Sign In New user? Start here.

प्रत्येकाच्या मनातील स्वप्नांना ‘हाक पावसाची’

प्रत्येकाच्या मनातील स्वप्नांना ‘हाक पावसाची

 
 
 

- अमीत इंगोले
( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )

BMM अधिवेशनात अनेक भारतीय कार्यक्रमांबरोबरच अमेरिकेतील सुद्धा अनेक चांगले कार्यक्रम यावेळी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘डल्लास’ येथील ‘दर्पण’ निर्मित ‘हाक पावसाची’ हे संगीतमय नाटक. या नाटकाचं दिग्दर्शन/लेखन नितीन करंदीकर यांनी केलं असून या नाटकाच्या संकल्पनेबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत....

या नाटकाच्या कथानकाबद्दल आणि संकल्पनेबद्द्ल आम्हाला आणि वाचकांना जाणून घ्यायला आवडेल असं म्हणता ते सांगतात की, "आपल्यातला प्रत्येकजण कुठली ना कुठलीतरी स्वप्नं उरात बाळगून जगत असतो. आयुष्यात प्रत्यक्षात मात्र काही वेगळंच घडत असतं, स्वप्नं मात्र हृदयाच्या कुठल्यातरी कोप-यात दडून गेलेली असतात आणि अधूनमधून हळूवार साद घालत असतात. अचानक अशीच एक हाक येते आणि अमेरिकेत सुखासमाधानात जगणा-या रमेशच्या आयुष्यात एक वेगळंच वळण लागतं. कडू गोड आठवणी गोळा होतात. त्याची पत्नी, मुलगा, मित्र आणि मैत्रिणी ह्यांच्याशी असलेली नाती अचानक वेगळ्या स्वरूपात उलगडू लागतात. जणू काही एक वेगळीच शक्ती त्याच्या ‘स्वप्नांची’ सूत्रे हलवत असते. वरवरचा शांत आणि कठोर रमेश आणि आत कुठेतरी हरवलेला रमेश हया दोघांतली दरी इतकी मोठी आहे हया वस्तुस्थितीची जाणीव त्याला ह्या हाकेमुळे होते. या दरीतून घुमणारी ही हाक आणि त्यातून उमटणारे असंख्य प्रतिध्वनी यांना तो कसा प्रतिसाद देतो हे या नाटकाचं कथानक", असल्याचं त्यांनी सांगितलं.

या नाटकात तुमची काय भूमिका आहे असं विचारता ते म्हणाले की, "यात जी मुख्य भूमिका म्हणजेच रमेशची भूमिका मी करणार आहे. त्याचबरोबर या नाटकाचं दिग्दर्शन आणि लेखनही मीच केलंय. आणि या नाटकात लाईव्ह सिंगिंग होणार आहे. त्यातील काही गीतांना चालीही मीच बसवल्या आहेत."

यातील कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव त्यांनी शेअर करतांना सांगितलं की, यात एकूण ३५ ते ४० कलाकार आहे. आणि हे सर्व कलाकार हौशी आहेत. सोबतच संगीतकार, कोरिओग्राफर हे सुद्धा हौशी आहेत. त्याचबरोबर यात एका सिन आहे ज्यात लहान मुलांनाही मी घेतलं आहे. त्यांनी तर अतिशय मस्त काम केलं आहे", असं ते म्हणाले.

या नाटकाची संकल्पना सुचण्याचं काही खास कारण आहे का? यावर ते म्हणाले की, "(हसत हसत)तसा हा Topic माझ्या खूप जवळचा आहे. (म्हणजे तडजोड वैगेरे नाही.) पण ही संकल्पना तशी Common आहे. माझे मित्र इथे नेहमी येतात. कुणी प्रोग्राम घेऊन येतात, कुणी नाटक घेऊन येतात. मग ब-याचदा एक Conversation निर्माण होतं. त्यातून मग मला असं सुचलं की, जर एखाद्याने ही ‘स्वप्ने’ ही भूक अशी कोंडून ठेवली तर काय होईल? त्याची मनस्थिती काय होईल? आणि एकदम त्याच्या आयुष्यात ते राहून गेलेलं स्वप्न पुन्हा आलं तर काय होईल? असं सगळं मांडायचं होतं".

नितीन करंदीकर हे या नाटकात दिग्दर्शक, लेखक आणि अभिनय अशा तीन भूमिका करताहेत. या अनुभवाबद्द्ल त्यांना विचारता ते म्हणाले की, "खूप मजा आली या सर्व Progress ची. तशाच प्रकारचे Character शोधणं. हे थोडं कठीण होतं. कारण नाटकातील माझ्या पत्नीला गाणं येणं महत्वाचं आहे. मग गाणं येणारी अभिनेत्री शोधणं. एक एक करत सगळे जमलो. एक मैत्रिण आहे तिला डान्स आणि नाटक येतं. मग तिची मदत घेतली. अशाप्रकारे सर्व एकत्र आलो. आणि नाटकाला सुरवात झाली. नाट्कात एकूण सात आयटम आहेत. स्टेजवर गायलेली गाणी, नृत्ये सादर हॊणार आहेत, खूप चांगला अनुभव आहे हा माझ्यासाठी..".

लेखन, दिग्दर्शन करतांना कोणत्या प्रेक्षकवर्गाला डोळ्यांसमोर ठेवून नाटकाची निर्मिती केली?याबाबत ते म्हणतात की, "सर्वांसाठी आहे...! म्हणजे हा विषय खूप Common आहे. मी अमेरिकेत राहतो म्हणून नाटकातला अभिनेता अमेरिकेतला दाखवला आहे. पण तडजोडीचा जो विषय आहे तो इतका Common आहे की, त्याला Language Barrier नाहीत. म्हणून सर्वांना डोळ्यांसमोर ठेवून ते लिहीलेलं आहे", असं ते म्हणाले.

कलाकारांची निवड कशी केली जाते? याबाबत ते सांगतात की, "गेली अनेक वर्ष मी रंगभूमीवर काम करतोय. त्यामुळे इथले लोक मला माहिती आहेत. त्यांच्यांशी ब-याचदा संबंध येतोच. ज्यांनी आधी नाटकं केली आहेत अशांची माहिती काढत गेलो. आणि सगळं सोपं होत गेलं. पण ट्रॅव्हलींगचा विषय आला तर आमच्याकडे थोडं कठीण होतं कारण अधिवेशन शिकागोला आहे. आता कुणाला यायला जमतं आणि कुणाला जमत नाही हे पण बघायला लागतं. यावेळी खरंच खूप चांगला ग्रुप तयार झालाय ज्यांना गायन आणि नाटकात काम करण्यात Interest आहे. प्रथम मी दिलीप राणे आणि राहूल कर्णिक यांना भेटलो. आम्ही मागच्या बीएमएमला सुद्धा एकत्र कार्यक्रम केला होता आणि त्यांनी माझ्या बरोबर ह्या कलाकृतीची निर्मिती करण्याची जबाबदारी घेतली. कोरिओग्राफरसाठी प्रिया कर्णिक तयार झाली आणि म्युझिकसाठी जीवन बेटीगिरी. या दोघांनी अनेक चांगल्या निर्मिती केल्या आहेत. माझ्या बारकोने सुद्धा(अश्विनी) खूप पाठिंबा दिला आणि स्ट्रॉंग बेस तयार झाला. मग मेन पात्रांच्या भूमिका करणा-या प्रिया द्रव्हेकर, हर्षद खाडिलकर, पल्लवी बाफना, संजय दाते, जया दाते, सुभाष गायतोंडे, राहूल कर्णिक ह्यांनी होकार दिला. मुख्य म्हणजे समीर दाते हा इथं वाढलेल्या मुलाची भूमिका करायला तयार झाला. त्याच्यासारखेच इथं वाढलेले अंकूर करंदीकर, देवांक राणे, मानस साठे, अर्जुन दाते, त्रिशा कर्णिक, शलाका दामले, मोनिका दामले आणि रिद्धी राणे आणि त्यांचा परिवार या नाटकात आहेत. या सगळ्यांबरोबर रेश्मा हजरनिस, पद्मा जोशी, सतीश जोशी, मंदार जोशी, मंजिरी जोशी, कुलकर्णी, दामले, दिप्ती पत्की आणि हर्चेकर यांचा अभिनय आणि नृत्यांनी ही कलाकृती सजली आहे.

शिकागोला दुस-यांदा अधिवेशन होत आहे त्याबद्द्ल त्यांचे मत विचारता, ते म्हणाले की, "एकतर हे खूप स्पेशल आहे. कारण आधी मी पिएचडी करण्यासाठी चार वर्ष शिकागोला होतो. आणि या अधिवेशनाबद्द्ल ज्यावेळी मला फोन आला की शिकागोला अधिवेशन होतंय तेव्हा खूप आनंद झाला. म्हणजे एकदम घरी जाऊन काम केल्या सारखं वाटेल", असं त्यांनी आनंदीत होऊन सांगितलं.

शिकागो अधिवेशनात येणा-या प्रेक्षकांना संदेश देतांना म्हणाले की, " ह्या नाटकातला Main Message 'Follow your Dream'. म्हणजे हेच की, आपली राहून गेलेली स्वप्ने नंतर पूर्ण करुन बघावी. तूमचं स्वप्नं कोंडून ठेवू नका. जे पहिलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा निदान प्रयत्न तरी करावा", असं ते म्हणाले.

प्रत्येकाच्या मनात त्याच्या राहून गेलेल्या स्वप्नांना जागा असतेच, फक्त त्यावर अनेक अडचणींमुळे थोडी धूळ चढते. तीच राहून गेलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्नतरी प्रत्येकाने केला पाहिजे. असा संदेश या संगीतमय नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नितीन करंदीकर यांनी दिला आहे. हा विषय अतिशय कॉमन असल्याने प्रेक्षकांच्या मनाच्या तारा नक्कीच छेडल्या जातील यात शकां नाहीये. प्रत्येकाच्या मनात असलेल्या या विषयावरील नाटकाच्या यशस्वी प्रयोगासाठी नितीन करंदीकर आणि त्यांच्या टीमला झगमग टीमकडून हार्दीक शुभेच्छा.....!