Sign In New user? Start here.

‘अजिंक्य’ म्हणजे जो कधीही हरू शकत नाही - कादंबरी कदम

Kadambari Kadam interview for marathi movie 'ajinkya'

‘अजिंक्य’ म्हणजे जो कधीही हरू शकत नाही - कादंबरी कदम

 
 
 
tejas deoskar interview

   ‘डिबाडी डिपांग’ गर्ल कादंबरी कदम म्हणजे नुसता खळाळता उत्साह! सोबतच हिंदी आणि मराठीत गाजलेल्या मालिकांमधील सुंदर भूमिका करून घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे कादंबरी कदम....कादंबरीने अनेक मालिकांसोबतच काही मराठी सिनेमांमध्येही भूमिका केल्यात.विक्रम गोखले यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ सिनेमात सुद्धा कादंबरीने भूमिका केली होती. त्या सिनेमातील भूमिकेसाठी तिला पहिला राज्य पुरस्कार मिळाला होता. या सिनेमानंतर ती आता प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे ‘अजिंक्य’ या मराठी सिनेमातून...या सिनेमात ती संदिप कुलकर्णी यांच्या पत्नीची भूमिका करीत आहे. नव्या वर्षाच्या ११ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून या भूमिकेविषयी आणि सिनेमाविषयी तिच्याशी केलेल्या गप्पा....

   * ‘अजिंक्य’ या सिनेमाबद्दल आणि त्यातील तूझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील..?

   - ‘अजिंक्य’ हा सिनेमा एका बास्केट बॉल कोचचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दाखवणारा सिनेमा आहे. बास्केट बॉल कोचच्या भूमिकेत अर्थातच आपण संदीप कुलकर्णी यांना पाहणार आहोत. त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत मी असणार आहे. खेळ आणि नातेसंबंध ह्या भोवती हा सिनेमा फिरतो. संदिप कुलकर्णी आणि कादंबरी कदम हे कास्टींग मला खूप धाडसी कास्टींग वाटतं. संदिप कुलकर्णी यांच्याबरोबर मला काम करण्याची खूप आधीपासून ईच्छा होती. पण त्यांच्या पत्नीची भूमिका मला करायला मिळेल याची कल्पना कधी केली नव्हती. त्यासाठी मला दिग्दर्शक तेजस देऊस्कर ह्याचे आभार मानायला हवे..सिनेमा बघताना प्रेक्षकांच्या लक्षात येईल की नवरा बायकोमध्ये वयाचं अंतर आहे. त्यामुळे हे कास्टींग तसं आहे. माझ्यासाठी हा सिनेमा खूप महत्वाचा आहे कारण नवीन वर्षाच्या दुस-या आठवड्यात हा सिनेमा रिलिज होतोय आणि हा सिनेमा शूट होऊन आता वर्ष झालं त्यामुळे आम्हीही खूप उत्सुक आहोत.

   * यातील भूमिकेसाठी तूला काही वेगळी तयारी करावी लागली का ?

   - वेगळी तयारी तशी करावी लागली नाही. मी फक्त दिग्दर्शक तेजस देऊस्कर याने सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या. एकतर तेजस स्वत: एक बास्केट बॉल प्लेअर आहे. त्याने अतिशय चांगलं डॉक्युमेंटेशन केलेले होते. ही कथा त्याची आहे. पटकथाही त्याने लिहिली आहे. त्यामुळे मी आणि संदिप कुलकर्णी आम्ही दोघेही त्याला फॉलो करीत होतो. माझ्या आधीच्या इतर भूमिकांपेक्षा यात थोडासा एक वेगळा कॉर्पोरेट सेक्टरमधील स्त्रीचा लूक तुम्हाला पहायला मिळेल. एक आजची स्त्री जी खूप मॉडर्न, वेल एज्युकेटेड आहे. संसार आणि प्रोफेशन यातला बॅलन्स सांभाळनं जिला महत्वाचं वाटतं, अशी आजच्या काळातली स्त्री तुम्हाला बघायला मिळेल.

   * संदिप कुलकर्णी या प्रतिभावंत अभिनेत्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता ?

tejas deoskar interview

   - मी कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना बघतीये. इतरांप्रमाणे मी सुद्धा त्यांच्या भूमिका अॅचप्रिशिएट केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याची एक्साईटमेंट होती. सुरवातीला थोडसं प्रेशर होतं. पण "He is a wonderful co-actor to work with". ते अतिशय प्रामाणिकपणे त्यांचं काम करीत असतात त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा येते. सोबतच वातावरण पण छान असतं. म्हणजे कामाच्या वेळेला फक्त काम असं ते असतं. "It was wonderful experience".

   * तेजसचा हा पहिला कमर्शिअल सिनेमा आहे. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांग.

   - तेजसने लंडनमधून एक फिल्म मेकींगचा कोर्स केलाय. त्यानंतर भारतात येऊन त्याने ‘अजिंक्य’ हा त्याचा पहिला सिनेमा डिरेक्ट केला. मला तेजसबद्दल एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे, या फिल्म संदर्भात मला त्याने फोन केला आणि ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो. तेव्हा तो एक लॅपटॉप सोबत घेऊन आला होता. तो मला त्याचं काम दाखवायला लागला. आणि म्हणाला की हा माझा पहिला सिनेमा जरी असला तरी याआधी मी किती शॉर्ट फिल्म्स केल्यात. किती डॉक्युमेंटरी केल्यात...त्याला त्याचं काम मला दाखवणं गरजेचं वाटलं. किंवा त्याने त्या गोष्टीला तेवढं महत्व दिलं. तेच मला खूप आवडलं. नाहीतर जनरली कुणी येतं आणि म्हणतं की, ही ही स्टोरी आहे, इथे शुट आहे, हा हा रोल आहे. पण त्याने मला आधी त्याची स्वत:ची निट ओळख करून दिली. मला त्याची हीच गोष्ट खूप आवडली. ज्या प्रकारे मला त्याने अप्रोच केलं ते मला खूप छान वाटलं.

   * काय वेगळेपण या सिनेमातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ?

   - फिल्मचं नाव आहे ‘अजिंक्य’ आणि त्याची टॅगलाईन आहे 'It's not always about winning'....दोन कॉन्फीडिक्टरी गोष्टी आपल्या पहायला मिळणार आहे. ‘अजिंक्य’ म्हणजे जो कधीही हरू शकत नाही असा आणि टॅगलाईन म्हणते की, 'It's not always about winning'....म्हणजे खेळ आणि नातेसंबंध या दोन्हीवर भाष्य करायचं झालं, तर सर्वार्थाने जिंकणं म्हणजेच जिंकणं असतं का...? नवरा-बायकोच्या भांडणांमध्ये कोणीतरी एक जिंकतं म्हणजे दुसरा माणूस हरला का आयुष्यात....? असं नसतं....! आयुष्य जगण्याचं, संसार चालवण्याचं, टिकवण्याचं स्पिरीट असणं महत्वाचं असतं. मला वाटतं हाच नियम खेळासाठी सुद्धा लागू पडतो. तुम्ही जर एखादी मॅच जिंकला नाहीत तर तुम्ही कायमचे हरत नसता. तुम्ही त्याच स्पिरीटने दुसरी मॅच खेळणं महत्वाचं असतं जी तुम्हाला जिंकून देईल. त्यामुळे मला वाटतं हा एक कॉमन खेळ आणि नातेसंबंध प्रेक्षकांच्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

   - अमित इंगोले