Sign In New user? Start here.

सिक्वल मास्टर दिग्दर्शक मिलिंद कवडे...!

 
 
 

‘येड्यांची जत्रा’, ‘येड्यांची जत्रा -२’ ‘फोर इडियट्स’ आणि ‘नो एन्ट्री -पुढे धोका आहे’ या चित्रपटांची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसून येते. यातील नुकत्याच येऊन गेलेल्या ‘येड्यांची जत्रा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यानुसार या चित्रपटाचा सिक्वल काढण्यात येणार असून मराठीत पहिल्यांदाच एका मुव्हीचा सिक्वल काढण्यात येणार आहे. ‘फोर इडियटस’ येत्या १५ जूनला रिलिज होणार आहे. तर त्यानंतर ‘नो एन्ट्री -पुढे धोका आहे’ हा रिलिज होईल. या चारही चित्रपटांचं दिग्दर्शन आणि लिखाण तरुण दिग्दर्शक मिलिंद कवडे याने केलं असून या प्रतिभावंत दिग्दर्शकाचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेण्यासाठी झगमग टिमने त्याच्याशी केलेली ही खास बातचीत..

* अ‍ॅड फिल्म ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास कसा होता?

- मुळात मी टेलिव्हीजन अ‍ॅन्ड फिल्म डिरेक्शनचा डिप्लोमा होल्डर आहे. स्क्रिप्ट रायटिंगचही शिक्षण मी घेतलं. हे सर्व केल्यानंतर माझा प्रवास तसा खुप खडतर होता. फिल्म मेकिंग शिकल्यापासून अक्षरश: मी शून्यातून सुरवात केली. आधी काही वर्ष मी बालाजी टेलिफिल्ममध्ये काम केलं. तिथे काही सिरीअल्ससाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर एका डॉक्युमेंटरीसाठी एका चांगल्या फॉरेन फिल्म मेकरला असिस्ट करायचा चान्स सुद्धा मिळाला. संजय लिला भन्सालीचे एक चिफ असिस्टंट होते, त्यांच्याबरोबर एका फिल्मवर काम करायला मिळालं. तिथून माझा फिल्म्सचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मग मी अ‍ॅड फिल्म असिस्ट करायला लागलो. हा बराच अनुभव घेतल्यानंतर मी माझी स्वत:ची ‘आऊट ऑफ द बॉक्स फिल्म’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीतर्फ़े मी १० ते १५ अ‍ॅड फिल्म केल्यात. सोबतच कुणाल गांजावालाचा एक अल्बम मी शूट आणि डिरेक्ट सुद्धा केला.

त्यानंतर मला माझी पहिली फिल्म मिळाली ‘फोर इडियट्स’. ही पहिली फिल्म आता सेकन्ड रिलिज होतेय. जी माझी दुसरी फिल्म होती ती आधी रिलिज झाली. ‘फोर इडियट्स’ आधीच तयार झाला होता. त्याचं काम बघून मला ‘येड्यांची जत्रा’ हा सिनेमा मिळाला.

* ‘येड्यांची जत्रा’ ही फिल्म तुला कशी मिळाली ?

- ‘येड्यांची जत्रा’ चे प्रोड्युसर विश्वजीत गायकवाड हे स्क्रिप्टच्या शोधात होते. माझ्या आधी साधारण २५ ते ३० रायटर आणि डिरेक्टर्सला ते भॆटलेले. त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे ते चार-पाच महिन्यांपासून शोधात होते. दरम्यान आमच्या एका कॉमन फ्रेंडकडून प्रोड्युसर आणि माझी भेट झाली. विश्वजीतला मी स्ट्रोरी ऎकवली आणि ती त्याला आवडली. लगेच प्रोजेक्ट फायनल होऊन काम सुरू झालं. अतिशय चांगली फिल्म तयार झाली. विनोदाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश या फिल्मच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न केला.

milind kavde interview

* पहिल्यांदाच मराठी फिल्ममध्ये सिक्वल करण्यात येतोय. मराठीत सिक्वल करायची रिस्क नाही का वाटली?

- जेव्हाही एखाद्या फिल्ममधून प्रोड्युसरचे पैसे वसुल होतात. तेव्हाच तो सिक्वल करण्याचा विचार करतो. ‘येड्यांची जत्रा’चे बरेच पैसे सॅटलाईट राईट्स विकून मिळाले. ‘झी’ ने खुप चांगली प्राईज दिली. मला वाटतं, ‘देऊळ’ आणि ‘शाळा’ नंतर मॅक्सिमम प्राईज ‘येड्यांची जत्रा’ची होती. या कारणानेच त्यांनी सिक्वलची अनाऊंन्समेंट केली. आणि प्रेक्षकांना ही फिल्म आवडली. आजही मराठवाड्यातील टुरींग टॉकीज मध्ये ही फिल्म चालू आहे. ही फिल्म ज्यावेळी पूर्ण तयार झाली त्यावेळीच प्रोड्युसरनी या फिल्मचा सिक्वल करण्याचं ठरवलं. त्या अनुशंगाने आम्ही मग सिक्वलचं काम सुरू केलं. मग ‘पुन्हा भरली - येड्यांची जत्रा’चं काय असेल, कसं असेल, स्टोरी काय करता येईल. आता जवळपास स्क्रिप्टचं काम पूर्ण होत आलं आहे. मला खात्री आहे की, पहिल्या फिल्मप्रमाणेच सिक्वलमध्येही प्रेक्षकांना खुप धमाल बघायला मिळणार.

* दिग्दर्शन आणि लिखाण दोन्ही भूमिका एकत्र करतांनाचा अनुभव कसा होता?

- खरंतर खुप फायदा होतो या गोष्टीचा. कोणत्याही फिल्मचा विचार करता, फिल्मच्या स्क्रिप्ट मध्ये डिरेक्टरचा खुप मोठा सहभाग असतो. हॉलिवूडच्या कुठल्याही सिनेमात स्क्रिन प्ले मध्ये डिरेक्टरचं नाव असतंच. फिल्मसाठी जर दोन तीन रायटर्स असतील तर त्यापैकी एक हा डिरेक्टर असतो. डिरेक्टरला नेमकं काय हवं असतं हे तो त्यात टाकू शकतो. सोबतच ब-याच गोष्टी सोप्या होऊन जातात.

* ‘नो एन्ट्री- पुढे धोका आहे’ आणि ‘फोर इडियट्स’बद्दल सांग.

- ‘फोर इडियट्स’ ही माझी पहिली फिल्म सेकन्ड रिलिज होतेय. येत्या १५ जूनला प्रेक्षकांना ती पहायला मिळणार आहे. ही फिल्म खुप चांगली झालेली आहे. लकीली या मुलाखतीच्या माध्यमातून मला प्रेक्षकांना सांगायला आनंद होतोय की, फिल्मचे प्रोड्युसर गुरू आनंद यांनीही या फिल्मचा सिक्वल करण्याची तयारी दर्शवली आहे. या फिल्मची कॉन्सेप्ट अतिशय वेगळी आहे. मराठीत ही कन्सेप्ट पहिल्यांदाच येती आहे. ब-याच कालावधीनंतर भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव प्रेक्षकांना एकत्र बघायला मिळणार आहेत. दोघांनीही खुप धमाल केली आहे या सिनेमात.

milind kavde interview

‘नो एन्ट्री- पुढे धोका आहे’ ही मुव्ही माझ्याकडे ‘येड्यांची जत्रा’मुळे आली. बोनी कपूरच्या कॅम्पमध्ये ‘नो एन्ट्री’चा मराठी रिमेक करण्याची चर्चा चालू होती. दरम्यान त्यातील काहींनी ‘येड्यांची जत्रा’ पाहिला होता. त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं. या फिल्ममध्ये नक्कीच काही बदल असतील. मला खात्री आहे की, हिंदीप्रमाणे मराठी ‘नो एन्ट्री’लाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल.

* भारतीय चित्रपटसॄष्टीला या वर्षी १०० वर्ष पूर्ण झालीत. त्याबद्दल काय सांगशील.

- मराठी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर आपण खुप प्रगती केली आहे. १५ वर्षापूर्वी तेच ते एकाच स्टाईलचे चित्रपट तयार व्हायचे. हिंदी वाल्यांसाठी तेव्हा मराठी सिनेमा एक दुय्यम दर्जाचा सिनेमा होता. पण ‘श्वास’ नंतर हे सर्व बदललं. ‘श्वास’, ‘टिंग्या’, ‘वळू’, ‘नटरंग’, ‘जोगवा’, ‘बालगंधर्व’ या चित्रपटांनी मराठी सिनेसृष्टीचा चेहरा-मोहरा बदलून टाकलाय. यामुळेच बॉलिवूडमधील प्रोड्युसर्स आता मराठी सिनेमांची निर्मिती करायला लागले आहेत. कुठल्याच बाबीत मराठी सिनेमा आता कमी पडत नाहीये. मराठी सिनेमाने ‘ऑस्कर’ आणि नॅशनल अवॉर्ड पर्यंत मजल मारली आहे.

* लागोपाठ चार मुव्ही करण्याचा तुझा अनुभव कसा आहे ?

- मस्त..! कसं आहे की, लोकं तुमचं काम बघून तुम्हाला काम देतात. मी चांगल्या कामात विश्वास ठेवतो. माझ्याकडे आलेलं काम शंभर ट्क्के चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आत्तापर्यंतचा माझा अनुभव अतिशय चांगला आहे. चांगल्या लोकांबरोबर काम करतो आहे.

- अमित इंगोले

 
 
 

Other Interview link