Sign In New user? Start here.

नवीन येणा-यांना मार्गदर्शन करणे हे माझं काम असेल - माधुरी जोशी

Madhuri Joshi interview

नवीन येणा-यांना मार्गदर्शन करणे हे माझं काम असेल - माधुरी जोशी

 
 
 

- अमीत इंगोले
( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )

उत्तर अमेरीकेत मराठी भाषा, साहित्य, कला, संस्कृतीचा विकास करण्यासाठी तेथील मराठी लोकांमध्ये सुसंवाद घडविण्यासाठी, त्यांचे मराठी मनोरंजन करण्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ (बीएमएम) गेल्या २७ वर्षांपासून कार्यरत आहेत. या मंडळातर्फे स्थानिक लोकांच्या गरजा, समस्या लक्षात घेऊन नवनवीन Project's आखले जातात. आणि या प्रत्येक गोष्टींना योग्य मार्गाने पार पाडण्यासाठी एका नेतृत्वाची गरज असते. यासाठी दर दोन वर्षांनी बीएमएम अध्यक्षांची निवड केली जाते. आणि त्यांच्या मार्गदर्शनात हे उपक्रम राबविले जातात. त्यांच्या त्या दोन वर्षांच्या कालावधीतील त्यांचे कार्य, त्यांचे अनुभव, बीएमएमचा विकास यावर एक नजर टाकण्यासाठी बीएमएमच्या अध्यक्षा श्रीमती माधुरी जोशी यांच्याची झगमग टीमने केलेली बातचीत....

बीएमएम अध्यक्षपदाच्या अनुभवांबद्दल बोलतांना जोशी यांनी सांगितले की, "बीएमएम ही खूप मोठी Oraganisation आहे. तिच्या कामाचा आवाका मोठा आहे. या संस्थेच्या विविध शहरांमध्ये अनेक Commities असल्याने खूप लोकांना भेटता आलं. नवीन ओळख्या झाल्यात. नवनवीन शहरांचीही माहितीही घेता आली".

तसेच बीएमएम अध्यक्षांची भूमिका सांगतांना त्या म्हणाल्या की," हे मंड्ळ इतर सर्व मंडळांमध्ये सुसंवाद घडवण्याचं काम करते. मराठी Community ला एकत्र आणण्यासाठीच या मंडळाची स्थापना झाली असून इतर मंडळांशी संवाद साधनं, सगळ्या मराठी लोकांना एकत्र आणणं, स्थानिक लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार काय करता येईल याचा विचार करणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं", ही अध्यक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलतांना त्या म्हणाल्या की, "सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे अमेरीकेत आणि कॅनडात मिळून बीएमएमची एकूण ४७ मंडळे आहेत. या काळात सदस्यांची १००% Membership झाली. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आधी लोकांना वाटायचं की, बीएमएम फक्त अधिवेशन भरवतात. पण आमच्या इतरही उपक्रमांच्या माहितीसाठी आधुनिक तंत्राचा वापर केल्याने लोकांना जास्त माहिती मिळू लागली, असं मी म्हणेन".

यासोबतच बीएमएम अधिवेशन २०११ च्या वैशिष्ट्यांबद्दलही त्या म्हणाल्या की, "नेहमीप्रमाणे यावेळीही अतिशय उत्तम आणि नामवंत व्यक्तींचे कार्यक्रम आहेत. त्यात शिकागोचं वैशिष्ट्य म्हणजे रम्य अशा वातावरणात हे अधिवेशन भरविण्यात येणार आहे. जगातलं नंबर एक मानल्या जाणा-या ऎरी क्राऊन थिएटरमध्येही काही कार्यक्रम होणार", असल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठीच्या विकासासाठी काही नवीन उपक्रम राबविले जावेत का याबद्द्ल त्या म्हणाल्या की, "बीएमएमच्या कामात तरूणांना सहभागी करून घेण्यासाठी काही केलं जावं. तसेच येथील मुला-मुलींच्या लग्नाच्या दुष्टीने मराठी Matrimonial सुरू केलं जावं. तसंच अमेरीका, कॅनडातील मराठी लोकांचं एक नेटवर्कींग व्हायला पाहिजे. जेणे करून त्याचा फायदा बाहेरील सगळ्या मराठी Community ला होईल", असंही त्या म्हणाल्या.

अध्यक्ष पदाच्या कालावधीत काही करायचं राहीलं असं काही आहे का? यावर त्या सांगत होत्या की, "हो ते थोडं असं की, ‘मैत्र’ या तरूणांच्या संघटेनेचा आणखी विकास कसा करता येईल. त्यात नाविन्य कसं आणता येईल. त्याचबरोबर त्याच्या Format मध्ये काही बदल करायचे होते. त्यात तरूणांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा. कारण हीच तरूण मंडळी बीएमएमला पुढे नेणार आहे. त्यांनाच पुढे बीएमएम चालवायचं आहे", असं त्या सांगत होत्या. नवीन येणा-या अध्यक्षांना सल्ला देतांना त्या म्हणाल्या," काय होतं की, अधिवेशनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. पण मंडळाची मूलभूत संकल्पना काय आहे याचा विचार करून इतर मंडळांच्या सतत संपर्कात रहायला पाहिजे, स्थानिक लोकांना काय हवं, त्यांच्या गरजा काय आहेत. ते समजून घेऊन त्यांना काय मदत करता येईल हे पाहिले पाहिजे", असा सल्ला त्यांनी दिला.

अध्यक्षपदी नसल्यावर तुमचा यात कसा सहभाग असणार आहे? "खरच खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे, असं म्हणत त्या पुढे सांगू लागल्या की, बीएमएमच्या कमिटीवर Ex-President साठी एक पोस्ट असते. नवीन येणा-या लोकांना फारसा अनुभव नसल्याने त्यांना तेवढं Knowladge नसतं. मग अशात या माध्यमातून नवीन Project's मध्ये मार्गदर्शन करणे. एखाद्या विषयावर त्यांना सल्ला देणे हे काम आम्ही करत", असल्याचं त्या सांगत होत्या.

या मंडळांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाची मदत होते का? त्यांनी काय मदत करावी?, "ब-याच वर्षांनी इथला मराठी माणूस जेव्हा महाराष्ट्रात येतो, तेव्हा त्याला तिकडची फार माहिती नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. तेव्हा आमची अपेक्षा असते की, जेव्हा तिकडे जाऊ त्याआधीच तिकडची सविस्तर माहिती आम्हाला मिळावी. त्यासाठी राज्य सरकारने जर माहितीपर Website तयार केली तर चांगलं होईल. त्यातून आम्हाला Tourismचीही माहिती मिळेल आणि तिथल्या घटनांचीही माहिती मिळेल. म्हणजेच माहितीसाठी, संवादासाठी एक माध्यम महाराष्ट्र सरकारने निर्माण करावं", असं त्यांनी व्यक्त केलं.

त्यांच्या हातून आतापर्यंत यशस्वी झाले्ल्या आणि नवीन प्रोजेक्ट्सबद्दलही जोशी यांनी माहिती दिली, त्या म्हणाल्या " बीएमएम या संस्थेचं constitution खूप जुनं आहे. त्यात आम्ही सध्याच्या गरजा लक्षात घेऊन वकीलांच्या मदतीने काही बदल केलेत. संस्थेचं कार्य मोठं असल्याने त्याचा आवाका मोठा असल्याने प्रत्येक गोष्टीचं Documentation होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी शाळा हा Project भारती विद्यापीठाच्या मदतीने उत्तम चालू आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतोय, यावेळी तब्बल १४० विद्यार्थी मराठी शाळेच्या परीक्षेला बसले होते. तसेच आम्ही बीएमएमची नवीन Website केली. आणखी सांगायचं म्हणजे सध्या अनेक चांगले मराठी चित्रपट तयार होत आहेत. ते पाहणं इकडच्या लोकांनाही आवडतं. पण ते इकडे प्रदर्शित होत नाहीत. याआधी काही चित्रपटांसाठी त्यांच्या Producer शी बोलून त्या चित्रपटाच्या सीडी, डिव्हीडी आम्ही मागविल्या होत्या आणि त्या विविध मंडळाकडे पाठविल्या होत्या. पण यासाठी अधिक जास्त प्रमाणात त्या निर्मात्यांशी संवाद होणं", महत्वाचं असल्याचं त्या म्हणाल्या.

अधिवेशनाच्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकांचा कितपत सहभाग असतो आणि त्यांची मदत कशाप्रकारे होते? याबाबत बोलतांना त्या म्हणाल्या,"स्थानिक लोकांच्याच सहभागाने हे सगळं केल्या जातं. स्थानिक लोकांचीच टीम असते. त्यांच्या वेगवेगळ्या कमिटी असतात. आमचं फक्त ऎवढच काम असतं की, कार्यक्रमाची तयारी कशी सुरू आहे. म्हणजे त्यांना Execute करण्याचं काम आम्ही करत असतो. योग्य पद्धतीने काम होतंय की नाही याची खात्री करून घेणे. कारण जर काही Problem झालाच तर ती बीएमएमची जबाबदारी असते", असं त्यांनी सांगितले.