Sign In New user? Start here.

लंडनच्या इतिहासातील सर्वात मोठा सोहळा

लंडनच्या इतिहासातील सर्वात मोठा सोहळा

 
 
 

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा सन्मान करणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचं हे दुसरं वर्ष. एवढ्या मोठ्या स्तरावर घेण्यात येणारा हा पहिलाच सोहळा प्रेक्षकांनी आणि सिने जगतानेही डोक्यावर घेतला आहे. मात्र भारताबाहेर एवढ्या भव्य स्वरूपात सोहळा आयोजित करणं सोपं काम नाहीये. त्यासाठी अनेक प्रतिभावंत लोकांची आवश्यकता गरज असते. त्यामुळेच लंडनमध्ये होणा-या या सोहळ्याची धुरा मिफ्ताने अनेक अनुभवी लोकांकडे सोपविली आहे. त्यातीलच एक म्हणजे डॉ.महेश पटवर्धन जे या सोहळ्याच्या संयोजकांपैकी एक आहेत. ‘मिफ्ता’च्या निमित्ताने त्यांच्यांशी झगमग टीमने साधलेला संवाद...

सर्वप्रथम ‘मिफ्ता’सोहळ्याबद्द्ल गप्पा मारतांना ते म्हणाले की, " गेल्या ब-याच वर्षापासून अभिजीत पाटीलसोबत माझी ओळखी आहे. गेल्यावर्षी Switzerland मध्ये त्याने मला मिफ्ता सोहळ्याबद्द्ल माहिती दिली. आणि तशी मला त्याबद्दल खूप excitement वाटली, कारण मराठी माणूस कुठेही असो त्याला आपल्या संस्कृतीचा खूप अभिमान असतो. त्यामुळे मी त्याला तेव्हाच म्हटलं की, तुला logistically काही मदत करू शकलो तर मला सांग. त्यानुसार हा सगळा योग जुळून आला. मुळात `मिफ्ता'कडे मी एक चळवळ म्हणून बघतो. शिवाय यामुळे अनेक बदल होणार आहेत, अनेक गोष्टीचां विकासही होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमी एका वेगळ्या वळणावरचा प्रवास सुरू करणार आहे. भविष्यात ‘मिफ्ता’चा यात खूप मोठा सहभाग असणार आहे. दुबईतील मिफ्ता बघीतल्यावरच या सोहळ्याचं भव्य रूप माझ्या लक्षात आलं. मला ते खूप आवडलंही. हा सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो आहे की, त्यासाठी खर्चही अमाप लागणार आहे. मात्र त्याचा दर्जा इतका चांगला आहे की पैशांचा विचारच मनात येत नाही. mifta

लंडनमधील ‘मिफ्ता’चं काय वैशिष्ट्य असणार आहे? यावर ते सांगतात की, " पुष्कळ वर्ष लंडनची परिस्थिती अशी होती की, एक चारशे पाचशे कुटूंब इथे राहत होते. नवीन मराठी माणसांना इकडे यायला जास्त वाव नव्हता. मात्र गेल्या सात-आठ वर्षात IT कंपन्यांमुळे प्रचंड प्रमाणात मराठी माणसं इकडे यायला लागली आहे. आणि सगळी तरूण मराठी माणसं आहेत. जी काही वर्षांच्या contract वर येतात आणि परत जातात. पण त्यांच्यामुळे एवढा फरक झाला आहे की, इकडे मराठी संस्कृतीला फार महत्व प्राप्त झालं आहे. या सोहळ्याचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास हा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. लंडनच्या इतिहासात आतापर्यंत असा सोहळा झालेला नाहीये. अशा कार्यक्रमांमुळे लंडनमध्ये मराठी संस्कृतीला चालना मिळणार आहे. माझी अशी आशा आहे की, इथली मराठी लोकं एकत्र येऊन असाच कार्यक्रम पुन्हा घेण्याचा प्रयत्न करतील.

‘मिफ्ता’हा सोहळा लंडनमध्ये घेण्याचं कारण काय आहे? यावर ते म्हणाले की, "लंडन हे बघीतलं तर परदेशांमध्ये खूप मध्यवर्ती ठिकाण आहे. म्हणजे America, India, Australia आणि Europe याच्यांतलं मध्यवर्ती ठिकाण आहे. भारतावर ब्रिटीश लोकांनी बरेच वर्ष राज्य केलंय. त्यामुळे भारतीय संस्कृती लंडनच्या संस्कृतीशी बरीचशी निगडीत आहे. शिवाय युरोपच्या लोकांना लंडनमध्ये सहज येता येतं. तसंच लंडन खूप आधुनिक शहर असून सोहळ्यासाठी तेथील बुक केलेलं O2 Theater सुद्धा प्रगत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असं आहे. ते पाहिल्यावर इथे येणा-या कलाकारांना आणि प्रेक्षकांनाही कळेल की आपण किती पुढे आहोत किंवा मागे आहोत. शिवाय आज लंडन शहरात अनेक हिंदी चित्रपटांचे premiere ठेवले जातात. त्याप्रमाणेच मराठी चित्रपटांचेही प्रिमियर व्हावे असं इकडच्या लोकांना वाटतं. या पार्श्वभूमीवर मिफ्ताच्या माध्यमातून मराठी सिनेमा ग्लोबल होणार आहे. या गोष्टींचा विचार करूनच लंडन शहराची यावर्षी निवड करण्यात आली.

या सोहळ्याचा लंडनमधील मराठी लोकांना काय फायदा होणार? यावर ते म्हणतात की, " आता मंडळांचं सांगायचं तर पुर्वापार स्थापन झालेलं महाराष्ट्र मंडळ तर इथे आहेच. शिवाय अलीकडे मराठी माणसांचे अनेक छोटे छोटे पॉकेट्स सुद्धा तयार झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र मंडळाने सोहळ्याची जबाबदारी घ्यावी आणि इतर मंडळांनी त्यांना सहकार्य करावं असं ठरलं. याचा फायदा असा होतोय की, महाराष्ट्र मंडळांनाही माहित नसलेली मराठी माणसांची जी छोटी छोटी पॉकेट्स आहेत ती एकत्र यायला लागली आहे. आणि यात ‘मिफ्ता’चा फार मोठा सहभाग आहे.

या सोहळ्यात त्यांची नेमकी काय भूमिका आहे याबाबत ते सांगतात की, " या सोहळ्याची स्थानिक आर्थिक जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. शिवाय मी आणि माझा मित्र संदीप पाध्ये या सोहळ्याचं संयोजन सुद्धा करतोय. सर्व मराठी मंडळांना एकत्र आणनं, सोहळ्यासाठी आवश्यक गोष्टीत त्यांचे सहकार्य घेणं, सोहळ्याच्या प्रचारात त्यांना सामावून घेणं. ह्या गोष्टी आम्ही सर्वच सांभाळत आहोत.

mifta मराठी सिनेविश्वातील या पुरस्कार सोहळ्यात तिथल्या मराठी मंडळांचा सहभाग कसा आहे? याबाबत ते सांगतात की, "मुळात या सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत हाच सर्वात मोठा सहभाग आहे. काय आहे की, मिफ्ता या सोहळ्यात कुणाला कार्यक्रम करायचा नाहीये, फक्त सोहळा बघणं हा सर्वात महत्वाचा Part आहे. शिवाय ticket विक्रीसाठी आम्ही बरेचसे coordinator नेमलेत जे महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने काम करतात. त्यांच्या द्वारा लोकांना सहज Ticket उपलब्ध होतील. सोबतच सोहळ्याचा प्रचारही मोठ्या प्रमाणात होईल. मुख्यता ticket विक्री करणं आणि मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहणं असा या मंडळांचा यात सहभाग आहे.

काही दिवसांवरच पुरस्कार सोहळ्याची तारीख जवळ आल्याने सोहळ्याची तयारी कुठपर्यंत आली आहे याबद्द्ल सांगतांना ते म्हणाले " जोरदार...! एकतर सगळ्या मंडळांच्या माणसांना e-mail गेलेले आहेत. रोज जवळपास १५ लोकांचे तरी फोन सोहळ्याच्या enquiry साठी येतात. थिएटरच्या संबंधीत लोकांशी मिटींग झालेल्या आहेत. महेश मांजरेकर, अभिजीत पाटील, संतोष मांजरेकर हे सर्वच लोक इकडे प्रचारासाठी येऊन गेलेत. बाकीचीही सर्वच व्यवस्था ते करून गेलेत. त्यामुळे आम्ही सोहळ्यासाठी तयार आहोत बस आता त्या दिवसाची वाट आहे.

मिफ्ताबद्द्ल गप्पा करतांना डॉक्टर पटवर्धन यांनी भारतात असतांना प्रोफेशनल गायन सुद्धा केल्याचं कळालं, त्याबद्दलही जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, ते सांगतात, "मी मेडिकल कॉलेजच्या दिवसांपासूनच professional Singing करत होतो. मी मन्ना डें बरोबर युरोप ट्रीप केलेली. नंतर ब-याचशा संधी मला मिळत गेल्या..आशा भोसलेंबरोबर मी एक अल्बम केला. त्यानंतर बिद्दू संगीतकाराबरोबर बरेच अल्बम केलेत. असं एक एक करत गेलो आणि एक काळ असा आला, की मी Seriously विचार करायला लागलो, की, गाण्यातच profession करावं की Medical करावं? पण Medical कडे माझा जास्त कल असल्याने मी Medical निवडलं. सध्या जरी गाण्यासाठी मला जास्त वेळ देता येत नसला, तरी मी आत्ताही वर्षातून चार ते पाच कार्यक्रम करतोच. नुकताच मी O-2 मध्ये कार्यक्रम केला त्यात मी किशोर कुमार नाईटसाठी सहभाग होता. त्यानंतर सचीन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांची मी मुलाखत घेतली. त्याआधी मी ‘गर्जा महाराष्ट्र’ हा कार्यक्रम केला. याचा जवळपास सहाशे ते सातशे प्रेक्षकांनी आनंद घेतला होता. मराठीतील अनेक गाजलेल्या कलाकार, गायकांना घेऊनही अनेक कार्यक्रम केलेत. सध्या विविध कार्यक्रम करणं, एखादा गाण्याचा कार्यक्रम करणं असंच चालू आहे. गायन बंद पडण्याची मनामध्ये खंत असल्याने ती तूट भरून काढण्यासाठी या बाकीच्या कार्यक्रमांमध्ये मी भाग घेतो. मी माझ्या डॉक्टरीत busy असूनही या कार्यक्रमात सहभागी होतोय. त्यात शारिरीक तणाव तर होतोच पण त्यात सहभागी होण्याचा एक वेगळाच आनंद मला मिळतो.

एकंदर काय तर मिफ्तामुळे लंडनमधील विखुरलेले मराठी लोकं एकत्र येतील आणि मराठी चित्रपट/रंगभूमीही ग्लोबल होईल.