत्या. आता नव्याने रंगभूमीवर आलेल्या या नाटकात प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ह्या रसिकाची भूमिका साकारत आहेत. या नाटकाबद्दल आणि नव्याने आलेल्या अनुभवांबद्दल दिग्दर्शक मिलिंद फाटक यांच्याशी साधलेला संवाद....

   * ‘White Lilly आणि Night Rider’ या नाटकाची सुरवात कशी झाली ?

   - हे नाटक म्हणजे माझं आणि रसिकाचं एक ड्रिम प्रोजेक्ट होतं असं आपण समजूया. अतिशय इन्ट्रेस्टींग पद्धतीने या नाटकाची सुरवात झाली होती. त्यावेळ रसिकाला काहीतरी पुरस्कार मिळणार होता आणि रसिकाने काहीतरी सादर करावं अशी ती त्या ऑर्गनायझेशनची इच्छा होती. त्यासाठी आम्ही एक स्किट लिहिलं होतं. या स्किटवर नाटक होऊ शकतं असं त्यावेळी आम्हाला वाट्लं. आणि आम्ही ते नाटक लिहायला घेतलं. मुळात मी काय किंवा रसिका काय आम्ही प्रोफेशनल रायटर्स नाहीत. पण एक अ‍ॅक्टर म्हणून काम करत असताना लेखकाला काय म्हणायचं आहे हे समजून बरेचदा वाक्य बदलली जायची किंवा वाक्यांचा अर्थ लक्षात घेऊन ती वाक्य लिहायची. एवढाच काय तो लेखनाचा अनुभव.....मुळात एका अ‍ॅक्टरमध्ये एक लेखक दडलेला असतो त्याचाच शोध घेत आम्ही लिहायला सुरवात केली. नाटक लिहिताना खूप काही शिकायला मिळालं त्यामुळेच या नाटकाला ड्रिम प्रोजेक्ट असं आम्ही म्हणतो. नंतर मी आणि रसिकानेच ते डिरेक्ट केलं आणि आम्ही दोघांनीच त्यात काम केलं.

   * आधीच्या नाटकापेक्षा आताच्या नाटकात काही बदल केले आहेत का ?

   - थोडेफार बदल करण्यात आलेले आहेत, कारण जे कलाकार नाटक करताहेत त्या कलाकारांप्रमाणॆ कुठलही नाटक हे दरवेळी बदलतं. तसंच हे नाटक ३ वर्षांपूर्वी पहिल्यांदा केले होते म्हणजे २००९ साली....तर आता २०१३ साली करताना नक्कीच काळही बदललेला आहे, या नाटकातील टेक्निकल कॉन्व्हरसेशन, कॉन्व्हरसेशनमधली टेक्नॉलॉजी जी वाढत गेली आहे त्याच्याविषयी हे नाटक बोलतं, त्यातही खूप बदल झाले आहेत. त्या अनुशंगाने काही अनेक गोष्टी त्यात घालण्यात आल्या. २०१३ मध्ये ही कॅरेक्टर्स कशी असतील याचा विचार करून थोडे बदल करण्यात आले आहेत. पण हे बदल करत असताना कुठेही नाटकाचा बेसिक ढाचा बदलण्यात आलेला नाहीये.

Interview of actress sonali kulkarni

   * आधी रसिका आणि आता सोनालीसोबत त्याच नाटकात काम करण्याचा अनुभव कसा आहे ?

   - माझ्यासाठी दोन्हीही अनुभव खूप इन्ट्रेस्टींग आहेत. रसिका सुद्धा एक उत्तम अभिनेत्री होती, तिच्यातील तोच कामाचा उत्स्फुर्तपणा लकीली मला सोनालीमध्ये मिळाला. एखाद्या नाटकात आधी केलेला रोल तसाच करणं हे युज्युअली अपेक्षीत असतं. पण माझी ती अपेक्षा कधीच नव्हती कारण त्या कलाकारावरती त्याने बंधन येतं. त्यामुळे सोनाली जेव्हा काम करायला लागली त्यावेळी सोनालीला जे जे आवडतं, सोनाली जे जे करू शकते तेच यात करण्यात आले आहे. त्यामुळे सोनालीबरोबर काम करण्याचा अनुभव तितकाच आनंददायी होता जितका रसिकाबरोबर काम करताना मिळाला होता.

   * हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणायचं ठरवलं तेव्हा यातील स्त्री पात्रासाठी सोनालीच डोळ्यासमोर होती की आणखीही कुणी होतं ?

   - खरंतर सोनालीच डोळ्यांसमोर होती, पण सोनाली काम करेल असं मला वाटत नव्हतं. कारण कसं असतं की, माझ्या बाबतीतच बोलायचं झालं तर मला कधीच एक नाटक जे ऑलरेडी होऊन गेलेलं आहे, त्यात काम करायला मला आवडणार नाही, कारण त्या भूमिकांवर त्या कलाकारांची छाप पडलेली असते. ती पुसून काढणं खूप अवघड असतं आणि कित्येकवेळेला ती छाप पुसून काढण्याच्या प्रयत्नात ती कलाकृती फसूही शकते. त्यामुळे सोनाली हे नाटक करणार नाही असं मला वाटायचं. पण सोनालीचं इतकं प्रेम आहे या नाटकावर की, कुठलेही आढेवेढे न घेता ती नाटकात काम करायला तयार झाली. एक कलाकार म्हणून, रसिकाबरोबरच्या मैत्रीमुळे आणि नाटकावर असलेल्या प्रेमामुळे ती काम करायला तयार झाली याचाच मला खूप आनंद होता. सोनालीसोबतच इतरही चॉईसेस होते पण सोनालीने होकार दिल्यावर काही प्रश्नच उरला नव्हता.

Interview of actress sonali kulkarni

   * नव्याने हे नाटक रंगभूमीवर आल्यामुळे प्रेक्षकांच्या कशा आणि काय प्रतिक्रिया असतात ?

   - खरंच खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळताहेत. काही लोकांनी तर असं म्हटलं की, आम्हाला तर भिती वाटत होती की रसिकाने हे केलेलं आहे, आणि आता सोनाली काय करेल, आम्हाला आवडेल की नाही...पण प्रयोगानंतर काहींनी आम्हाला सांगितले की नाटक बघताना आम्हाला रसिकाची आठवण सुद्धा आली नाही, इतकी सोनालीने चांगली भूमिका केली आहे. काही प्रेक्षक म्हणतात की, नाटकात जे बदल केलेले आहेत फारच उत्तम केले आहेत. काही लोकं असही म्हणतात की, सोनाली आणि रसिकाची पर्सनॅलिटी यात जमिन आसमानचा फरक आहे. पण तेव्हा रसिका असताना असं वाटायचं की, हेच दोघे करेक्ट आहेत नाटकासाठी आणि आता सोनाली आल्यानंतरही हीच जोडी करेक्ट असल्याचं वाटतं. त्यामुळे लोकांच्या खूपच चांगल्या प्रतिक्रिया आहेत. मला खरंतर खूप भिती वाटत होती. आमचे आता ५-६ प्रयोग झालेत तरी सुद्धा एकही निगेटीव्ह प्रतिक्रिया आम्हाला मिळाली नाही.

   * White Lilly आणि Night Rider’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचं काय नेमकं कारण होतं ?

   - अनेक लोकांचं हे म्हणनं होतं. तसंच माझही मन होतंच. कारण इतकं चांगलं नाटक मी गेल्या तीन वर्षात कुठलंच बघितलेलं नाहीये. एकाक्षणी रसिका गेल्यानंतर हे नाटक मी कुणाबरोबरच करू शकत नाही असं वाटत होतं. मधे दोन वर्ष गेली त्यात मीही अनेक वेगवेगळी नाटकं केली. वेगवेगळी नाटकं बघत असताना सुचलं की, आम्ही केलेलं नाटक आजच्या काळाला सुसंगत आहे. ब-याचदा अनेक लोक मला विचारायचे की, अहो व्हाईट लिली नाटक परत कधी येणार आहे. त्यामुळे मलाच असं वाटलं की हे नाटक परत करायला पाहिजे.

   - अमित इंगोले