Sign In New user? Start here.
 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

देवेंद्र पेम यांना ‘धामधूम’साठी ऑल द बेस्ट

  रंगभूमीवरील आपल्या नाटकांतून इंडस्ट्रीतल्या अनेक नामांकित कलाकारांना घडविणारे, नवी ओळख, देणारे दिग्दर्शक म्हणून देवेंद्र पेम यांचे नाव आदराने घेतलं जातं. त्यांच्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाने हजारो प्रयोग करत प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान मिळवलं. एकांकिका, राज्य नाट्य़ स्पर्धा, प्रायोगिक, व्यावसायिक नाटक यानंतर देवेंद्र पेम, मराठी चित्रपट दिग्दर्शनाकडे वळालेत. त्यांचे दिग्दर्शन असलेला ‘धामधूम’ हा पहिला चित्रपट ११ ऑटोबरला प्रदर्शित होतोय. यनिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

   * ‘ऑल द बेस्ट’ नाटकानंतर इतक्या वर्षांनंतर ‘धामधूम’ हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचे कसे ठरविले ?

   - चित्रपट दिग्दर्शित करायचा ही मनात खूप दिवसापासूनची इच्छा होती. पण तो पूर्ण तयारीनिशीचं करायचा हे पक्क ठरविलं होतं. त्यादरम्यान नाटकांचीही बरीच काम सुरू होती. ब-याच जणांना माहित नसेल की, ‘ऑ द बेस्ट’ नाटक १३ भाषांमध्ये भाषांतरीत झाले असून ही १३ भाषेंमधील नाटकं सुद्धा मीच दिग्दर्शित केली. या सगळ्या प्रयोगातून वेळ मिळेल तसे मी चित्रपटासंबंधीचे माझे प्रशिक्षण सुरू केले होत. त्यासाठी फिल्म डिप्लोमा पूर्ण केला, स्क्रिप्टींग केले, अझिझ मिर्झा यांच्या ‘किसमत कनेक्शन’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. अशा संपूर्ण तयारीनिशी मी हा मल्तीस्टारकास्ट असलेला चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

Interview of director Devendra Pem

   * ‘धामधूम’ चित्रपटाविषयी काय वेगळेपण सांगाल ?

   - अतिशय धमाल-विनोदी असा चित्रपट आहे. एका छोट्या गैरसमाजामुळे चार कुटुंबात होणारा गोंधळ आणि गंमतीशीर प्रसंगामुळे झालेला विनोद अशी कथा यात गुंफण्यात आली आहे. मराठीतील अनेक आघाडीचे कलाकार या चित्रपटातून एकत्र आले असून कलाकारांच्या बहारदार अभिनयाची जमून आलेली भट्टी यानिमित्ताने प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

   * भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्या करीअरची सुरूवात तुमच्या नाटकांपासून झाली ? आज इतक्या वर्षांनंतर त्यांच्यासोबत आणि इतर कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ?

   - आज दोन्ही कलाकार स्टार झाले आहेत. माझ्यासाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. या दोघांसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. खूप मजा आली. त्यांच्या कामात छान प्रगती झाली आहे. त्यांची अभिनय क्षमता मला ठाऊक असल्याने चित्रपटातील माझ्या कॅरेक्टरसाठी काय अपेक्षित आहे ते सांगणे अधिक सोपे झाले. बाकी सगळ्याच कलाकारांनी खूप सहकार्य केले.

   * निर्माते रविंद्र वायकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ?

   - खूपच छान ! त्यांनी पूर्णपणे मला कामाचे स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळे एवढी मोठी स्टारकास्ट घेऊन, त्यांच्या तारखा जुळवून शुटींग करायचे, त्यासाठी उत्तमोत्तम लोकेशन उपलब्ध करून देणे. याचे श्रेय आमच्या निर्मात्यांना देईन. त्यांनी या चित्रपटाच्या सुरूवातीपासूनच कोणतीही तडजोड न करता जी लागेल ती मदत करून हा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी मला सहकार्य केले. त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता.

Interview of director Devendra Pem

   * ‘धामधूम’ ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय, प्रेक्षकांना काय सांगाल ? आणि आगामी काळात कोणत्या माध्यमात काम करणे पसंत करणार आहात ?

   - ‘धामधूम’ हा मल्टीस्टारकास्ट असलेला विनोदी चित्रपट आहे. चित्रपट तयार करताना जितका आनंद आम्हाला झाला त्याहून अधिक तुम्हाला तो पडद्यावर पाहताना होईल हे नक्की! आगामी काळात नाटक आणी चित्रपट दोन्ही माध्यमांत समांतर कार्यरत राहण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ‘धामधूम’ हा माझा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल याची खात्री आहे, तेव्हा चित्रपटगृहात जाऊन त पहा हेच मी सांगेन.

- अमित इंगोले