Sign In New user? Start here.

 

 

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

‘माझा मी’च्या विषयाला दोनशे टक्के मार्क्स - उदय टिकेकर

   हिंदी-मराठी अशा दोन्ही माध्यमांमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे उदय टिकेकर. उदय टिकेकर यांनी नुकत्याच येऊन गेलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या ‘बर्फी’ या सिनेमात एलियाना डिक्रुज या अभिनेत्रीच्या पित्याची भूमिका साकारली होती. आणि ‘माझी मी’ सिनेमात त्यांनी प्रसाद ओक याच्या वडिलाचा रोल केलाय. सतत नेहमी रूबाबदार अशा भूमिकांमध्ये दिसणारे उदयजी त्यांच्या पर्सनॅलिटीच्या विरूद्ध असलेली भूमिका करीत आहे. या सिनेमाबद्दल अणि त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद....

   * ‘माझी मी’ सिनेमाबद्दल आणि तूमच्या भूमिकेबद्दल सांगा.

   - एका एकलकोंड्या बापाची भूमिका मी यात केली आहे. माझ्या मुलाची भूमिका प्रसाद ओक याने केली असून पूर्णपणे त्याच्याभोवती या सिनेमाचं कथानक फिरतं. लहानपणापासून त्याच्या आईने त्याला अतिरेक करून किंवा अति अपेक्षा करून वाढवला, त्याचे परिणाम हल्ली सगळीकडेच आपण बघतो. जबरदस्तीने मुलांवर आपल्या महत्वाकांक्षा लादून त्यांना फ्रस्ट्रेशन देण्याचंच काम होतं. मग मुलांची काय कुचंबना होते अशा आशयाचा हा सिनेमा आहे. या मी एक पती म्हणून आणि एक बाप म्हणून माझ्या बायकोला समजावत असतो की, असं नको करू...मात्र ती ऎकत नाही. आणि मी सुद्धा एकलकोंडा होतो, एकटा पडतो.

   * गेली कित्येक वर्ष तुम्ही इंडस्ट्रीत काम करताय, या सिनेमाचं काय वेगळेपण सांगता येईल ?

   - या सिनेमाचा विषय आणि त्यात माझ्या भूमिकेची असलेली प्लेसमेंट खूप वेगळी आहे...माझी भूमिका बॅकफूटवरची आहे. म्हणजे मी माझ्यापरीने मुलाला आधार देण्याचा प्रयत्न करतो, तसेच बायकोला समजावण्याचा प्रयत्न करतो मात्र माझं काही चालत नाही. जनरली अशा भूमिका करायला कलाकारांना आवडत नाही. नेहमी अ‍ॅग्रेशनवाल्या भूमिका करायला आवडतात. इथे मला माझ्या भूमिकेतील हे आवडलं की, मला माझ्या पर्सनॅलिटीच्या विरूद्ध जाऊन रोल करायला मिळाला. त्यात एक वेगळीच मजा आहे. म्हणजे बायकोने जरा डोळे वटारले की, तो शांत होतो. पण तो तिला घाबरतो किंवा तिच्या मुठीत आहे असं नाहीये, पण त्याचा नाईलाज असतो. काय करायचा आता असं म्हणून सोडून देणारा तो आहे. या वेगळेपणामुळे माझ्यासाठी ही भूमिका खूप चॅलेन्जींग होतं.

   * ‘माझी मी’ या सिनेमातून प्रेक्षकांना काय वेगळेपण बघायला मिळणार आहे ?

   - विशेषकरून आई -वडीलांसाठी हा सिनेमा खूप चांगला धडा आहे की, नका इतक्या महत्वाकांक्षी राहू. तुम्ही जबरदस्तीने लादलेल्या गोष्टींमुळे तुमच्या मुलाचं आयुष्य सुद्धा बेकार होऊ शकतं. अशा गोष्टींमुळे तो फ्रस्ट्रेट होतो आणि त्यामुळे तो चुकीचंच वागत जातो. आणि असे आई-वडील असल्यावर आपण राग कुणावर काढायचा तर मग प्रेयसी, मित्र, सहकारी, शिक्षक यांच्यावर तो राग निघायला लागतो. आणि इथूनच त्या मुलाचं आयुष्य बरबाद व्हायला सुरवात होते. तर या गोष्टी कशा टाळता येईल हे अशा आई - वडीलांनी या सिनेमातून शिकावं.

   * कसा एकंदर तुमचा अनुभव होता या सिनेमाचा ?

   - सिनेमाचा अनुभव तर खरंच खूप चांगला होता. पण त्याहीपेक्षा मला या सिनेमाचे निर्माते अतुल वनगे आणि निनाद वनगे यांचं अभिनंदन करावसं वाटतंय, कारण त्यांनी असा विषय दाखवायची हिंमत केली. मी त्यांना निर्माते म्हणून शंभरापैकी दोनशे मार्क्स देईन. अशाप्रकारचे जर विषय निर्माते घेऊन येत असतील तर त्यांचं मी मनपूर्वक वेलकम करतो. एक कलाकार म्हणून जे सहकार्य करायचं ते आम्ही प्रत्येक लेव्हलला करूच. हे दोघे जरी या क्षेत्रात नवीन असले तरी या विषयावरून त्यांची हुशारी कळून येते. ते जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यांना खूप अभिनंदन आणि प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल अशी प्रार्थना करतो.

- अमित इंगोले