Sign In New user? Start here.
 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

क्लासिकल डान्स हे माझं पॅशन - उर्मिला कानेटकर-कोठारे

Interview of Urmila Kanetkar-Kothare
Urmila Kanetkar-Kothare
Add Comment

‘मला आई व्हायचंय’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमातून घराघरात ओळखली जाणारी प्रतिभावंत अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानेटकर-कोठारे. उर्मिला ही एक उत्तम अभिनेत्री आहे सर्वांना माहित आहे मात्र ती एक उत्तम क्लासिकल डान्सर असल्याचे फार कमी चाहत्यांना माहित असेल...उर्मिला बीएमएम १६ व्या अधिवेशनात क्लासिकल डान्सची कार्यशाळा घेणार असून सोबतच ती १० मिनिटांचा क्लासिकल डान्स सुद्धा सादर करणार आहे. या कार्यशाळेबद्दल आणि तिच्या आगामी सिनेमाबद्दल तिच्याशी केलेली खास बातचीत...

   * बीएमएम च्या या १६ व्या अधिवेशनाबद्दल काय सांगशील?

   - बीएमएम या उत्तर अमेरिकेतील मराठी मंडळातर्फ़े घेतला जाणारा हा एक उत्तम उपक्रम आहे, असं मला वाटतं. अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागातून सर्व मराठी लोक यासाठी एकत्र येऊन तीन, चार दिवसांचा सोहळा एन्जॉय करतात. भारतातून सुद्धा अनेक कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी बोलवलं जातं. इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशात इतकी मराठी माणसं एकत्र येतात, खरंच खूप चांगला हा उपक्रम आहे.

   * या अधिवेशनात तूझा कशाप्रकारे सहभाग असणार आहे ?

   - या अधिवेशनात यावर्षी मी शास्त्रीय नृत्यातील ‘कथ्थक’ या डान्सफॉर्मचं वर्कशॉप घेणार आहे. साधारण ८ ते १० वर्षांची मुलं-मुली त्यात भाग घेणार आहेत. कदाचित त्यातील काही आधीच शिकलेले असतील, काही नवीन असतील. तर त्यांना क्लासिकल डान्सचं Introduction या कार्यशाळेत मी देणार आहे. बेसिकली मी अधिवेशनातील एका कार्यक्रमात १० मिनिटांचं क्लासिकल डान्स परफॉर्म करणार आहे. तर आयोजकांनी मला विचारलं की तू कार्यशाळा सुद्धा घेणार का ? आणि मी होकार दिला.

Interview of Urmila Kanetkar-Kothare

   * चार दिवसांच्या कार्यशाळेत त्यांना क्लासिकल डान्स शिकता येणार का ?

   - शास्त्रीय नृत्याचं इतकं व्यापक विश्व आहे की माणूस शेवटपर्यंत शिकतच राहतो. या कार्यशाळेच्या माध्यमातून त्या मुला-मुलींना मी फक्त एक दिशा देण्याचं काम करणार आहे. त्यांची रूची या नृत्यात वाढवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कदाचित त्यातील काहींना त्यात आवड निर्माण झाली तर ते पुढे सुद्धा शिकत राहतील...

   * तू एक उत्तम क्लासिकल डान्सर सुद्धा आहेस हे फार चाहत्यांना माहित नाही, तूझ्या या प्रवासाबद्दल आम्हाला सांग ?

   - गेली १८ वर्षे मी आशाताई जोगळेकर यांच्याकडे क्लासिकल नृत्य शिकतेय. गांधर्व महाविद्यालयाची नृत्यालंकार ही पदवी मी प्राप्त केली आहे. ‘श्रृंगारमणी’ हे टायटल सुद्धा मला मिळालं आहे. अभिनयासोबतच मी क्लासिकल डान्स फिल्डमध्ये सुद्धा काम करत असते. सिनेमांमध्येही काम चालूच असतं पण ते सुद्धा सिलेक्टेड करते. सिनेमा आणि डान्स हे दोन्ही कसं बॅलन्स करता येईल याचा प्रयत्न करते.

   * भारतातही अशाप्रकारची कार्यशाळा घेण्याचा काही प्लॅन आहे का?

   - नक्कीच आहे....आजकाल बरीच लोकं बॉलिवूड डान्सकडे वळतात. मला त्यांना असं सांगायचं आहे की क्लासिकल डान्सचं बेसिक ट्रेनिंग प्रत्येक डान्सफॉर्मसाठी महत्वाचं असतं. इतर डान्स करू नका असं नाही, पण थोडं तरी क्लासिकल डान्सचं बेसिक ट्रेनिंग त्यांनी घ्यायला हवं. त्यातून एक व्यक्तीमत्व म्हणून वेगळेच संस्कार कलाकारावर होतात.

   * तूझे कोणते नवीन सिनेमे येत्या काळात बघायला मिळणार आहे ?

Interview of Urmila Kanetkar-Kothare

   - ‘दुनियादारी’ माझा सिनेमा १९ जुलै ला रिलिज होतोय. हा सिनेमा संजय जाधव यांनी दिग्दर्शित केला असून मराठीतले अनेक स्टार कलाकार या सिनेमात आहेत. सोबतच क्रांती रेडकर पहिल्यांदा दिग्दर्शित करीत असलेल्या ‘काकण’चं सध्या काम चालू आहे. हा सिनेमा सुद्धा माझ्यासाठी खूप जवळचा आहे, कारण एक छान कथा यात रेखाटण्यात आली आहे. प्रेक्षकांना नक्कीच माझे हे दोन्हीही सिनेमे आवडतील.

   * अमेरिकेतील मराठी लोकांना या कार्यशाळेबद्दल काय आवाहन करशील ?

   - त्यांना मी हेच सांगेन की त्यांनी त्यांच्या मुलांना जर नृत्याची आवड असेल तर या कार्यशाळेत नक्की पाठवा. आपण भारतीय आहोत त्यामुळे आपल्या भारतीय कलेचे संस्कार त्यांच्यावर व्हायलाच हवेत आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून एक चांगली संधी तूमच्या दारापर्यंत आली आहे, त्याचा फायदा तूमच्या मुला-मुलींना होऊ द्या.

   - अमित इंगोले