Sign In New user? Start here.

महेश मांजरेकर

 

Mahesh Manjrekar

महेश मांजरेकर

महेश मांजरेकर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म मुंबई मध्ये झाला. त्यांनी आपल्या अभिनय जीवनाची सुरुवात १९८४ साली 'अफलातून' ह्या मराठी नाटकामधून केली.

दिग्दर्शक म्हणुन त्यांनी १९९५ साली ’आई’ या मराठी चित्रपटापासून सुरुवात केली. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्‍तम दिग्दर्शकचे फिल्मफेअर पारितोषिक मिळाले.

त्यानंतर १९९९ साली ’वास्तव’ चित्रपटाचे दिग्दर्शक केले. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वोत्‍तम चित्रपट ठरला. पण त्यानंतर दिग्दर्शक केलेले निदान आणि जिस देश मे गंगा रहता है हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेवढे यशस्वी ठरले नाहीत. त्यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट अस्तित्व, कुरुक्षेत्र, एहसास, हत्यार, विऋध असे आहेत.

२००१ साली एहसास या चित्रपटापासुन त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. २००२ साली ’कांटे’ चित्रपटातील त्यांची भुमिका गाजली. पुढे त्यांनी प्राण जाये पर शान न जाये, रन, मुसाफिर, पदमश्री लालू प्रसाद यादव, जवानी-दिवानी, दस कहानिंया, स्लमडॉग मिलेनियम, ९९ अश्या विविध भुमिका सकारुन आपल्या अभिनयाची चुणुक दाखविली.

सध्या त्यांनी लेखन व भुमिका केलेला ’मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ हा मराठी चित्रपट व्यावसायिक दुष्ट्या यशस्वी झाला व  तुफान गाजत आहे.