Sign In New user? Start here.

नाना पाटेकर

Nana Patekar

नाना पाटेकर

नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ साली मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र येथे झाला. नाना पाटेकरांचे मुळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांत प्रमुख भूमिका केल्या आहेत.

नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे इतका गाजला की या चित्रपटाची हिन्दी आवृत्‍ती ’फांसी का फंदा’ ही सुद्धा खुप गाजली. मोहरे (१९८७) आणि सलाम बॉम्बे (१९८८) या चित्रपटांमध्ये अभिनय केलानंतर त्यांना हिन्दी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खलनायकाचे काम मिळाले. १९८९ साली ’परिंदा’ मध्ये केलेल्या खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. तसेच १९९२ साली ’अंगार’ या चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९४ साली ’क्रांतिवीर’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

नाना पाटेकर यांनी खलनायकाबरोबर अनेक चित्रपटांमध्ये नायकाची भुमिकासुद्धा केली आहे. क्रांतिवीर (१९९४), अग्नी साक्षी (१९९६), खामोशी (१९९६), वजुद (१९९८) हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांनी वेलकम (२००७) या चित्रपटामध्ये विनोदी भुमिका केली आहे. अपहरण (२००५) या चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भुमिकेला सर्वोत्कृष्ट खलनायक फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाले.

मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकाराने स्वता:च्या अभिनयाच्या जोरावर हिन्दी चित्रपट सृष्टीत स्वता:चे पक्के स्थान निर्माण केले. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आपले ’नाना पाटेकर’ होय.

पुरस्कार
वर्ष पुरस्कार भूमिका चित्रपट
१९९० फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता परिंदा
१९९२ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अंगार
१९९५ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर
१९९५ राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर
१९९५ स्टार स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर
२००५ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अपहरण
२००५ स्टार स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अपहरण