Sign In New user? Start here.

’प्रेमासाठी कमिंग सुन’ या सिनेमासाठी नेहा पेंडसेचा फीट अ‍ॅंड फाईन लूक

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

’प्रेमासाठी कमिंग सुन’ या सिनेमासाठी नेहा पेंडसेचा फीट अ‍ॅंड फाईन लूक

मराठी दिनेसॄष्टीतील आघाडीच्या नायिकांपैकी नेहा पेंडसे ही एक अभिनेत्री...... नेहाने आपल्या अभिनयाच्या जोरावर साऊथच्या सिनेमांमध्ये आपली एक वेगळीचं ऒळख निर्माण केली... ’प्रेमासाठी कमिंग सुन’ या सिनेमात नेहा आपल्याला ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळनारेयं...सालस सोज्वळ अशी मराठी सिनेमातील स्त्रीप्रधान नायिकेची चौकट नेहा पेंडसे मोडली आहे... या निमित्तने तिच्याशी मारलेल्या खास गप्पा तुमच्यासाठी

१.’प्रेमासाठी कमिंग सुन’ या सिनेमासाठी तू १० ते १५ किलो वजन कमी केलंयं?

खरं तरं, मी आधीपासूनचं डाएड कॉन्शिअस मी आधीपासूनच होते..त्याचबरोबर मी व्यायामही रेग्युलर करायचे, मात्र इतकंते दिसून येतं नव्हतं.. त्यामुळे मी अजुनचं गंभीर झाले.. मग मी वजन कमी करण्याचा चंग बांधला, केवळ सिनेमासाठी नव्हे तर स्वत:च्या उत्तम आरोग्यासाठी डाएटींग व्यायाम चांगला असतॊ.. प्रत्येकाला फीट अ‍ॅंड हेल्थी दिसणं गरजेचं वाटत असतं, मीही तेच केलं...त्यामुळेचं मी वजन कमी करू शकले.

२. तुझ्या वजन कमी करण्याने सिनेमाला काही मदत झाली का?

हो,खरचं मुळात प्रेमासाठी कमिंग सुन हा सिनेमा रोमँटीक जॉनरचा असल्याने या चित्रपटात रोमास्नचे सिन्स आहेत. या आधी मला रोमान्स करण्याची संधी मिळाली नव्हती.. या सिनेमात ती मिळाली..माझी आणि आदिनाथची या सिनेमात पहिल्यांदाच पेअरिंगनेचं या सिनेमाला न्याय मिळणार होता...त्यामुळे माझ्या फिट दिसण्याच्या प्रयत्नाने या सिनेमाला मदत झाली आहे.

३. यासाठी काही डाएट प्लान किंवा जिम जॉंईट केली होती का?

हो. मी कर्बोदयुक्त पदार्थ खायला सुरूवात केली, रोज सकाळी उठून वर्कआऊट केले, माझ्या पर्सनल ट्रेनरनेही माझ्याकडून भरपुर व्यायाम करून घेतला, खरं तर माझं शरीर अवजडं आहे, इतरांना वर्कआऊटचा तीन चार महिन्यात फायदा होतो, पण काही जणांचं तसं नसतं, माझ वजन आणि शरीर इतक्या लवकरच कमी होणारे नव्हते. यपुर्वीही मी व्यायाम करूनही माझं वजन कमी होतं नव्हत, यावेळी मी वजन कमी करण्याचा मी निश्चय केला. वर्कआऊट सोडायाचा नाही, असं ठरवलं सकाळी वर्कआऊट मग थोडं फ्रुट ज्युस, कार्व्हस खात होते, त्यामुळॆ तब्बल ६ महिन्यानंतर माझ्यात परिणाम दिसून आला.

४.तुझी झिरो फिगरची व्याख्या काय आहे?

झिरो फिगरबाबत माझी व्याख्या थोडी वेगळी आहे, अगदी हाडकुळं दिसण्याला झिरो फिगर नाही म्हणता येणार...अंगावर थोडं तरी मांस असाव,मुळात झिरो फिगर म्हणजे कमनिय आणि आकर्षक बांधा असा होतो.

५. फिटनेससाठी मराठी अ‍ॅक्टरेसनी काय करायला हवे

मुळात हिंदीमध्ये फोटनेसबाबत जितकी जागृती आहे तितकी जागृती मराठीत दिसून येत नाही. आपल्या मराठीत अनेक अभिनेत्री डाएट कॉन्शिअस झाल्यात मात्र हवी तितकी प्रगती झाली नाहीये. अभिनयासोबतचं कॉम्पेक्ट दिसणंही गरजेचं आहे, त्यामुळे ग्रुमिंगपासून सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत.

६. या सिनेमात तुझा डिफरंट लुक आहेत तर लूकमधला तुझा आवडता लुक कॊणता?

खरं तरं हे मी गुलदस्त्यात ठेवणं पसंद करेन, नाहीतर सिनेमाची मजा घालवल्यासारखं होईल, या सिनेमातील माझी भूमिका इमाने एतबारे करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि माझ्यासाठी तेचं महत्वाचं आहे..

७. तुझ्या "प्रेमासाठी कमिंग सुन सिनेमाकडून काय अपेक्षा आहेत?

आमच्या सिनेमाच्या पूर्ण टीमने जीव तोडून काम केलयं. कमी वेळात चित्रीकरण पुर्ण करण्याचा अव्हान आमच्यासमोर होतं, त्यामुळे सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत प्रत्येकाने जीव तोडून काम केलय. हा सिनेमा जरी लव्हस्टोरी जॉनरचा होता तरी यातली माझी भूमिका गंभीर आहे, प्रत्येकाने आपापले १००% दिले असल्याने आमच्या सिनेमाला नक्कीचं यश मिळेलं, माझे प्रेक्षक माझ्या या नव्या रूपाला स्वीकारतील.

-----------