Sign In New user? Start here.

‘सिंक साऊंड’ पुनश्च मराठी चित्रपटात रूजतोय : राशी बुट्टे

Interview of rashi butteचित्रपट म्हंटल की आपल्या डॊळ्यासमोर उभ राहातात ते चित्रपटातील मुख्य कलाकार किंवा चित्रपट दिग्दर्शक, गायक. पण या चित्रपट निर्मीतीत अनेक लोंकाचा हात असतो मग ते कॅमेरामन पासून ते अगदी मेकपमॅन पर्यंत. अशाच प्रकारे चित्रपटातील संभाषण तुम्हाला स्पष्ट ऎकू येतात ते साऊंड इंजिनीयरमुळे. काही वर्षातच साऊंड इंजिनीयर म्हणून मराठी चित्रपट्सृष्टीत एक नाव समोर येत आहे ते म्हणजे राशी बुट्टे यांच. राशी बुट्टे यांनी रितेश देशमुख यांचा यलो, रवी जाधव यांचा टाईमपास, कॅपीचिनो, कापूस कोंड्याची गोष्ट, प्रेम म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे....., हेमंत देवधर यांचा अरे आवाज कुणाचा....., बालक पालक सारखे अनेक चित्रपटांमध्ये साऊंड इंजिनीअर म्हणून काम केलं आहे. त्यांनी अत्ताची सिंक साऊंड ही पध्दत मराठी चित्रपटांमध्ये रुजवली. मुळातच सिंक साऊंड ही पध्द्त पूर्वी पासून बोलपट चित्रपटांमध्ये वापरली जात होती पण क्लिअ‍ॅरीटी हवी म्हणून डबिंग

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

‘सिंक साऊंड’ पुनश्च मराठी चित्रपटात रूजतोय : राशी बुट्टे

चित्रपट म्हंटल की आपल्या डॊळ्यासमोर उभ राहातात ते चित्रपटातील मुख्य कलाकार किंवा चित्रपट दिग्दर्शक, गायक. पण या चित्रपट निर्मीतीत अनेक लोंकाचा हात असतो मग ते कॅमेरामन पासून ते अगदी मेकपमॅन पर्यंत. अशाच प्रकारे चित्रपटातील संभाषण तुम्हाला स्पष्ट ऎकू येतात ते साऊंड इंजिनीयरमुळे. काही वर्षातच साऊंड इंजिनीयर म्हणून मराठी चित्रपट्सृष्टीत एक नाव समोर येत आहे ते म्हणजे राशी बुट्टे यांच. राशी बुट्टे यांनी रितेश देशमुख यांचा यलो, रवी जाधव यांचा टाईमपास, कॅपीचिनो, कापूस कोंड्याची गोष्ट, प्रेम म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे....., हेमंत देवधर यांचा अरे आवाज कुणाचा....., बालक पालक सारखे अनेक चित्रपटांमध्ये साऊंड इंजिनीअर म्हणून काम केलं आहे. त्यांनी अत्ताची सिंक साऊंड ही पध्दत मराठी चित्रपटांमध्ये रुजवली. मुळातच सिंक साऊंड ही पध्द्त पूर्वी पासून बोलपट चित्रपटांमध्ये वापरली जात होती पण क्लिअ‍ॅरीटी हवी म्हणून डबिंग पध्दत सुरू झाली पण राशी यांनी पुन्हा ‘सिंक साऊंड पध्दत मराठी चित्रपटांन मध्ये रूजवत आहेत.राशी बुट्टे यांच म्हणंन आहे की मुळात मला बालक पालक या चित्रपटाच्या वेळी रवि जाधव आणि यलो चित्रपटाच्या वेळी महेश लिमये यांनी संधी दिल्यामुळे होऊ शकल आहे. कारण या दिग्दर्शकांनी जर संधी दिली नसती तर हे अशा प्रकारच काम करण शक्यच झालं नंसत अशाच काही गोष्टी आणि अनुभव जाणून घेऊया आवाजाच किमयागार राशी बुट्टे यांच्या बद्दल. .राशी बुट्टे यांनी झगमगशी केलेली खास बातचीत

१. राशी तुम्ही या क्षेत्रात कसे आलात?

मी या क्षेत्रात यायच ठरवल नव्हत मुळात मी पुण्यात आलो ते चित्रपटात अभिनेता होण्यासाठी पण सुरवातीला माझी परिस्थीती एवढी वाईट होती की मी जो विचार करून पुण्यात आलो होतो ते लगेच शक्य नव्हत. यांच दरम्यान सतीश तारेंच्या ग्रुपने ‘टूरटूर’ नाटकाचे प्रयोग करायचे ठरवले आणि त्यात मी प्रवेश मिळवला. त्यातल्या ‘बंगाली या पात्रासोबत ‘तरून तुर्क, म्हातारे अर्क, तिन चोक तेरा अशा नाटकांत जिथ काम मिळाल तिथे करत गेलो.पण यामधून फार कमी पैसे मिळत होते. त्यामुळे सचिन वाघ यांच्यासोबत सहाय्यक ध्वनी लेखक म्हणून काम सुरू केले. कामावर असणारी निष्ठा आणि सतत नविन गोष्टी शिकण्याचा ध्यास यामुळे मी मालिका आणि चित्रपट दिग्दर्शना पर्यंत पोहचलो आणि आता मी स्वतंत्रपणे ‘ध्वनी लेखक’ म्हणून काम करू लागलो आहे. किंबहूना लोंकानकरवी तशी मागणी यायला लागली त्यामुळे ध्वनी लेखक झालो आणि सचिन वाघ यांच्या सोबत पूर्णवेळ काम पाहू लागलो.तस पहायला गेल तर आपल्याला चित्रपटांची दुनिया ग्लॅमरस वाटते पण माझ काम हे नॉन ग्लॅमरस पण तेवढच महत्वांच आहे. मुळात हे काम करताना तुमच्यात खूप पेशन्स पाहिजेत. ध्वनी लेखकाची सुरवात ही ‘बूम माईक पकडण्यापासून होते. आता ‘लेपल माईक’ आल्याने बूम माईक पकडण्याची जवाबदारी कमी झाली आहे. सुरवातीच्या काळात ८ ते १० मिनिट हात न हालवता उभं राहावं लागत होतं.

Interview of rashi butte

२. ‘सिंक साऊंड’ म्हणजे काय़?

सिंक साऊंड पध्दत ही जुनी आहे पण आता ती नविन प्रकारे चित्रपटांनमध्ये आम्ही वापरतॊ. तुम्ही पाहात असाल की पूर्वीच्या चित्रपटांमधले आवाज ऎकू यायचे पण ते स्पष्ट नव्हते. त्यामुळे आपल्या इकडे डंबिगची पध्दत सुरू झाली पण डंबिगचा तोटा असा होतो की प्रत्येक वेळी निर्मात्याला कलाकारांच्या तारखा मिळतीलच असं नाही आणि ऑन दी स्पॉट जे कलाकांराचे बोलण्यातून भाव येतात ते डबिंग च्या वेळेस येतीलच असे नाही. आजकल चांगल्या प्रकारचे माईक, नविन इक्विपमेंटस आल्यामुळे यामध्ये खुप क्लियारीटी आली आहे. पुर्वीच्या डबिंग पेक्षा सिंक साऊंड ही पध्दत चांगली. आता टाईमपास पासून जे चित्रपट आले आहेत त्यामध्ये जास्त करून ‘सिंक सांऊड’ वापरल गेलं आहे.

३. तुम्ही ध्वनी लेखकाचे शिक्षण घेतल आहे का?

मी कोणत्याही प्रकारचे तांत्रिक शिक्षण घेतल नाही मेहनत करायची जिद्द असल्याने आवाज हा ‘स्टिल क्लिअरच’ असला पाहिजे याकडे माझे पूर्ण लक्ष होते. कारण आवाज रेकॉर्ड होताना आवाजामध्ये डिफेक्ट असेल तर पुन्हा या गोष्टी रिपीट कराव्या लागतात. उदाहरण सांगायच म्हटल तर ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेच्या शुटींगच्या वेळी खूप पाऊस येत होता. त्यातच मालिकेचे शुटींग ‘सिंक साऊंड’ वर करायचे असल्याने त्रास होत होता. त्यावेळी पोती आणि काही कापडी पिशव्या जमा करून सेटच्या भवती जाडसर अंथरल्यामुळॆ पावसाचा आवाज बंद झाला आणि कलाकारांचा आवाज क्लिअर ऎकू यायला लागला. अशा अडचणी या क्षेत्रात वारंवार येतंच असतात, त्यावर त्या त्या वेळी उपलब्ध साहित्यांच्या आधारे मार्ग काढण महत्वाच असत. पण मला वाटत आजकल ‘ध्वनी लेखकाचे’ तांत्रिक शिक्षण उपलब्ध आहे तर ते जरूर घ्याव कारण याचा नक्कीच फायदा होतो.

४.साऊंड इंजिनीयर व्यतीरिक्त तुम्ही अजून काय काम करता?

मी साऊंड इंजिनीयर व्यतीरिक्त मास-कम्यूनिकेशनच्या विध्यार्थाना साऊंड इंजिनीयरिंग बद्दल शिकवतॊ. आजकलचा अभ्यासक्रम हा व्यवसाईकते कडे झुकणारा असल्यामुळे आपले अनुभव विध्यार्थांशी शेअर करता येतात आणि त्याच बरोबर आजची मुल ही तेवढीच हुशार असल्यामुळे त्यांना शिकवण पण चॅलेंज असत. त्यांची ग्रांसपिंग पॉवर चांगली असल्यामुळे त्यांना शिकवण तस सोप जात.

Interview of rashi butte

५. मुंलाना शिकवण्याचा अनुभव कसा होता?

मला अजुनही आठवतय मी स्वत: टेक्निकल शिक्षण न घेतल्यामुळे टेक्निकल शब्द मला महिती नव्हते. ते जाणून घेण्यासाठी मी त्यावेळी चार पाच इंजिनीयर सोबत मिटींग घेउन ते शब्द जाणून घेतले आणि बसून नोट्स काढल्या. पहिल्या दिवशी भिती वाटत होती, नाही म्हंट्ल तरी हे वातावरण माझासाठी नविन होत, पण मी आणि मॅडम वर्गात गेलो आणि मॅडमनी माझी ओळख करून दिली त्यांनतर मी त्या कॉन्फरन्स हॉल मध्ये मुंलानकडे पाहून मान हलवली त्यांना ही काही कळेना नंतर मॅडम कडे पाहून मान हलवली त्यांना ही काही कळॆना आणि मग मी म्हणालो जर अता मी फक्त साईन लॅग्वेज मध्ये बोलतोय ते तुंम्हाला कळत नाहीए कारण याला आवाज नाही अशाच प्रकारे चित्रपटात ही आवाज नसतातर चित्रपट तेवढया योग्य प्रकारे समजले नसते. एवढच मी बोललो आणि मुंलानी माना डोलावल्या मग माझ्या लक्षात आलं आपल्याला काय म्हणायच आहे ते मुलांना समजलं आणि माझा कॉन्फिडन्स वाढत गेला पण आत मी रूळलोय, पण या शिकवण्यामधून मला ही खुप गोष्टी शिकायला मिळत आहेत.

६.या तीन-चार वर्षात तुमची वेगळी ऒळख निर्माण झाली आहे त्याबद्दल काय सांगाल?

खुप छान वाटत तुमच्या कामामुळॆ लोक तुंम्हाला ओळखतात ही फिलींगच खूप छान आहे. मला अजूनही आठवत मकरंद अनासपूरेंचा मला फोन आला होता आणि त्यांनी माझा कामाच खूप कौतूक केलं आणि ते मला म्हणाले तू चांगल नाव कमवशील आणि मकरंद म्हणाले तसं आज होतय यांचा मला आनंद आहे. याहूनही मॊठी गोष्ट म्हणजे मला एकदा सचिन पिळगांवकर यांचा फोन आला त्यांनी मला ‘एकुलती एक’ चित्रटाच साऊंडच काम करणार का? विचारल त्यांचा फोन आला म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती मी लगेच हो म्हणालो पण आमच्या तारखा न जुळल्यामुळे ते काम करू शकलो नाही पण मी माझ काम संपताच त्यांचा अशिर्वाद घेऊन आलो हा माझा आयुष्यातल्या खुप चांगला अनुभव होता.

-----------