Sign In New user? Start here.

मराठी ‘नो एन्ट्री’ची बिपाशा - सई ताम्हणकर

Sai Tahmankar interview for marathi movie 'no entry pudhe dhoka aahe'

मराठी ‘नो एन्ट्री’ची बिपाशा - सई ताम्हणकर

 
 
 

हिंदीत गाजलेल्या ‘नो एन्ट्री’ या सिनेमाचा मराठी रिमेक असलेला ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. हा सिनेमा सुरवातीपासूनच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेचा विषय ठरलाय. मात्र एका गोष्टीमुळे तो आणखीनच चर्चेत आहे तो म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर हिने यात बिकीनीमध्ये सीन दिल्याच्या विषयाने...मराठीत पहिल्यांदाच बिकीनीमध्ये सीन शूट करण्यात आला असून सद्या सोशल मिडियावरून याची चांगलीच चर्चा आहे. या नव्या बोल्ड अवताराबद्दल आणि या सिनेमाबद्दल सईशी केलेली खास बातचीत...

* आगामी ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ या सिनेमात तुझा एक वेगळाच अवतार दिसतोय, या सिनेमाविषयी आणि तूझ्या भूमिकेविषयी सांग.

- हा सिनेमा हिंदीतील ‘नो एन्ट्री’चा मराठी रीमेक आहे. यात बिपाशा बासूने केलेली भूमिका मी मराठीत करत आहे. मी यात डान्सबार मध्ये डान्स करणारी मुलगी आहे. तिच्या आयुष्यात पैशांना खूप महत्व आहे. पैशांसाठी काहीही करणारी गुड लूकींग आणि ग्लॅमरस मुलीची भूमिका मी यात साकारते आहे. आणि सिनेमाविषयी सांगायचं तर हा सिनेमा बघताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल. एक वेगळाच अनुभव मिळेल. हसून हसून प्रेक्षकांची पोटं नक्कीच दुखतील याची मला खात्री आहे.

* या सिनेमाचे ट्रेलर चांगलेच गाजत आहेत, ते तुझ्या बिकीनी सीनमुळे...पहिल्यांदाच मराठीत ते होतंय. याचं नर्व्हसनेस नव्हतं का?

&nbsp - हो..होतं ना..! पण आमची जी सगळी टीम आहे त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. स्पेशली अंकुश, क्रांती, मनवा, भरत, अनिकेत सर्वांनीच मला चिअरअप केलं. पण हे एवढं सोपंही नव्हतं. कारण आपल्याला शेवटी उत्तर द्यावं लागतं ते सोसायटीला..त्यासाठी तुमची मानसिक तयारी खूप जास्त पाहिजे. आणि माझ्या सहका-यांच्या सपोर्टमुळे ते शक्य होऊ शकलं.

Sae Tahmankar Interview

* बिकीनी सीनवर तुझ्या घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या ?

- खरंतर माझ्या घरच्यांना माझं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे वेगळं असल्याचं माहित आहे. आणि त्यांनी या दोन्ही गोष्टी मिक्स नाही केल्या ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. त्यांना हे माहित आहे की, आयुष्यभर मला अभिनयाची जेवढी व्हरायटी द्यायची तेवढी देत रहाणार. सोबतच मला हेही स्वत:ला तपासून बघायचं होतं की, ‘अनुबंध’ मधली अश्विनी करताना मी एका पंजाबी ड्रेसमध्ये जेवढी सहज वावरू शकते, तर मी बिकीनीमध्येही सहज वावरू शकते का ? आणि ही संधी या सिनेमाच्या माध्यमातून माझ्याकडे चालत आली आणि ही भूमिका मी खूप एन्जॉय सुद्धा केली आहे.

* हा सिनेमा रिमेक करताना हिंदी ‘नो एन्ट्री’च्या कथेत आणि त्यात बिपाशाने केलेल्या भूमिकेत काही बदल आहेत का ?

- हे पडद्यावर बघून प्रेक्षकांनीच ठरवावं. मला असं वाटतं की, जरी तो रोल बिपाशाने केला असेल तरी तो तिने तिच्या स्टाईलने केला आहे. त्याचप्रमाणे आमच्या टीममधीलही सर्वांनीच त्यांच्या त्यांच्या स्टाईलने रोल केले आहेत. असं म्हणता येणार नाही की रिमेक असला तरी तो तसाच रंजक असेल. कारण यातील प्रत्येकाचं काम आपापल्या स्टाईलने झालं आहे. त्यामुळे त्यात नाविन्य जरूर असणार...

* या सिनेमाचं संगीत सुद्धा खूप गाजतंय त्याबद्दल काय सांगशील ?

&nbsp - या सिनेमाचे संगीतकार सरगम-नकाश हे माझे खूप जुने मित्र आहेत. त्यांनी याआधीही माझ्या ‘राडा रॉक्स’ या सिनेमासाठी संगीत दिलं होतं. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते दोघेही ए.आर.रेहमान यांना असिस्ट करतात. दोघेही खूप टॅलेंटेड आहेत. या सिनेमातील प्रत्येक भूमिकेला जसा या सिनेमातून न्याय मिळेल तसाच त्यांच्या म्युझिकला सुद्धा मिळावा. कारण त्यांनी हिंदी ‘नो एन्ट्री’च्या संगीताचा बिलकुल गंध न येऊ देता मेलडीवर भर दिला आहे. मला खात्री आहे की, त्यांचं संगीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

* यापुढच्याही सिनेमांमध्ये तूझा असाच अवतार बघायला मिळणार आहे का ?

- खरंतर मी असं काही ठरवलं नाहीये. या सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये बिकीनीची डिमांड होती. निर्मात्यांनी तसं मला आधी सांगितलं होतं. प्रेक्षक कितपत हे स्विकारतील मला माहित नाही. पण मला वाटतं की, हाच प्रेक्षक हिंदी सिनेमातील बिकीनी घातलेल्या अभिनेत्रीची तारीफ करतो आणि दुसरीकडे मराठी मुलीने असे केले की त्यांची नाकं मुरडल्या जातात. हे का होतं ? खरंतर असं नको व्हायला. मला वाटतं आपण काळासोबत पुढे जायला हवं.

* या सिनेमात काम करण्याचा अनुभव कसा होता ?

- खूपच मस्त...! एकतर यात हिंदी चित्रपटांचे निर्माते इन्व्हॉल्व आहेत. त्यानंतर डिरेक्टर आणि अभिनेता अंकुश चौधरी याच्यासोबत मी ‘झकास’ सिनेमासाठी काम केलं आहे. बाकी सर्वांबरोबर सुद्धा मी काम केलं आहे. त्यामुळे खूप चांगलं वातावरण होतं. ऎकमेकांना खूप चांगलं प्रोत्साहन दिलं.

अमित इंगोले