Sign In New user? Start here.
 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

तीन जनरेशनची भूमिका - मनीषा केळकर

  कला क्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबातील मनीषा केळकर या अभिनेत्रीच्या अभिनयाची मुहूर्तमेढ कॉलेज विश्वापासून रोवली गेली. वडिल, राम केळकर हे मराठी-हिंदी फिल्मचे प्रसिद्ध कथालेखक, आई कथ्थक डान्सर आणि अभिनेत्री...अर्थातच तिला अभिनयाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. अभिनय, नृत्य, लेखन हे बघतच लहानाची ती मोठी झाली. ‘भोळा शंकर’, ‘ह्यांचा काही नेम नाही’, ‘घरट्यासाठी सारं काही’, ‘मिशन पॉसिबल’ अशा विविध मराठी तसेच ‘लॉटरी’ आणि ‘बंदूक’ या हिंदी सिनेमांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत. ‘माझी मी’ सिनेमात मनीषा एका पावरफुल नगरसेवकाच्या मुलीची भूमिका करीत असून ती एक हाय एज्युकेटेड, कार्पोरेट विश्वातली तरूणी आहे. या भूमिकेबद्दल मनिषासोबत साधलेला संवाद...

   * ‘माझा मी’ या सिनेमातील तूझी भूमिका काय आहे ?

   * मी या सिनेमात रेसम नावाच्या मुलीची भूमिका करतीये. पहिल्यांदा मला जेव्हा ही कथा ऎकवण्यात आली तेव्हा मला पहिले अट्रॅक्ट झालं ते हे की, हे माझं कॅरेक्टर तीन जनरेशनमध्ये विभागलेलं आहे. एका फिल्ममध्ये तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या भूमिका करायला मिळताहेत म्हणजे वॉव...! ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला काय हवं असतं...! सर्वात पहिले मी एक कॉलेजची मुलगी आहे. एका श्रीमंत बापाच्या मुलीत असलेल्या मस्ती, मजा, अल्लडपणा, हायली एज्युकेटेड ह्या सर्वच गोष्टी तिच्यात आहेत. पण जिद्दीपणाही तेवढाच आहे जे पाहिजे ते पाहिजेच. दुसरा भाग आहे तो तिच्या लग्नानंतरचा...ती नुसती मॅरीड नाहीतर एक कॉर्पोरेट सेक्टरमधील आहे. एका मोठ्या कंपनीची बॉस म्हणून एक वेगळाच अ‍ॅटीट्यूड तिच्या स्वभावात आहे. तिसरं होतं ते एका पंचवीस वर्षाच्या मुलाची आईचं आणि एका सुनेच्या सासूचं काम...जे मी पहिल्यांदाच करते आहे.

   * जसं तू म्हणालीस पहिल्यांदाच अशी भूमिका करतेय, काय तयारी तू त्यासाठी केलीस ?

   - खरंतर आमचे डिरेक्टर, प्रोड्युसर आणि मेकअप मन या सर्वांनी त्यासाठी खूप मदत केली. सोबतच खूप चित्रपट मी पाहिलेले आहेत. अर्थातच माझी आई जिवनकला केळकर यांच्याकडूनही मला खूप शिकायला मिळालं. आणि एक कलाकार म्हणून मी नेहमी शिकत रहाते. असं मी कधीच म्हणणार नाही की, हो मला हे पूर्णपणे येतं. कुणाकडूनही काहीना काही शिकायला मिळतच असतं. एक स्पॉट्बॉय सुद्धा कधी कधी तुम्हाला शिकवून जातो.

   * तूझी एक अभिनेत्री आणि बाबा लेखन आहेत याचा तूला फायदा होतच असेल..?

   - हो नक्कीच...खूप फायदा होतो. मी खूप नशीबवान आहे की, मला असे आई-बाबा मिळाले. यांच्य शिकवणीचा फायदा मला फक्त फिल्म्ससाठीच नाहीतर जीवनातही होतोच. माझे बाबा जेव्हा यशाच्या शिखरावर होते तेव्हा ते सांगायचे, मनीषा हा ग्राफ कधीही खाली जाऊ शकतो. पण एक माणूस म्हणून तुमचं वागणं निट असणं गरजेचं आहे. मला अ‍ॅटिट्यूडची शिकवणंच कधी मिळाली नाही.

   * प्रसाद ओकबरोबर पहिल्यांदाच तू काम करतेय कसा एकंदर अनुभव होता ?

   - लव्हली...! आधी तर आमची भेट नव्हती झाली भेट झाली ती डिरेक्ट सेटवर... सुरवातीला खूप शांत शांत होता. एका कोप-यात झाडाखाली आपल्या मोबाईलसोबत खेळत बसायला. मग मीच त्याच्याकडे गेले आणि विचारले की, अरे तू इतका कसा शांत...? त्यानंतर त्याच्या बायकोला सुद्धा आम्ही सांगितले की हा खूप शांत असतो. ह्या गोष्टीचा त्याला खूप आनंद झाला. मग आम्ही खूप धमाल करायला लागलो. अ‍ॅज अ अ‍ॅक्टर तो खूप चांगला आहेच त्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि अ‍ॅज अ ह्युमन सुद्धा तो खूप चांगला आहे. मला खूप सपोर्ट त्याने केला.

   * दोन अभिनेत्री आणि एक अभिनेता या सिनेमात आहे, काय केमिस्ट्री आहे सर्वांमध्ये ?

   - सिनेमात प्रसाद आणि मी कॉलेजचे फ्रेन्डस आहोत. जशी मी प्रत्यक्षात आहे तशीच बिनधास्त आणि मॉडर्न मी सिनेमात आहे. मला प्रसादशी प्रेम होतं. रेशमचं कॅरेक्टर इतकं स्ट्रॉंग आहे की, एका लेव्हलपर्यंत तिचं वागणं प्रसादला पटत नाही. मग त्यातून निर्माण होणारा ताणतणाव...त्यातून वेगळं होणं, मग पुन्हा मुल झाल्यावर एकत्र येणं. असे कितीतरी व्हेरिएशन यातील भूमिकांना आहेत.

   * या सिनेमाचं वेगळेपण काय सांगशील ?

   - तीन वेगवेगळ्या पिढ्यांच्या भूमिका प्रसाद, मी आणि समीधाने केल्या आहेत. त्यामुळे हे वेगळेपण बघताना प्रेक्षकांना मजा येईल. आणि प्रेक्षकांना नक्कीच हा सिनेमा आवडेल याची मला खात्री आहे.

- अमित इंगोले