Sign In New user? Start here.

Interview of rashi butte"मधुगंधा कुलकर्णी" आणि परेश मोकाशी ही जोडी "एलिझाबेथ एकादशी" चित्रपट घेउन येत आहे. एक वेगळा विषय आणि प्रत्येकाने निखळ मनोरंजनच नाही तर बोध घेण्यासाठी हा चित्रपट जरूर पहावा. या चित्रपटाची कथा मधुगंधाने लिहीली असून ती मराठी मालिकांचेही लिखाण करते "हॊणार सून मी या घरची" ही तिची मालिका आपल्याला चांगलीच ऒळखीची आहे. या "एलिझाबेथ एकदशी" चित्रपटाच्या निमित्ताने "मधुगंधा कुलकर्णी" हिच्याशी मारलेल्या गप्पा खास तुमच्यासाठी.

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

माझा पहिला सिनेमा परेशनेच दिग्दर्शित करावा अशी माझी इच्छा होती : मधुगंधा कुलकर्णी

"मधुगंधा कुलकर्णी" आणि परेश मोकाशी ही जोडी "एलिझाबेथ एकादशी" चित्रपट घेउन येत आहे. एक वेगळा विषय आणि प्रत्येकाने निखळ मनोरंजनच नाही तर बोध घेण्यासाठी हा चित्रपट जरूर पहावा. या चित्रपटाची कथा मधुगंधाने लिहीली असून ती मराठी मालिकांचेही लिखाण करते "हॊणार सून मी या घरची” ही तिची मालिका आपल्याला चांगलीच ऒळखीची आहे. या "एलिझाबेथ एकदशी" चित्रपटाच्या निमित्ताने "मधुगंधा कुलकर्णी" हिच्याशी मारलेल्या गप्पा खास तुमच्यासाठी.

१."एलिझाबेथ एकादशी” या चित्रपटाची कथा कशी सुचली?

माझा पहिला सिनेमा परेशनेच दिग्दर्शित करावा अशी माझी इच्छा होती. मी अनेक काल्पनीक गोष्टीचा नेहमीच विचार करत असते. यासाठी मी परेशला अनेक गोष्टी ऎकवत होते पण त्याला त्या फारशा आवडल्या नाहीत. माझं बालपण पंढरपूरात गेले आहे. त्यामुळे एकदा परेशला मी माझ्या लहाणपणीच्या गोष्टी सांगत होते. तेव्हा त्याला असं वाटल की आपण या गोष्टीवर चित्रपट करू शकतो. त्याने या विषयाला झुकतं माप देताच मी ती संधी सोडली नाही आणि त्याचा विचार बदलण्याच्या आतच मी लगेच त्याला ही कथा लिहून दाखवली.

२. या चित्रपटात तूझ बालपण कुठे झळकत का?

हो अगदीच, चित्रपटात जे लहान मुलांची धडपड दिसते. जे विश्व दिसतं ते माझं भावविश्व आहे. पण पूर्णपणे वास्तव यामध्ये नाही. थोड्या काल्पनीक गोष्टीही मी यामध्ये लिहील्या आहेत. पण चित्रपट पाहाताना तुम्हाला जाणवत नाही की वास्तव कोणते आणि काल्पनीक काय आहे ते. गावाकडचं वातावरण, मैत्री करण्याची इच्छा, मुलांची धडपड हे सगळ माझं भावविश्व आहे.

Interview of rashi butte

३. एक लेखिका म्हणून तुझ्या लिखाणा विषयी काय सांगशील?

मला ही बरेचदा हा प्रश्न पडतो की एवढं चांगल आपल्याला कसं सुचलं. बहुतांशी वेळॆला जेव्हा मी "होणार सुन" या मालिकेचे भाग लिहायाला घेते तेंव्हा नेमकं आपण काय लिहीणार आहोत हे माहिती नसतं पण जेंव्हा ते लिहून पूर्ण होत तेव्हा वाटत की अरे हे बर सुचल आपल्याला. "एलिझाबेथ एकादशी" हा चित्रपट लिहीण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. प्रत्येक माध्यमाच्या गरजा किंवा अपेक्षा, स्ट्रेंथ थोड्या वेगळ्या असतात. मी नाटक लिहीलं "लग्नबंबाळ" त्याला लोंकाचा चांगला प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर "होणार सून" या मालिकेला "झी मराठी" ची भरपूर बक्षिस मिळाली म्हणून मला असं वाटल की लेखिका म्हणून ही दोनी माध्यमं मी चांगल्या प्रकारे हाताळू शकतो मात्र चित्रपटाबद्दल एवढी खात्री नव्हती . एलिझाबेथ साठी परेशची खूप मदत झाली.

४.एलिझाबेथ या चित्रपटात तुला स्वत:ला पडद्यावर यावस नाही वाटलं का?

नाही कारण पडद्याच्या मागे करण्या सारख्या एवढ्या गोष्टी होत्या की त्यामुळे पडद्यावर येण्याची माझी इच्छा झाली नाही. चित्रपटाच्या वेळी आम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागत होता जसे की चित्रपटात जी सायकल आहे त्याच डिझायनिंग, बाकी कलाकारांचा शोध घेणं, कारण चित्रपटातील व्यक्तिरेखा या तिथल्याच हव्या होत्या म्हणून फक्त चित्रपटातील ज्ञानेश आणि ज्ञानेशची आई म्हणजे नंदिता सोडता बाकी सगळे कलाकार पंढरपूर आणि सोलापूरचे आहेत. अशा प्रकारची अनेक कामं पडद्यामागे असल्यामुळे मला पडद्यावर यायचा मोह झाला नाही .

५. चित्रपटातील व्यक्तिरेखां बद्दल काय सांगशील.

या चित्रपटातील जे लहान मुंलाच्या व्यक्तिरेखा आहेत. त्या माझ्या डोक्यात आधीपासूनच स्पष्ट होत्या. ज्या व्यक्तीरेखां आहेत त्यामध्ये त्यांची कौटुबिंक परिस्थीती काय असेल? कशा प्रकारे त्या सादर केल्या पाहिजेत याचा अभ्यास मी आणि परेशने आधिच केला होता. पंढरपूर सारख्या ठिकाणंची मुलं त्यांच बोलणं त्यांचे हावभाव या सर्वांचा विचार करूनच आम्ही या मुंलाची निवड केली होती. त्यामुळेच तुम्हाला चित्रपटातील व्यक्तिरेखा आपल्याशा आणि तुमच्यातील वाटतील.

-गायत्री तेली