Sign In New user? Start here.
 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण होतंय - निनाद वनगे

   ‘माझी मी’ या सिनेमाचे दोन निर्माते म्हणजे अतुल वनगे आणि निनाद वनगे...यापैंकी निनाद वनगे यांनी या सिनेमाच्या निर्मितीच्या जबाबदारी बरोबरच सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुद्धा पार पाडली आहे. जसा त्यांच्या सिनेमा निर्मितीचा पहिलाच अनुभव आहे तसाच दिग्दर्शनाचाही श्रीगणेशा या सिनेमाच्या माध्यमातून झालाय. गेली कित्येक वर्ष हा सिनेमा करायचा असा विचार चालू असताना आता या वनगे बंधूंचं सिनेमा तयार करण्याचं स्वप्न पूर्ण होतंय, या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...

   * ‘माझा मी’ ह्या सिनेमाबद्दल सांगा.

   - या सिनेमाची कथा माझे भाऊ अतुल वनगे यांनी लिहिलेल्या एका कवितेवर आधारीत आहे. जे या सिनेमाचे निर्माते सुद्धा आहेत. अगदी सुंदर कविता आहे ती...त्या कवितेला समोर ठेवूनच हा सिनेमा उभा राहिलाय. एका माणसाचं जीवन काय असतं, तो नातेसंबंध सांभाळून कसा जगतो. अशा आशयाची कथा या सिनेमात दाखवली आहे.

   * सिनेमा करण्यासाठी कविता पुरेशी होती का?

   - कवितेवर सिनेमाची निर्मिती आणि डिरेक्शन करायचं हे आधीपासून ठरलेलं होतं, पण इतक्या लवकरच करणार हे माहित नव्हतं. बस्स काम हाती घेतलं आणि सर्व कामं सुरळीत होत गेले. आता सिनेमा लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळेल.

   * दिग्दर्शनाचा पहिलाच अनुभव असल्याने कसं मॅनेज केलं ?

   - खरंतर सिनेमा दिग्दर्शनाचा हा माझा पहिलाच अनुभव असला तरी मी कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांचं, एकांकीकांचं दिग्दर्शन केले होते. त्या अनुभवाच्या जोरावर सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळू शकलो. शिवाय टीममध्ये असलेल्या अनेक अनुभवी कलाकार आणि तंत्रज्ञांची मदत सुद्धा मिळाली.

   * सिनेमाची पहिलीच निर्मिती आणि पहिलंच दिग्दर्शन कसा एकंदर अनुभव होता ?

   - खूप चांगला अनुभव होता. टेक्निकली आमची टीम खूप स्ट्रॉंग आहे. अनेक अनुभवी टेक्निशिअन आमच्या टीममध्ये आहे. परेश ढुमे सारखे मोठे सिनेमटोग्राफर आहेत. काही कलाकार नवीन आहेत मात्र बाकीचे सर्व खूप अनुभवी कलाकार आणि तंत्रज्ञ आहेत. सर्वच माझ्यासाठी नवीन असल्याने सर्वांबरोबर काम करण्यात खूप मज्जा आली. खूप काही शिकायला मिळाले.

   * तिन वेगवेगळ्या पिढ्य़ांच्या मुख्य भूमिकेसाठी प्रसाद ओक याचीच निवड का केलीस ?

   - खरंतर जेव्हापासून ही कथा लिहिणं सुरू होतं तेव्हापासून या भूमिकेसाठी प्रसादचाच विचार आम्ही केला होता. निर्माते अतुल वनगे यांनाही या भूमिकेसाठी प्रसादवर पुर्णपणे विश्वास होता. या भूमिकेतील वेगवेगळ्या वयातील छटा साकारणारा एक प्रतिभावंत कलाकार म्हणून आम्ही फक्त प्रसादलाच डोळ्यांसमोर ठेवले होते. आणि तो आमच्या विश्वासावर पूर्णपणे खरा उतरला असून अतिशय चांगला अभिनय त्याने या सिनेमासाठी केला आहे.

   * ह्या सिनेमातून काय वेगळेपण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ?

   - सध्याचे जर सिनेमे तुम्ही बघीतले तर ते सर्व पर्टीक्युलर जॉनरचे सिनेमे आहेत. एखादा कॉमेडी तर एखादा लव्हस्टोरी आहे. पण आमच्या सिनेमाला तसं एकच अंग नाहीये. त्यात कॉमेडी, सस्पेंन्स, ड्रामा, इमोशन्स म्हणजे हा एक कौटुंबिक सिनेमा आहे जो एक परिवार एकत्र बसून बघू शकतील. प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल असा प्रयत्न आम्ही केला आहे.

- अमित इंगोले