Sign In New user? Start here.

डॉ.मीना नेरूरकर लिखीत ‘मी आणि माझा गोतावळा’

कलेची भूक न हरवलेली अभिनेत्री ‘अनुपमा’

 
 
 

- अमीत इंगोले
( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )

हिंदी, मराठी आणि गुजराती चित्रपटात अभिनय केलेल्या आणि ‘घरची रानी’, ‘धर्मकन्या’, ‘तांबडी माती’, ‘आधार’ हे त्यांचे त्यावेळी गाजलेले चित्रपटातून प्रेक्षकांना परिचीत असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अनुपमा धारकर ह्या गेल्या ३५ वर्षांपासून परदेशात स्थायिक झाल्या आहेत. पण त्यांची कलेची भूक आजही कमी झालेली नाहीये. त्यांनी तिकडे राहूनही अनेक मराठी नाटकांचे दिग्दर्शन करणे सुरू ठेवले आहे. यावर्षी BMM चं अधिवेशन शिकागो येथे होणा्र आहे. या अधिवेशनाच्या या ओपनिंग सेरमनीसाठी `The Journey' या खास कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली असून या कार्यक्रमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेत्री/नाट्य दिग्दर्शिका अनुपमा धारकर यांनी केलं आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. आणि या कार्यक्रमाबद्द्ल आणि त्यांच्या अनुभवांबद्द्ल जाणून घेण्यास मन आवरले नाही.....आणि त्यांच्याशी थेट संवाद साधला....

`The Journey' संकल्पनेबाबत अनुपमा धारकर यांनी सांगितले की, " ओपनिंग सेरमनीतील दिपप्रज्वलनानंतर `The Journey' हा संगीतमय Program असून शिकागोतील Local लोकांचा हा कार्यक्रम आहे. त्याचं दिग्दर्शन मी केलंय. या कार्यक्रमाची संकल्पना म्हणजे हा आमचा प्रवास आहे. म्हणजे भारत सोडून आल्यापासूनचा हा प्रवास आहे".

ही संकल्पना कशी सुचली याबाबत बोलतांना त्या म्हणाल्या की, " जे जे कार्यक्रम ओपनिंग सेरमनीत याआधी झालेले होते त्या कार्यक्रमांचा मी आढावा घेतला. शिकागो हे बीएमएमचं जन्मस्थान आहे. आणि यावेळी शिकागोला दुस-यांदा हे अधिवेशन होत आहे. ही एक परिक्रमा पूर्ण झाली आहे. या परिक्रमेला डोक्यात ठेवून, तिचा प्रवास जसा सुरू झाला त्यावरून ही संकल्पना मला सुचली. आणि रेवती ओक हीला मी हे सगळं सांगितलं आणि त्यानंतर तिने यावर Dialougs लिहीले", असं त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमात एकूण सत्तर कलाकार आहेत, एवढ्या कलाकारांना Handle करणं कसं जमलं? यावर त्या म्हणाल्या की, "तो अनुभव Surprisingly खूप चांगला आला. ज्यावेळेला ठरवलं की, आपण आता म्युझिकल करायचं. तेव्हापासून Local लोकांचा खूप चांगला अनुभव आहे. या कार्यक्रमात ११ वर्षाच्या मुलांपासून ५० वर्षांच्या कलाकारांपर्यंत लोकं काम करताहेत. कुठल्याही अडचणी आल्याच नाहीत. जे लोकं माझ्याबरोबर काम करताहेत. त्यांचं -Co-operation मला सतत मिळत गेलं. आणि महत्वाचं म्हणजे यातील सगळेच कलाकार हे हौशी आहेत. आणि After All हे Teamwork आहे. हा Oneman Show कधी होऊच शकत नाही".

anupama

`The Journey' या कार्यक्रमाच्या वैशिष्ट्यांबद्द्लही त्यांनी सांगितलं त्या म्हणाल्या की, " एकतर लोकल लोकांनी यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आपले उद्योग, शाळा, घर सांभाळून त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून यासाठी काम केलंय. आमच्याकडे Travelling Distance खूप जास्त असतो तो सांभाळूनही हे सगळं केलं आहे. तसंच यात काम करणारा जास्तीत जास्त वर्ग हा स्त्रीवर्ग आहे. त्यांनी त्यांची लहान मुलं सांभाळून अगदी इमाने इतबारे काम केलं आहे. त्यांनी मला दिलेला Commitment हा शब्द राखला आहे. खरंच हे कौतुक करण्यासारखं आहे. त्यातही ज्यांच्या नावांना Glamour नाहीये त्यांनी समोर येऊन ते निर्माण ते करणं हे खूप मोठं वैशिष्ट्य", असल्याचं त्यांनी व्यक्त केलं. शिवाय या कार्यक्रमात असणा-या संगीताबद्द्ल आणि नृत्याबद्द्ल सांगतांना त्या म्हणाल्या की, "या वेगवेगळ्या प्रकारची नृत्ये आहेत. त्यातील एक डान्स हा डेट्रॉयवरून येतोय. तसंच या कार्यक्रमाला पुण्याच्या अव्दैत पटवर्धन यांनी संगीत दिलं आहे".

अनुपमा धारकर यांनी अनेक नाटकांचं दिग्दर्शनही केलं आहे, त्याबद्द्लही त्यांनी माहिती दिली, त्या म्हणाल्या," याआधी मी नाटक बसवलं होतं ते म्हणजे, बाबुराव गोखले यांचं ‘करायला गेलो एक’. या नाटकाच्या मूळ गाभ्याला कुठेही धक्का न लावता थोडं Modify केलं. हेच नाटक नवीन Era मध्ये मी बसवलं. त्याच्यानंतर ‘हिमालयाची सावली’ ‘सौजन्याची ऎशी तैशी’, ‘ईच्छा माझी पुरी करा’ असी बरीच नाटके मी केलेली आहे. त्यानंतर मी बॅलेही केलेले आहेत. त्यावेळी मला अनेक मोठ्या माणसांबरोबर काम करायला मिळालं. भालजी पेंढारकर, राजा परांजपे, राजदत्त, माधवराव शिंदे ह्या लोकांचं मला मार्गदर्शन मिळालं. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. ते मला आत्ता दिग्दर्शनासाठी कामी पडतंय" असं त्यांनी सांगितलं.

या सर्वात प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा लाभतो? असं विचारता त्या म्हणाला की, ’चांगला प्रतिसाद मिळतो. काय होतं की सातत्यानं जर तुम्ही एखादा Performance दिला तर लोकं तुमच्या नावानेच प्रयोगाला येतात".

प्रेक्षकांमधील फरक काय सांगाल? यावर त्या म्हणतात की," इथे ७० आणि ६० च्या दरम्यान आलेली जी पिढी आहे. त्या लोकांच्या मनावर अजूनही त्यावेळचा पगडा तसाच आहे. त्यामुळे तो जो प्रेक्षकवर्ग आहे तो चोखंदळ आहे. त्याच्यानंतर जी लोकं आता येतात. त्यांचा Mindset Complete बदलेला आहे. आम्ही ज्यावेळी ’हिमालयाची सावली’ हे नाटक केलं त्यावेळी लोकं म्हणायला लागले की, हे आऊटडेटेड नाटक का करतोय? पण त्यांनी जेव्हा त्यातील Performance पाहिलं ते आनंदीत झाले. म्हणजेच प्रत्येक माणसाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते. सध्या मिक्स असा प्रेक्षकवर्ग इथे आहे. पण तरीही ६० टक्के लोकांना अजूनही क्लासिक कलाकृती आवडतात. तो तुमचा रिपिट ऑडिअन्स आहे. बाकीचे जे आहेत ते कुणी सांगितलं म्हणून बघायला आलेले असतात. भारतात आणखी एक गोष्ट म्हणजे नाटकं खूप पहायला मिळतात. तिथल्या लोकांच्या ते अंगवळनी पडलं आहे. पण इथल्या लोकांना एखादं नाटक पाहण्यासाठी वर्षभर वाट पहावी लागते. त्यामुळे इथे एखादं नाटक आलं तर त्याची उत्कंठा इथे खूप जाणवते" असं त्यांनी व्यक्त केलं.

आपल्या बहुरंगी अभिनयाने त्यांनी रसिकांचं मनोरंजन तर केलंच शिवाय त्यांनी दिग्दर्शनानेही अनेक कलाकृती सजवल्यात. एवढ्या प्रतिभावंत कलावंतानी या कार्यक्रमाचं दिग्दर्शन केलं असल्याने कार्यक्रम नक्कीच चांगला होणार आणि त्याला प्रेक्षकही चांगला प्रतिसाद देतील यात शंका नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणा-या या कार्यक्रमाची माहिती आणि त्याचं वैशिष्ट्य तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी अनुपम धारकर यांच्याशी झगमग टीमने बातचीत केली. आणि एवढ्या ज्येष्ठ कलाकार असून सुद्धा त्यांनीही अगदी उत्सुकतेने आणि आनंदीत होऊन आमच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी अनुपमा धारकर यांना झगमग टीम कडून हार्दीक शुभच्छा....!