Sign In New user? Start here.

‘प्लॅटफॉर्म’मधून डॅशिंग एन्ट्री - सई लोकूर

 

‘प्लॅटफॉर्म’मधून डॅशिंग एन्ट्री - सई लोकूर

 
 
 

- अमीत इंगोले
( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )

तब्बल चौदा पुरस्कार पटकावणा-या वीणा लोकूर यांनी आता निर्मितीबरोबरच चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल टाकले असून ‘प्लॅटफॉर्म’ हा त्यांचा येत्या १५ जुलै रोजी मुंबई, पुणे येथील प्रेक्षकांच्या भेटीस येतोय....या चित्रपटातून सई ही त्यांची मुलगी अभिनेत्री म्हणून पदार्पण करीत आहे. प्लॅटफॉर्म करतांना तिला काय वाटले हे जाणून घेण्यासाठी सई लोकूर हिच्याशी थेट संवाद साधला....

* या चित्रपटातील लीड रोलबद्द्ल काय सांगशील?

- या चित्रपटात मी शिवानीचे कॅरेक्टर करते आहे. हा खूप चॅलेंजिंग रोल होता, कारण हा सगळा चित्रपट याच कॅरेक्टरवर आधारलेला आहे. ही खरेतर शिवानीचीच गोष्ट आहे. या चित्रपटाच्या पूर्वार्धात मी शिवानी नावाच्या अठरा वर्षाच्या मुलीची भूमिका करते आहे. तर चित्रपटाच्या उत्तरार्धात मी तेहतीस वर्षांच्या स्त्रीचा अभिनय केला आहे. शिवानीच्या वयात, विचारांमध्ये आणि तिच्यात एकूणच झालेला हा बदल मी माझ्यापरीने दाखवला आहे. वयातला हा बदल दार्शनिक तर होताच पण ते अभिनयातूनही दिसणे खूपच महत्वाचे होते. इंट्रोड्क्शन हे हवे असते ते म्हणजे एक छान अशी एकदम डॅशिंग एंट्री मला प्लॅटफॉर्ममध्ये मिळाली आहे. त्यामुळे ही माझ्यासाठी एक मोठी संधी तर आहेच पण माझा अभिनयही लोकांना कळेल आणि आवडेलही याची मला खात्री आहे. खूप चॅलेंजिंग, हार्डवर्किंग आणि इंटरेस्टिंग असे हे शिवानीचे कॅरेक्टर आहे. यात शिवानी उभी करताना मला खूपच मजा आली.

* प्लॅटफॉर्मच्या संदर्भातील जी काही कॅरेक्टर्स आहेत त्यांच्याबद्दल तू काय, कसे आणि कधी ऑब्झर्व्ह केलेस?

- या चित्रपटाची पार्श्वभूमी ‘ती’ आहे. एका रेल्वे प्लॅटफॉर्मचा तो इन्सिडन्ट आहे. तो इन्सिडेन्ट ‘ती’ म्हणजे शिवानी पाहते. मुलांना सोडून दिले गेले आहे, बेवारस केले गेले आहे. या चित्रपटात हे असल्याने त्यावर विचार तर करावा लागलाच. आता एकतर मला लहान मुले खूपच आवडतात. त्यामुळे आम्ही जेव्हा शूटिंग करत होतो तेव्हा खूप लहान मुलांबरोबर मला इंटरॅक्ट करायचे आहे अशी स्टोरी होती. तेव्हा त्या मुलांची अशी परिस्थिती आहे आणि त्यांची काळजी घ्यायची असल्याने मला ते करणे जमले कारण मी पर्सनल लाईफमध्ये लहान मुलांशी अटॅच होणारी आहे. त्यांच्याबद्द्ल असे काही विचित्री पाहिले ऎकले की मला खूपच वाईट वाटते. त्या मुलांबद्दल हे वाटणे आहे, त्यांच्याबद्दलची जी भावना मला चित्रपटात व्यक्त करायची होती, ती मी प्रत्यक्षात तशी असल्याने व्यक्त करू शकले असे मला वाटते.

* या चित्रपटात तू कोणाच्या अपोझिट आहेस? आणि त्याच्यासोबत काम करताना काय अनुभव होता ते सांगशील का?

- अस्ताद काळे. त्यांच्याबरोबर काम करताना खूपच मजा आली. याचे शूटिंग बेळगावलाच होते. आणखी एक गोष्ट माझ्याबाबतीत योगायोगाने अशी झाली की या चित्रपटात काम करणारे बरेचसे कलाकार हे याआधीपासूनचे बेळगावचे कॉलेजमधले माझे मित्रच आहेत. कॉलेजमध्ये आम्ही खूपच दंगा मस्ती करत असायचो आणि इकडे सेटवरही तेच चालत होते. आम्ही सगळेच मित्र असल्याने शूट करताना अजिबातच वेगळे काही वाटले नाही. खरेतर हे शूटिंग आम्ही सगळ्यांनीच खूप एन्जॉय केले. आणखी एक गोष्ट मला सांगावी असे वाटते ती म्हणजे अस्तादकडून मी खूपच गोष्टी शिकले. तो ठहराव देऊन अॅाक्टिंग करणारा आहे आणि तो एकटाच असे नाहीतर मोहन जोशी आणि त्यांच्यासारख्याच इतर मोठ्या कलाकारांकडून मी खूपच वेगवेगळ्या गोष्टी शिकले. प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने अभिनय करतात, तेव्हां त्यांच्याबरोबर काम करून, ते कसे काम करतात याचे निरीक्षण करत बरेचकाही समजून घेता आले, खूप कमी दिवसांमध्ये खूपच वेगळे मला करायला मिळाले.

* या फिल्मची डिरेक्टर तुझी आईच असल्याने काही सीन करताना ऑकवर्ड वाटते आहे असा प्रसंग आला का?

- नाही. असे कधी झाले नाही. उलट अगदी अॅमट इझ आम्ही काम केले. डिरेक्टर आई असल्यामुळे जास्त सोपे झाले, कारण मी दहा वर्षे तिच्याबरोबर थिएटर करते आहे. त्यामुळे तिला जसे माझे वीकनेस पॉईंट माहिती आहेत तसेच मला काय येते, किती येते, कसे येते हे सगळेच तिला माहिती आहे, तिची काम करायची पद्धतही माहिती आहे, शिवाय इतकी वर्ष एकमेकींनी बरोबर काम केले असल्याने हा चित्रपट करताना खूपच सोपे झाले. आम्ही जेव्हा शूट करत असायचो तेव्हा आम्हाला फारसे बोलावेही लागत नव्हते. आई डिरेक्टर असल्याने मॉनिटरवरही बसलेली असायची आणि टेक झाला की मी आईकडे पहायचे. मग तिला काय म्हणायचे आहे, तिच्या मनात काय आहे हे माझ्या आईकडे पाहून मला कळायचे.

या चित्रपटाच्या गाण्यामध्ये थोडासा रोमान्स असलेले एक-दोन शॉट होत. पण ते गाण्यात असल्याने दीपाली विचारे कोरिओग्राफर करत होती, आई तिथे नव्हती, त्यामुळे मला ऑकवर्ड वाटावा असा प्रसंग घडला नाही. अस्ताद बरोबर सीन करताना ते काही बोल्ड सीन नाहीत त्यामुळे जे काही सीन होते तेव्हा आई मला सरळ सांगत होती की मला असे हवे आहे, तेव्हा असे कर. आता ते सांगताना ती शिवानीसाठी सांगत होती, सईसाठी नाही हे क्लीअर होते.

* या रोलसाठी तुला काही वेगळे होमवर्क करावे लागले का?

- होमवर्क तर खूपच करावे लागले. एकतर मी इंग्लिश मीडियमची आहे. शिवाय माझे शिक्षण बेळगावला झालेले असल्यामुळे शाळेत मला कानडी भाषा शिकावी लागली होती. कारण मराठी हा विषय मी आजवर कधीच शिकले नव्हते. त्यामुळे मला माझे मराठी बोलतानाचे उच्चार खूप मेहनत घेऊन सुधारावे लागले. मला स्क्रिप्ट मिळाले तेव्हा मी त्याच्यावर खूप वर्किंग केले. शिवाय शिवानीच्या वयातला अठरा ते तेहतीस वर्षांमधला जो दाखवायचा होता तो बदल खूप विचार करुन वर्कआऊट केला. म्हणजे असे की अठरा वर्षांची मुलगी कशी बोलेल? तिची बॉडी लॅंग्वेज कशी असेल? ती तेहतीस वर्षांची झाल्यावर तिच्या आवाजात कसा बदल होईल? याची काळजी आम्ही डबिंगच्यावेळीही घेतली. या सगळ्याबद्लांवर मेहनत घेतली. आता प्रत्यक्षात पडद्यावर प्रेक्षकांने ते पाहायचे आणि आपले मत मांडायचे. सगळ्यांना वेगळ्या विषयावर असलेला प्लॅटफॉर्म हा चित्रपट आणि त्यातली माझी भूमिक नक्कीच आवडेल यात शंका नाही.