Sign In New user? Start here.

Santosh Manjrekar

 

Santosh Manjrekar

     संतोष मांजरेकर

   मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटानं घवघवीत यश मिळवलंय. या चित्रपटानं मराठी माणसाचा स्वाभिमान पुन्हा एकदा जागवण्याचा प्रयत्‍न केला. मराठी माणसाला त्याच्या चुका दाखवण्याचा प्रयत्‍न केला गेला. पण प्रश्न पडतो की मराठी माणसाला त्याच्या चुका दाखवण्याइतपतंच आपण विचार करु शकतो. पुढे काय ? त्यानिमितानं चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत.......................

   मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटानं घवघवीत यश मिळवलंय. या चित्रपटानं मराठी माणसाचा स्वाभिमान पुन्हा एकदा जागवण्याचा प्रयत्‍न केला. मराठी माणसाला त्याच्या चुका दाखवण्याचा प्रयत्‍न केला गेला. पण प्रश्न पडतो की मराठी माणसाला त्याच्या चुका दाखवण्याइतपतंच आपण विचार करु शकतो. पुढे काय ? त्यानिमितानं चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

   मी शिवाजीराजे भोसले बो लतोय हा चित्रपट हाऊसफुल होत आहे... हा चित्रपट पाहुन किती मराठी माणसांचे विचार बदलतील असं तुम्हाला वाटते?

    निश्चितच हा चित्रपट ज्या प्रकारे हाऊसफुल्ल चालला आहे, त्यावरुन असंच वाटते की मराठी माणुस यातुन काही तरी नक्कीच शिकेल. शिका, संघटीत व्हा आणि लढा हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मराठी माणसात बिंबवण्याचा प्रयत्‍न यामधुन करण्यात आलेला आहे. इतरांना मदत करण्यापेक्षा त्यानं आता स्वत:बद्दल विचार करायला हवा. मराठी असल्याचा रास्त अभिमान त्यानं बाळगलाच पाहिजे. आपल्या सारख्या स्थानिकांची दादागिरी इतरांनी चालवुन घेतलीच पाहिजे. कारण ’अभी नहीं तो कभी नहीं’. हेच या चित्रपटाचं मूळ गांभीर्य आहे.

   

   मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटानं घवघवीत यश मिळवलयं. या चित्रपटानं मराठी माणसाचा स्वाभिमान पुन्हा एकदा जागवण्याचा प्रयत्‍न केला. मराठी माणसाला त्याच्या चुका दाखवण्याचा प्रयत्‍न केला गेला. पण प्रश्न पडतो की, मराठी माणसाला त्याच्या चुका दाखविण्याइतपतच आपण विचार करु शकतो. पुढे काय ?

   नाही. शिवाजी महाराज मराठयांचं आराध्यदैवत. ते नेहमीच आपल्यासाठी स्फ़ुर्तीदायक ठरले आहेत. आणि या चित्रपटातुनही ते प्रत्येकाला स्फ़ुर्ती देतात. मराठी माणुस नेमका कुठे कुठे चुकतो हे दाखवण्यामागे एकच कारण आहे की त्यानं ही चुक एकदा केली आता दुस-यादा करु नये.. त्यानं केलेल्या चुकांमध्ये पहिली चुक म्हणजे त्याचं रडगाणं. तो कोणताही व्यवसाय करायला घाबरतो. आपल्यानं हे कांही झेपणार नाही, म्हणुन तॊ नोकरी धरतो. तिथे वर्षानुवर्षे एक लहानशा पगारावर समाधान मानतो. आणि नोकरीत जर का ट्रान्सफ़र मिळाली तर तो जात नाही. पण व्यवसाय करण्याची मक्‍तेदारी का फक्‍त उत्‍तरभारतीय किंवा हॉटेलवाल्या शेट्टींचीच आहे का ? या चित्रपटात राजे शिवाजीमहाराज येऊन हाच साक्षात्कार करतात की तुम्हाला कोणी रोखलंय ? तुम्हीही होऊ शकता businessman. तेव्हा मराठी माणसा घाबरु नको. शिवाजी महाराज तुझ्या सोबत आहेत. असं सांगण्याचा प्रयत्‍न आम्ही केला आहे.

   या चित्रपटात मराठी माणसाला ’घाटी’ या शब्दानं संबोधण्यात आलं आहे. यावरुन एक वेगळा वाद उभा राहु शकतो ?

   मला नाही वाटतं. कारण इन जनरल मराठी माणसाला घाटी म्हणुनच ओळखलं जातं. जसं शेट्टीजना मद्राशी बोललं जातं. (खरं तर ते कर्नाटकातले) त्यामुळे कोकणी आणि घाटी असा भेदभाव कोणी करु नये.

   

   या चित्रपटात उत्‍तरभारतीय आणि मुस्लिम समाज मराठी माणसाला सपोर्ट करतात असं दाखवण्यात आलंय ही वस्तुस्थिती कितपत आहे?

   खरं आहे, आम्हाला चित्रपटात जास्तं निगेटीव्ह दाखवायचं नव्हतं. ठीक आहे काही काल्पनिक विषयही हाताळले आहेत. पण कदचित ही बाब सुद्धा गर्दी खेचण्यात यशस्वी झाली असावी.

   या चित्रपटासाठी प्रामुख्यानं कोणत्या प्रादेशिक राजकीय पक्षांची मदत मिळाली?

   तसं पाहिले तर मराठी माणसावर आधारित चित्रपट असल्यानं काही पक्षाकडुन मॉरल सपोर्ट मिळाला. या चित्रपटाच्या मुहूर्ताला मुख्यमंत्री अशोक चव्हाण, इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. तर 'फर्स्ट लुक' ला शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सचिन अहिर उपस्थित होते आणि म्युझिक रिलीज राज ठाकरे आणि सचिन अहिर याच्या हस्ते करण्यात आले, त्यामुळे असा कोणताही एक पक्ष नाही. मात्र मराठी माणसांसाठी मराठी नेते सुध्दा एक होतील तर चांगलंच आहे.

   चल उठ मराठ्या. हे असं आणखी कितींदा चित्रपटातुन दाखवण्यात येणार आणि त्यानंतरही मराठी माणुस जागा होईल का, ही काय शाश्वती?

   मला विश्वास आहे की, हा चित्रपट पाहिल्यानंतर मराठी माणसांचे विचार बदलतील. चैत्यभुमीवर एका दिवसासाठी येणा-या बाबासाहेबाच्या अनुयायांबद्दल मराठीच माणुस नाक मुरडतो. पण परप्रांतातुन इतके उत्‍तरभारतीय येत आहेत. त्याना बघुन तो गप्प बसतो. ही शोकांतिका आहे. पण हा चित्रपट बघितल्यानंतर वस्तुस्थिती बदलेल. मराठी माणसाला नोकरीत, शिक्षणात रिजर्वेशन हे मिळालेच पाहिजे. त्यानं महाराष्ट्राचा स्वाभिमान बाळगतांना आपण आयपीएस व्हावं पण अस करताना त्यानं दुस़-या मराठी माणसाला विसरु नये.

   

   मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपट बघुन मराठी माणुस भलताच खुश आहे. कदाचित त्याची मानसिकता अशी असेल की आपल्यावर झालेल्या अन्यायाला चित्ररुपात पाहायला त्याला आवडत असेल. पण यातुन तो कितपत बोध घेईल आणि पुन्हा कुणी उठ मराठ्या असे बोलायला लागु नये म्हणजे मिळवले.