Sign In New user? Start here.

 

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

‘माझा मी’ने मलाही खूप काही शिकवले - माधव देवचके

  अलिकडे मराठी-हिंदी मालिका आणि मराठी सिनेमांमध्ये एक चेहरा चांगलाच गाजत आहे ज्याचं नाव माधव देवचक्के...‘काटा रूते कुणाला’, ‘घे भरारी’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘देवयानी’, ‘दिल्या घरी सुखी रहा’‘ आणि ‘तूझं माझं जमेना’ या गाजलेल्या मराठी मालिका, ‘हमारी देवरानी’, ‘बिंड बनूंगा’, ‘गुमराह’ सारख्या हिंदी मालिका आणि ‘ईश्वरी’, ‘विठाबाई’, ‘जय महाराष्ट्र बठिंडा’, ‘एकुलती एक’ या मराठी सिनेमांमध्ये माधवने महत्वाच्या भूमिका केल्यात. लवकरच ‘माझा मी’सोबतच त्याचे आणखीही काही मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये माधवने अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, ‘माझा मी’ या सिनेमात माधव एक अतिशय वेगळी अशी ग्रे शेड असलेली भूमिका साकारत आहे. या भूमिकेबद्दल माधवसोबत केलेली बातचीत....

   * आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा ‘माझा मी’ या सिनेमात तूझी कशी आणि काय भूमिका आहे?

   - ‘माझा मी’ या सिनेमात एक अतिशय वेगळ्या प्रकारची भूमिका मला करायला मिळाली. आत्तापर्यंत मी खूप लवी-ड्वी असे हिरोचे रोल, इनोसन्ट मुलाचे रोल केलेत. एक रफ बॉस सुद्धा करायला मिळाला होता. आणि यातील अतिशय वेगळी अशी भूमिका मी साकारतो आहे. थोडीशी अशी ग्रे शेड असलेली ही भूमिका आहे. या भूमिकेबद्दल मी जास्त काही आत्ताच बोलणार नाही कारण प्रेक्षकांनी सिनेमातच सर्व बघावं अशी माझी इच्छा आहे.

   * सिनेमाबद्दल काय सांगशिल ?

   - खूप चांगली कथा सिनेमाची आहे. परिवारातील अडचणी, जनरेश गॅपमुळे निर्माण होणारे वाद...मोठ्यांकडून शिकायला मिळालेल्या गोष्टींचा काय प्रभाव होतो. तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रगती करायची असेल तर कोणत्या मार्गाने जावं. कोणत्या चुका टाळाव्यात. अशा अनेक कौटुंबिक गोष्टी या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत ज्यातून आजच्या तरूणांना खूप काही शिकायला मिळले. आणि प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.

   * ‘माझा मी’ या सिनेमाचं वेगळेपण काय आहे ?

   - हा सिनेमा बघताना तुम्हाला असा रटाळ किंवा कुठेही थांबल्यासारखी वाटणार नाही कारण फिल्म मध्ये सतत काहीतरी वेगळं घडत राहतं. एका माणसाची कथा यात सांगण्यात आली आहे. प्रसाद दादाने मुख्य भूमिका अतिशय चांगली निभावली आहे.

   * प्रसाद, मनीषा, विनय आपटे, उदय टिकेकर या सर्वांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता ?

   - मनीषा बरोबर ही माझी दुसरी फिल्म आहे. प्रसाद दादा बरोबर ही माझी पहिली फिल्म आहे. खूप चांगला अनुभव होता. युनिट खूप छान होतं. दिग्दर्शकांनी खूप चांगला सपोर्ट केला कधीही कोणती अडचण येऊ दिली नाही. डिरेक्टरला जे डिपिक्शन हवं होतं ते परफेक्ट होतं. त्यामुळे काम करणं सोपं होतं.

- अमित इंगोले