Sign In New user? Start here.

आता फक्त म्हणा ‘लॉन्च मी’

आता फक्त म्हणा ‘लॉन्च मी’

 
 
 

मराठी असो की, हिंदी फिल्म इंडस्ट्री त्यात काम करणा-या प्रत्येक कलाकाराला सुरवातीला स्ट्रगल करावाच लागतो. आज तर या स्ट्रगल शब्दाने त्याचा उच्चांकच गाठला आहे. स्पर्धा खुप वाढल्याने योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शन सुद्धा मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे अनेक नवीन चांगल्या कलाकारांना त्यांची कला प्रेझेंटं करण्याची संधीच मिळत नाही किंवा त्यांची कला दिग्दर्शक/निर्मात्यांपर्यंत पोहचतच नाही. याच समस्या डोळ्यांसमोर ठेवून न्युजमॅक्स मल्टिमिडिया ग्रुपच्या सागर मधुकर परदेशी, मनाली दनैत आणि सहका-यांनी मिळून या नवीन कलाकारांसाठी ‘Launchme.co.in’ हे एक उत्तम पोर्टल उपलब्ध करून देत आहेत. ज्यातून नवीन कलाकारांना इन्ट्रोड्युस केलं जाणार आहे. लवकरच या ‘लॉन्च मी’ वेबसाईटला लॉन्च केलं जाणार आहे.

* ‘Launchme.co.in’ या वेबसाईटची संकल्पना काय आहे आणि ती तुला कशी सुचली ?

- मुळात मी २००६ - ०७ सालापासून HTML प्रोग्रामर म्हणून करियरची सुरुआत केली. ऑनलाईन मिडिया हा खुप इंटरेस्टींग असल्याने तेव्हापासून मी त्याच्याशी जास्त जुळत गेलो. सुरवातीपासूनंच माझं ठरलेलं होतं की, मी स्वत:चा बिझनेस उभा करीन. त्याकाळात मला माझ्या शुभचिंतकांनी योग्य मार्गदर्शन केलं. मी चार वर्षापूर्वी actmumbai.com नावाचे एक डोमेन बुक केले. ज्यावर मला मुंबईतील लोकांचे इश्यु मांडायचे होते. पण काही कारणास्तव ती वेबसाईट पूर्ण झाली नाही. तेव्हा मला ही ‘Launchme.co.in’ ची संकल्पना सुचली. त्यावेळी मी टीव्ही ९ बरोबर त्यांच्या वेबसाईटसाठी काम करत होतो आणि त्याच काळात फेसबुक सारख्या सोशल मिडिया साईटचाही क्रेझ सुरु झाला होता. त्याचवेळी वाटलं की, लॉन्च मी असं एखादं पोर्टल सुरु करूया, ज्यातून नवीन कलाकारांचा फायदा होईल. मात्र तेव्हा हा प्रोजेक्ट खुप बेसिक लेव्हलला होता. खासकरून अशोक डोंगरे या माझ्या लिड प्रोग्रामरचा त्यात सहभाग होता. आता त्यात मनालीचे इनपुट आलेत, आणखीही काही लोकांचे इनपुट आले. शिवाय मी दिग्दर्शक केदार शिंदे यांनाही श्रेय देईन. त्याचं कारण हे की, त्यांच्या ‘ऑन ड्युटी २४ तास’ या सिनेमाची वेबसाईट मी केली होती. सोशल मिडियाचा खुप वापर तेव्हा आम्ही केला होता. जो मराठी सिनेमात फार कमी केला जायचा. त्यानंतर मी संजय जाधव यांना भेटलो, त्यांनाही ही संकल्पना खुप आवडली. आणि हळूहळू माणसं जुळवत या संकल्पनेत अनेक गोष्टी वाढत गेल्या.

* मनाली मला सांग तू यात कशी जुळली गेली? तुझा यात काय रोल असणार आहे?

- मी गेली पाच वर्ष जाहीरात आणि कन्टेन्ट याच फिल्डमध्ये काम करते आहे. वेबसाईटसाठी सुद्धा काम केलं आहे. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या वेबसाईटच्या कन्टेन्टचं काम सुद्धा मीच केलं आहे. शिवाय त्यांच्या अनेक कॉन्सर्टमध्ये सुद्धा त्यांना मी मदत केली आहे. सोबतच टेलिव्हिजनसाठी मी काही जाहीराती केल्या आहेत. याव्यतिरिक्त या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्ती नितीन वैद्य यांच्याबरोबर सुद्धा मी खूप काम केलं आहे. ‘Launchme.co.in’ साठीची माझी भूमिका ही आहे की, ज्याही कलाकारांचे यावर प्रोफाईल असणार आहे, ते मी कंपोज करणार आहे. जनरली काय असतं की, कुठल्याही कलाकाराला हेच वाटतं की, त्याला फक्त मराठीतच नाही, तर हिंदीतही संधी मिळावी. त्याच दृष्टीकोनातून त्यांच्याविषयीची माहिती या वेबसाईटवर असणार आहे.

* ‘Launchme.co.in’ ही वेबसाईट सुरू करण्यामागे काही खास कारण होतं का?

- ब-याचदा आपण पाह्तो की, फक्त शहरातच नाहीतर ग्रामीण भागातील लोकांमध्ये देखील खुप टॅलेंट असतं. मात्र पैशांच्या अभावी त्याचं टॅलेंट दाखविण्यासाठी त्या कलाकाराला शहराकडे येता येत नाही. जर ह्या माणसाचं टॅलेंट एका ईमेलवर समोरच्या माणसाला माहिती होत असेल, तर त्याला इकडे येण्याची गरजच नाही. ईमेलद्वारे आलेल्या त्याच्या माहितीला अप्रुअल मिळेल तेव्हाच त्याला इकडे बोलवण्यात मजा आहे. त्याने उगच इकडे येऊन कशाला स्ट्रगल करावं? कशाला नको त्या गोष्टी सहन कराव्या? हा या वेबसाईटचा उद्देश आहे. ज्यातून दिग्दर्शक, लेखक, कलाकार, गायक यांना संधी मिळेल. तू विचारलं तसं...ही संकल्पना सुचण्यासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत आहे. ती म्हणजे मी फेसबुक प्रेमी असल्यामुळे नेहमी ऑनलाईन असतोच. त्यावर मी केदार शिंदेना फॉलो करत होतो. एकदा केदार शिंदे यांची ऑफिशिअल वेबसाईट माझ्या पाहण्यात आली. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, ती वेबसाईट अपडेटेड नव्हती. यावर मला पर्सनली असं वाटलं की, मी त्यात खुप काही करू शकतो. त्यासाठी मी केदार शिंदे यांना मेल द्वारे संपर्क साधला. आणि लगेच त्यांचा रिप्लाय आला. माझं ऑफिस इथे इथे आहे तू ये..! मी यावरून हाच विचार केला की, जर मी त्यांना मेल केलाच नसता किंवा त्यांचा मेल आलाच नसता. तर मला ती संधी मिळाली नसती. मी ‘ऑन ड्युटी’चं काम केलं नसतं. मी मनालीला, संजय जाधवांना भेटलोच नसतो आणि ही संकल्पना पुढे आली नसती.

* ‘Launchme.co.in’ या वेबसाईटच्या माध्यमातून नवीन कलाकारांचा कसा आणि काय फायदा होणार आहे?

मनाली - खरं तर आम्ही असं एक प्लॅटफॉर्म तयार करतोय की, ज्यातून कास्ट डिरेक्टरला हे नवीन कलाकार इन्ट्रोड्युस करून द्यायचे. यात मह्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही असं अश्युअर नाही करत, की आम्ही तुम्हाला काम मिळवून देऊच. जनरली काय असतं की, एखाद्या दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला त्यांच्या चित्रपटात नवीन चेहरा हवा असतो. मग त्यासाठी ते एजन्ट्सकडे किंवा आणखी कुणाकडे शोध सुरू करतात. पण जो कलाकार त्यांनी शोधला असेल त्याहीपेक्षा चांगला कलाकार, त्या कॅरेक्टरला सुट होणारा कलाकार आम्ही त्यांच्या पुढे आणणार आहोत. म्हणजेच टॅलेंटेड कलाकारांना आम्ही समोर आणतोय. त्यांना काम देण्याची कुठलीही गॅरंटी घेत नसलो तरी, त्यांना कुठे काय आहे, कुठे ऑडिशन्स आहे ही सर्व माहिती आम्ही पुरवणार आहोत. अर्थातच त्यांना यातून त्यांच्या कलेला सादर करण्यासाठी अनेक दारे उघडली जाणार आहे.

Manali

* ज्या कलाकारांची माहिती तुम्ही यावर देणार आहात, त्यांच्यापर्यंत तुम्ही कसे पोहचणार आहात?

-मनाली - बेसिकली या कलाकारांपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही जास्त सोशल मिडियाचाच वापर करणार आहोत. शिवाय पुढे आम्ही अनेक एजन्सीजना सुद्धा अ‍ॅप्रोच करणार आहोत. आजची तरूण पिढी ही जास्त सोशल मिडियाचा वापर करते आहे. त्यामुळॆ आमचा कल जास्त हा सोशल मिडियाकडे असेल. त्याशिवाय सेमिनार्स, कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सोबतच आम्ही पीआर एजन्सीसोबत सुद्धा कॉन्टॅक्ट केला आहे. प्रज्ञा शेट्टी ही या वेबसाईटचा पीआर सांभाळणार आहे.

सागर - काय आहे की, या सगळ्या गोष्टींची प्रोसेस आम्ही ऑनलाईन करतोय. जेव्हा आम्ही वेबसाईट लॉन्च करणार तेव्हा ती टप्प्या ट्प्प्याने लॉन्च करणार आहोत. त्यात पहिल्या टप्यात लोकांकडून आम्ही त्यांचे रजिस्ट्रेशन मागवतोय. त्यांची माहिती आमच्याकडे आल्यानंतर त्यांना पर्सनली फोन करून त्यांच्याशी मिटींग करणार. मग त्याना प्रत्यक्षात भेटूनही मिटींग्स होतील किंवा फोनवर सुद्धा होतील. आमची पहिली बेसिक कॉन्सेप्ट हीच आहे की, आम्हाला लोकांकडून या वेबसाईटबद्दल, या संकल्पनेबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया मागवायच्या आहेत.

launch me team

* हे सर्व फ्री असणार आहे की, त्यासाठी काही पैसे आकारले जाणार आहेत?

-सागर - बेसिक लेव्हलला ते सर्व फ्री असेल पण त्यानंतर पुढच्या स्टेप्ससाठी आम्ही काही पॅकेजेस तयार केले आहेत. जे सद्या मी सांगू शकणार नाही. जेव्हा वेबसाईट लॉन्च होईल, तेव्हा ते सर्वांना कळेलच. पण रजिस्ट्रेशन वैगेरे सर्व फ्री असणार आहे.

मनाली - यात काय आहे ना की, आम्ही काही बेसिक अ‍ॅन्युअल पॅकेजेस ठेवणार आहोत. कसं आहे की, जेव्हा आपण एखादी गोष्ट फ्रि देतो तेव्हा त्याला फारसं महत्व राहत नाही. जर पैसे द्यावे लागले तर, तेवढ्या सिरियसली त्या गोष्टीकडे लोक बघायला लागतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही कॉन्सेप्ट सर्वांसाठी नाही. जे सिरियसली या गोष्टीचा विचार करतील, त्यांच्यासाठीच ही कॉन्सेप्ट आहे. त्यामुळेच आम्ही हे पॅकेजेस ठेवले आहेत.

* या सर्व प्रोसिजरमध्ये मराठी इंडस्ट्रीतील कोणत्या कलाकारांचा पाठिंबा तुम्हाला आहे?

-सागर- यात केदार शिंदे, संजय जाधव, एफ.एम.ईलयास, तेजस्विनी लोणारी यांचा सहभाग आहे. शिवाय मला इथे सांगायला खुप आनंद होतो आहे की, दिग्दर्शक एफ.एम.ईलयास यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी लॉन्च मी सोबत टायअप केलं आहे. या चित्रपटासाठी राईट कॅन्डीडेट देण्याची जबाबदारी आमच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवाय वेळोवेळी या सर्वांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत राहीलच.

* या वेबसाईट लॉन्चच्या निमित्ताने तुम्ही नवीन कलाकारांना काय सांगाल?

-सागर - मी सर्वांना हेच सांगतो की, यासाठी आम्ही खुप मेहनत घेत आहोत. माझी १५ लोकांची टीम यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. याचा कलाकारांना कसा उपयोग होईल, याचाच विचार करत आहे. तर या प्लॅटफॉर्मचा लोकांनी उपयोग करून घ्यावा. यात संकल्पनेवर त्यांच्या काही सुचना असतील तर त्यांनी त्या आम्हाला कळवाव्यात.

मनाली - आम्ही उगीचच कुणाचीही माहिती समोर आणणार नाही. जे काही रजिस्ट्रेशन होतील, त्यातील जे योग्य कॅन्डिडेट आहेत त्यांनाच आम्ही लॉन्च करणार आहोत. म्हणजेच काय तर क्वॉलिटी वर्कच आम्ही समोर आणणार आहोत. त्यामुळे तरूणांनी या संधीचा योग्य तो फायदा घ्यावा.
नवीन कलाकारांना एक योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणा-या ‘लॉन्च मी’ या वेबसाईटला झगमग टिम तर्फ़े हार्दिक शुभेच्छा...!

लॉन्च मी या पोर्टलच्या फेसबुकवरील पेजला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://www.facebook.com/launchme

वेबसाईटला भेट देण्यासाठी या लिंकला क्लिक करा.
http://launchme.co.in/

- अमित इंगोले