Sign In New user? Start here.

मराठी लोकांचा हिंदी ‘स्टॅण्डबाय’

Sanjay Surkar interview

मराठी लोकांचा हिंदी ‘स्टॅण्डबाय’

 
 
 

- झगमग टीम

तब्बल चार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेते मराठी चित्रपटसृष्टीतले एक प्रख्यात दिग्दर्शक संजय सुरकर यांचा प्रकाश चौबे निर्मित बीआरसी प्रॉडक्शन्सचा ‘स्टॅण्डबाय’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे. चाकोरी बाहेरचा विषय घेऊन उत्तम चित्रपट करणारे दिग्दर्शक अशी सूरकरांची ओळख आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेल्या काही गप्पा...

‘स्टॅण्डबाय’चा विषय कसा सुचला याबद्द्ल ते सांगतात की, पाच-सहा वर्षापूर्वी प्रवीण तरडे याने मला एक कथा वाचायला दिली. ती कबड्डीवर होती. तेव्हाच मी त्याला म्हणालो की फुटबॉलवर जास्त अभ्यास करून फिल्म करता येईल. त्याने ती तशी परत लिहून आणली तेव्हापासून निर्मात्याचा शोध सुरू होता. दरम्यान जळगावच्या माझ्या मित्राने मला फोन करून सांगितले की प्रकाश चौबे यांना फिल्म करायची आहे. आमची भेट झाली. मराठी ऎवजी हिंदी करण्याणा मी प्रस्ताव मांडला आणि गोष्ट ऎकली. त्यांना ती खूपचा आवडली. आणि पुढच्या सोपस्कारांना सुरवात झाली.

या चित्रपटात ना लव्ह स्टोरी आहे. ना हिरोईन. तेव्हा हि रिस्क आहे असं नाही का वाटलं, यावर ते म्हणतात की, तुमची गोष्ट जर उत्तम असेल तर बाकीच्या गोष्टी कमी महत्वाच्या ठरतात. खासकरून २०११ मध्ये तर नक्कीच. आता आपल्याकडे हिरोईन हवी अशी एक परंपरा आहे, हे खरं आहे. शिवाय मसालाही पाहिजे असे होते. पण आता तो काळ राहिलेला नाही असं मला वाटतं. पुर्वी ठिक होतं. आज लोकांना बदल हवा आहे. गेल्या ३-४ वर्षात आलेल्या चित्रपटांचा आढावा घेतला तर चित्रपटांच्या विषयात आलेलं वेगळेपण लक्षात येईल. आता धोका तर पत्करावाच लागतो. मी मराठी चित्रपट केले तेव्हाही धोका होताच, पण तो पत्करणारे निर्माते मला मिळाले. मी याबाबतीत लकी ठरलो. आता पहिला हिंदी चित्रपट करतोय त्यातही मी लकीच आहे. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की माझ्या मनातली गोष्ट मला पडद्यावर मांडता येते.

हिंदी सिनेमा करताना आपण ब-यापैकी धोका पत्करतोय असे वाटले नाही का? हा प्रश्न विचारण्याचे कारण की तुमच्या सिनेमात लीड रोलमध्ये हिरोईन नाही. लीड रोल मध्ये मोठा स्टार नाही. खेळ या विषयावर याआधी चित्रपट येऊन गेले आहेत तरीही खेळ याच विषयावर हा सिनेमा आहे. त्यामुळे मोठी रिस्क पत्करून हिंदीत तुम्ही लॉंच होताय असे नाही का वाटले? यावर ते म्हणाले " रिस्क तर यात आहेच पण मला रिस्क घ्यायला आवडते. अॅीज ए डिरेक्टर म्हणून तर मला ते आवडते आणि माझ्या निर्मात्यानेही धोका पत्करायची तयारी दाखवली. या चित्रपटात स्टार घ्यायचे का याबद्द्ल आमची चर्चा झाली तेव्हा स्टार्स नकोत असे माझे मत त्यांना सांगितले. त्यावर मी त्यांना असेही म्हणाले की, स्टार्स घेतले तर त्याचा बेनिफिट मिळेलच असे नाही. त्यामुळे स्टार्सच्या मानधनाचे पैसे आपण प्रॉडक्शनसाठी खर्च केले तर एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचेल. आता स्टार्स नको म्हणण्यामागचे दुसरे एक कारण असे की हिंदीतले सगळे स्टार्स वयाच्या तिशीपलीकडचे आहेत. फुटबॉल खेळणारा खेळाडून म्हणून त्यातले कोणी शोभणारही नाही अशी भितीही मला वाटत होती. माझा हिरो प्लेअर वाटायला हवा होता. तो वाटण्यातच स्टोरीचा सक्सेस आहे हे मला माहिती होते. याच कारणासाठी मी माझ्या कलाकारांना फुटबॉलची दोन-तीन महिने प्रॅक्टिस दिली. मॅचमध्ये खेळणारे दोन कलाकार वगळता बाकीचे सगळे स्टेट आणि नॅशनल खेळलेले प्लेअर्स असल्याने सगळे अस्सल वाटावे याची खूप काळजी घेतली. काहीतरी खोटे-खोटे चालले आहे असे जाणवणार नाही म्हणून खूप काळजी घेतली.

सचीन खेडेकरांची यात भूमिका आहे त्यांच्याबद्द्ल बोलतांना ते म्हणाले की, " तो उत्तम नट आहे. या सिनेमात एक मराठी फॅमिली आहे म्हणून मुद्दाम नवीन कोणता चेहरा घेतला नाही. नाहीतर आडनाव मराठी आणि मराठीपण नसलेला भलताच वेगळा चेहरा असलेला कलाकार काम करताना कोणालाच पाहवला नसता...म्हणून मराठी कॅरेक्टर आणि मस्त रोल असल्याने सचिनलाच घेतले. आदिनाथलाही घेताना हाच विचार होता. शेवटी मराठी म्हटले की एक अॅ्टिट्यूड येतोच की. तो आला पाहिजे. यांना घेतल्याने तो आला.

आदिनाथ या चित्रपटाचा हिरो आहे त्याच्याबद्दलही ते सांगत होते, ते म्हणाले की, अगदी गोड मुलगा आहे. बेसिकली शहरातले वातावरण त्याला तसे मिळालेले आहे. तो महेश कोठारेंचा मुलगा आहे. त्यामुळे फिल्म म्हणजे काय हे लहानपणापासूनच त्याला माहिती आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना त्याला काही शिकवायची गरज भासली नाही. सांगितलेले समजून घेत होता आणि मला असे हवे आहे असे म्हटले की रिझल्ट देत होता. सेटवर आणि कॅमे-यासमोर तो एकदम फ्रेश आहे.

आदिनाथल हिरो म्हणून घ्यायचा असे काही ठरले होते का? यावर ते म्हणाले की, " नाही. आम्ही ब-याच जणांच्या अॅहडिशन घेतल्या..आणि मग त्यातून आदिनाथची निवड झाली. आम्हाला प्लेअरचा लुक हवा होता आणि याबाबतीत इतरांपेक्षा आदिनाथ आधिक योग्य वाटला. इतरांमध्ये एक फिल्मीपण होते, ते मला नको होते. एक नॅचरल आणि क्लिन वाटावे असे कॅरेक्टर दिसणे गरजेचे होते. त्यामुळे आदिनाथची निवड झाली.

मराठीत जे आहे ते हिंदीत नाही असेकाही ‘स्टॅण्डबाय’ करताना जाणवले का? यावर ते म्हणाले की, " नक्कीच जाणवले आणि तो फार मोठा फरक आहे. मराठी चित्रपटाला रिजनल म्हणजे प्रादेशिकतेचा फील असतो. हा फील घेत घेत एका नात्याने आपण काम करत असतो. त्यात एक अॅशडजेस्टमेंट असते. एक मैत्री असते. खरे म्हणजे आपण ती मानसिकरित्या कबूल केलेली असते. हिंदी चित्रपट करताना तसे नसते. मुळातच अत्यंत प्रोफेशनल अॅनटिट्यूड असतो.

स्पोर्टसवर आलेले इतर हिंदी चित्रपट आणि ‘स्टॅण्डबाय’यातील फरक विचारता ते म्हणाले की," मुळातच मोठा फरक आहे. या चित्रपटात मी मांडलेला विषय आजवर एकाही भारतीय चित्रपटात आलेला नाही. आता गोल हा तर फुटबॉलवरचाच चित्रपट होता. त्याचा फॉर्मच वेगळा होता. ‘स्टॅण्डबाय’ हा आपल्याच मातीतला सिनेमा आहे. भारतातल्या खेळाडूंची गोष्ट आहे. इथल्या राजकारणी लोकांची गोष्ट आहे. आज आपल्यकडे एवढे जबरदस्त राजकारण चालले आहे की खेळालाही त्यांनी सोडलेले नाही. चक दे इंडिया मध्ये वेगळी गोष्ट होती. युनिटी असेल तर आपण खेळू शकतो आणि जिंकूही शकतो हे त्यात सांगितले होते. ‘स्टॅण्डबाय’चा विषय असा नाही. हा इथले राजकारण, इथली निवड समिती, इथले खेळाडू आणि इथला खेळ असा विषय आहे. यापेक्षाही अधिक शब्दात सांगायचे झाले तर हॉलिवूड किंवा बॉलिवूड यापैकी कोणाचाही प्रभाव या सिनेमावर नाही. ही खेळाबद्द्लची एक स्वतंत्र कथा आहे आणि ती आजच्या काळाची गरजही आहे.