Sign In New user? Start here.

 

Interview of rishi saksenaया मराठी मालिकेने माझी खरी ऒळख निर्माण केली आहे

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

या मराठी मालिकेने माझी खरी ऒळख निर्माण केली.

"काहे दिया परदेस" या मालिकेव्दारे घरा घरात पोहचलेला शिवकुमार शर्मा म्हणजेच रिशी सक्सेना. ६ फूट उंची चेह-यावर असणारे निरागस भाव आणि मालिकेतील अभिनयामुळे त्याने मराठी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलं आहे. मालिका सुरू झाल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये मुलीं सोबतच मुलांचीही तेवढीच भर आहे. अशा या रिशी सक्सेनाची ही खास मुलाखत.

१. तू मुळचा कुठला आहेस?

मी मुळचा जयपूरचा आहे. गेली ५ वर्षे मी मुंबईत रहात आहे. जेव्हा नवीन आलो होतो तेव्हा मी काही अभिनयाचे वर्कशॉप केले होते. मग पुन्हा जयपूरला गेलो आणि नाटकांमध्ये सहभाग घेतला. त्याचबरोबर शॉर्ट फिल्म केल्या. या गोष्टी करताना मला खुप आनंद मिळत होता आणि मग मी ठरवलं की आता हेच आपल प्रोफेशन असणार आहे. अभिनय मला आवडत होता म्ह्णून मी अभिनय करायचं ठरवलं. मी मुंबईला परत आलो. काही हिंदी मालिंकामधून छोट्या भूमिका केल्या जसेकी ’ये कहां आ गये हम’, ’स्वामी टीम, ’सावधान इंडिया, ये हे महोब्बते आणि आता का हे दिया परदेस. का हे दिया परदेस या मराठी मालिकेने माझी खरी ऒळख निर्माण केली आहे.

२. तू हिंदी असून मराठी मालिकेत कसा आलास?

मला वाटत काही गोष्टी देवानं आधीच ठरलेल्या असतात. माझा एक मित्र आहे जो या मालिंकासाठी को-ऑर्डीनेटर म्हणून काम करतो. मी त्याला ४ ते ६ महिन्यांपूर्वी सांगितल होतं की माझ्यासाठी काही रोल असेल तर सांग. एक दिवस, त्याचा फोन आला आणि त्याने सांगितले की मराठी मालिकेसाठी हिंदी कॅरक्टरची गरज आहे. मी लगेच ऑडीशन लगेच लाईनअप करून घेतली. ऑडीशन दिली आणि दुस-या दिवशी मला त्यांचा फोन आला की मी मुख्य रोलसाठी सिलेक्ट झालो आहे. सुरवतीला मला माहिती नव्हत की मी मेन रोल साठी सिलेक्ट झालो आहे पण नंतर समजताज मला अजुनच आनंद झाला.

३. मालिकेत दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?

खर सांगायच झालं तर त्यांच्या बद्दल आदरयुक्त भिती आहे. मी जेव्हा पहिल्यांदा मोहन जोशी सरांसमोर उभा होतो तेव्हा मी खुप नर्व्हस झालो होतो. त्यांचा अभिनय पाहून मी मला अभिनय करायचा आहे हे विसरून गेलो. मी काही क्षण त्यांच्याकडे पाहात राहिलो. पण नंतर मोहन संरानी चिडचिड नाही केली त्यांनी मला व्यवस्थित समजावून सांगितले. त्यानंतर मला थोडा कॉन्फीडंन्स आला आणि मी तो माझा सीन पूर्ण केला. आताही मला काही मराठी डायलॉग समजत नसतील तर मोहन सर मला चांगल समजावून सांगतात. गोखले मॅम ही तेवढ्याच प्रेमळ आहेत. मी स्वत:ला खुप लकी समजतो की मला अशा कलांकारासोबत काम करायला मिळत आहे.

४. सायली आणि तुझं ट्युनिंग कस आहे?

सायली म्हणजेच मालिकेतील गौरी. आमच चांगल जमत ती मला मराठी शिकवत असते. आणि सेटवर ही आमची दंगा मस्ती सुरू असते. सुरवातीला सायली सोबत कर्म्फटेबल होता याव म्हणून दिग्दर्शाकांनी १५ दिवसाचे ट्रेनिंग ठेवल होत. यामध्ये अनेक नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या. त्यामुळे जेव्हा आमंच शुटींग सुरू झालं तेव्हा सायली सोबत काम करताना काही समस्या नाही आली उलट मला तिच्यासोबत काम करणं खुप सोप जात आहे?

५. तुझ्या फॅन्सची लिस्ट अचानकच वाढली आहे आणि त्यामध्ये मुली जास्त आहेत.

(मोठ्याने हसून) बरोबर आहे तुमचं. अचानकच माझ्या फॅन्सची संख्या वाढली आहे. त्यामध्ये मुलींची सख्या जास्त आहे. का ते माहीत नाही (पुन्हा हसतो). माझ्या सोशल नेटवर्किंग अकाऊंट वर अचानक फ्रेंड रिक्वेस्टचा भडीमार सुरू झालाय. अनेक मुलींचे मॅसेज येतायत पण हे सर्व सांभाळताना माझी तारांबळ उडत आहे. हे सर्व पाहून खुप भारी पण वाटतय, कारण असं काही होईल याची मी अपेक्षा केली नव्हती.

६. ख-या आयुष्यात शिव कसा आहे?

मी ख-या आयुष्यात जरा शिव सारखा आहे. मला लोकांन सोबत मैत्री करायला आवडते. गाणी ऎकायला, क्रिकेट खेळायला आवडत. पण आजकल मला खेळायला वेळ मिळत नसल्याने मी फक्त सध्या क्रिकेट पाहण्याचा काम करतो आणि चित्रपट पाहायला मला खुप आवडत. जेव्हा माल शुटींग मध्ये एखादा दिवस सुट्टी मिळते तर मी निंवात घरी बसून दिवसभर चित्रपट पाहतो. सकाळी एकदा टिव्ही ऑन केला तर रात्रीपर्यंत सुरू असतो.. जेव्हा मला काम नसतं तेव्हा मी घरी हे एकच काम करतो.

७. तुझ्या घरातल्यांची प्रतिक्रीया काय आहे?

माझी आई मुंबईमध्ये राहिलेली आहे. त्यामुळे तिला मराठी चांगल कळतं. ती मला अनेकदा मराठी शिकवण्याचा प्रयत्न करते. मला रोज छोट्या पडद्यावर पाहून तिला खुप अभिमान वाटतो. माझे बाबा ही माझी ही वाटचाल पाहून खुश आहेत. माझी ५ वर्ष चाललेली मेहनत कुठेतरी सार्थकी झाल्यासारख वाटतयं त्याच्या डॊळ्यातल समाधान पाहिल की आपण काहीतरी चांगल काम करत आहोत याच समाधान वाटतं. ही तर सुरवात आहे अजून खुप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण सध्या जे चाललंय ते मी खुप ऎन्जॉय करतोय.

-गायत्री तेली