Sign In New user? Start here.

कुटूंबासह बघता येईल असाच चित्रपट निर्माण करायचा होता- श्रेयस तळपदे

Interview of shreyas talpadeनसबंदी च्या जाहिरातीत फोटो झळकल्यामुळॆ तीन पुरूषांच्या आयुष्यात झालेल्या घडामोडी , त्यांनी खरं काय ते शाबीत करण्यासाठी केलेली लढाई हे या चित्रपटाचे कथासुत्र आहे. या सगळ्या बाबी विनोदी ढंगात मांडण्यात आल्या आहेत तरीही हा चित्रपट कुठेही आचरट विनोद किंवा कुटूंबासोबत बघताना लाज वाटावी असा नाही. कारण कुटूंबासोबत बघता यावा असा निखळ मनोरंजनात्मक चित्रपट बनवायचा हे पक्क होतं. कारण माझ्या आई वडीलांना जेव्हा मी हा चित्रपट दाखवीन तेव्हा लाज वाटली नाही पाहिजे. त्यामुळे चा

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

कुटूंबासह बघता येईल असाच चित्रपट निर्माण करायचा होता- श्रेयस तळपदे

श्रेयस आणि दिप्ती तळपदे यांच्या 'अफलुअन्स मुव्हिज प्रा. लि. या बॅनरखाली तयार झालेल्या "पोश्टर बॉइज" १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने झगमग टीम ने श्रेयसशी मारलेल्या खास गप्पा झगमग वाचकांसाठी

या चित्रपटाचा विषय तसा संवेदनशील आहे मग त्यावर चित्रपट बनवावा असं कसं काय वाटलं?

अर्थात, नसबंदी च्या जाहिरातीत फोटो झळकल्यामुळॆ तीन पुरूषांच्या आयुष्यात झालेल्या घडामोडी , त्यांनी खरं काय ते शाबीत करण्यासाठी केलेली लढाई हे या चित्रपटाचे कथासुत्र आहे. या सगळ्या बाबी विनोदी ढंगात मांडण्यात आल्या आहेत तरीही हा चित्रपट कुठेही आचरट विनोद किंवा कुटूंबासोबत बघताना लाज वाटावी असा नाही. कारण कुटूंबासोबत बघता यावा असा निखळ मनोरंजनात्मक चित्रपट बनवायचा हे पक्क होतं. कारण माझ्या आई वडीलांना जेव्हा मी हा चित्रपट दाखवीन तेव्हा लाज वाटली नाही पाहिजे. त्यामुळे चावट विनोद पूर्ण टाळले. संवेदनशील विषय असल्याने लोक कसे स्विकारतील असं वाट्लं होतं पण स्वच्छ मनोरंजनात्मक चित्रपट बनवला तर लोक त्याला नक्कीच प्रतिसाद देतील याची खात्री आहे. थोडी जुनी संकल्पना आहे असंही वाटलं पण आजही खेड्यापाड्य़ात अशी पोस्टर्स पहायला मिळतात. अशी घटना आज घडली तरी त्याचे पडसाद असेच उमटतील. हक्कासाठी लढण्याचा संदेश ही यातून दिला आहे.

पोश्टर बॉईज मधील एक श्रेयस का नाही?

अभिनय करायची इच्छा झाली नाही असे नाही पण उगाचच आपण अभिनेता आहोत म्हणून आपल्या चित्रपटात आपणच काम करायचे हे मला पटत नाही. आपली बॅट आहे म्हणून आपणच बॅटींग करायची हे पट्लं नाही आणि आपल्याकडे खूप चांगले आणि एकापेक्षा एक वरचढ अभिनेते आहेत. आणि अर्धे लक्ष इकडं आणि तिकडं असं झाल असतं, त्यामुळे मी या चित्रपटात अभिनय न करता निर्मात्याच्या भूमिकेवरच लक्ष केंद्रीत करायचे ठरवले.

एक अभिनेता म्हणून करियर सेट झालेले असताना निर्मिती क्षेत्रात कसा काय उतरलास?

हा तसा धोकादायक व्यवसाय आहे. एक अभिनेता म्हणून मी सुरूवातीपासूनच मला जे आवडेल तेच केलं. अगदी इक्बालची भुमिका करतानाही अनेकांनी अरे, पहिला हिंदी चित्रपट आणि ही कसली भुमिका करतोयस असं विचारल. पण मला ती करायची होती. त्यानंतर डोर केला. ते यशस्वी ठरवेल. चांगल काम केलं की त्याला यश मिळतचं मग घाबरायच कशाला? त्याचप्रमाणे निर्मितीबाबत आहे. घरातून सांगितल जात होतं विशेषत: आई म्हणायची, कशाला हा उद्योग? पैसे बुडतील पण मला बघायचच होतं पैसे बुडतात तर ते कसे बुडतात? अर्थात अव्हानात्मक काम आहे त्यामुळे एकाच बाबीवर लक्ष केंद्रीत केले.

मराठी चित्रपटांना वेगळं वळण मिळालं आहे का?

हो खूपच..! याचे श्रेय मी महेश महेश मांजरेकरना देईन. मी शिवाजी राजे असो, काकस्पर्श असो त्याने नवीन संकल्पना, विषयांवरील व्यावसायिक चित्रपट त्यांनी आणले. त्याचप्रमाणे रवी जाधव, संजय जाधव यांनीही नवनवीन चित्रपट आणले आहेत. आणि याआधी सचिन पिळगावकर यांनीही अशी ही बनवाबनवी सारखा चित्रपट यशस्वी केला आहे. त्यामुळे वेगळा विषय हाताळला तर प्रेक्षक त्याला प्रतिसाद देतातच याची खात्री आहे.

हिंदतही निर्मिती करण्याच विचार आहे का?

नक्कीच, मराठीत निर्मित करण्याचे कारण म्हणजे आपल्या घरी असल्याची सुरक्षित भावना असते. सुरूवात नेहमी आपल्या घरातून करावी म्हणून पहिला चित्रपट केला. हिंदतही नक्की निर्मिती करेन.

नवीन चित्रपट कोणते??

वाह ताज! हा हिंदी चित्रपट नोव्हेबंर मध्ये येत आहे. एका शेतक-याची कथा आहे जो सांगतॊ की ताजमहाल ज्या जमिनीवर आहे ती त्याची आहे. तो पुरावे देतो ते अधिकृत निघतात मग काय होते ते पाहणे मजेदार आहे. त्याच बरोबर मराठीत बाजी हा चित्रपट येतो.

-----------