Sign In New user? Start here.

आजच्या सावित्री आणि सत्यवानाची कथा ‘सत्य, सावित्री, सत्यवान’ - सर्वेश परब

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

आजच्या सावित्री आणि सत्यवानाची कथा ‘सत्य, सावित्री, सत्यवान’ - सर्वेश परब

   शामल परब निर्मित आणि सर्वेश परब दिग्दर्शित ‘सत्य, सावित्री, सत्यवान’ हा चित्रपट येत्या २७ जुलैला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सर्वेश परब यांचं या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण होणार असून गेल्या १४ वर्षांचा एडिटींगचा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. या सिनेमाबद्दल त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

   * ‘सत्य, सावित्री, सत्यवान’ या सिनेमाचं कथानक काय आहे ?

   - या सिनेमाला आपण एक पॉलिटीकल मर्डर मिस्ट्री म्हणू शकतो. या चित्रपटात तीन मर्डर घडलेले आहेत आणि या तीन मर्डरवर जे काही पॉलिटीक्स चालतय, याच्यावरती या सिनेमात जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. एका जिल्हा परीषद अध्यक्षाची हत्या झालेली आहे. आणि त्याचा तपास करण्यासाठी सीआयडी इन्स्पेक्टर गावात दाखल होतो. असं हे कथानक आहे. मला वाटतं यापेक्षा जास्त कथानक मी इथे सांगण्यापेक्षा प्रेक्षकांनी त्याची मजा चित्रपट बघतानाच घ्यावी.

   * राजकीय विषयांना घेऊन अनेक चित्रपट आलेत आणि येताहेत, या चित्रपटात काय वेगळं बघायला मिळणार आहे?

   - राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडत असतात. मात्र राजकीय लोकांमध्ये कशी चढाओढ असते. ऎकमेकांचे पाय ते कसे खेचत असतात. किंवा वयक्तीक जीवनात ते कसे असतात. तसेच सत्ता मिळवण्यासाठी केल्या जाणा-या कुरघोडी याचं चित्रण या सिनेमात आम्ही केलं आहे. सोबतच राजकीय विचार शक्तींचा एक वेगळा विचार यातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

   * ‘सत्य, सावित्री, सत्यवान’ या अतिशय वेगळ्या टायटलचं काय गुपीत आहे?

   - याची गंमत अशी आहे की, मुळात सावित्री आणि सत्यवान यांची गोष्ट आपण लहानपणापासून आपल्या पिढीपर्यंत ऎकत आलोय. पण आपल्यानंतरच्या पिढीला हे माहिती नाही. आत्ताच्या पिढीला सावित्रीने घेतलेली मेहनत माहित नाही किंवा त्यांना ती कळणार सुद्धा नाही. आजच्या सावित्रीचं रूप खूप बदलत चाललय. हीच आजच्या सावित्री आणि सत्यवानाची बदलेली कथा एका वेगळ्या ढंगाने या चित्रपटात रेखाटली गेली आहे.

   * चित्रपट दिग्दर्शनाचा पहिलाच अनुभव कसा होता ?

   - खरंतर मी एडीटींग क्षेत्रात गेली १३ ते १४ वर्ष काम करीत आहे. आत्तापर्यंत मी दिग्दर्शनासाठी कुणालाही असिस्ट केलें नाहीये. त्यामुळे या एडीटींगचा मला चांगला फायदा झाला. गेली १४ वर्ष मी एडीटींगमधून जे काही शिकलो. त्या आधुनिक टेक्नॉलॉजीचा फायदा मला या सिनेमात करून घेता आला. ब-याच नवीन गोष्टी मी या सिनेमासाठी ट्राय आऊट केल्या आहेत. दिग्दर्शनाबाबत सांगायचं तर मी, लहानपणापासून रंगभूमीवर कलाकार म्हणून काम करतोय. यानंतर अनेक एकांकिका दिग्दर्शित केल्या आहेत. पण मुळात कॅमेराचं जे तंत्रज्ञान आहे ते एडिटींगमुळे कळलं. याचाच फायदा मला दिग्दर्शन करताना झाला. मी माझ्यापरीने प्रेक्षकांना कथेत गुंतवून ठेवण्य़ाचा सर्व प्रयत्न केला आहे.

   * यातील स्टारकास्टबद्दल काय सांगाल ?

   - सचीत पाटील याची जी भूमिका आहे ती अतिशय वेगळी आहे. त्याच्या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. एका सीआयडी इन्स्पेक्टरची तो भूमिका करतोय. अमृता पत्की जिल्हा परीषद अध्यक्षाच्या पत्नीचा रोल करती आहे. तर श्रॄती मराठे ही जिल्हा परीषद अध्यक्षाच्या अंगरक्षकाच्या पत्नीची भूमिका करते आहे. या तिनही भूमिका अतिशय महत्वाच्या आहेत. तसेच यातील इतरही भूमिका खूप महत्वाच्या आहेत. कारण त्या भूमिका चित्रपटाचा भक्कम खांब आहे. सर्वांनीच अप्रतिम अभिनय केला आहे.

   * प्रेक्षकांनी हा चित्रपट का बघावा ? वैशिष्ट्य काय आहे ?

   - मला वाटतं प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा आणि याच सारखं आपल्या आजूबाजूला घडतंय का? याचा विचार करावा. त्यातून तुम्ही बोध घ्या. किंवा काय करायचं ते तुम्ही ठरवा. कारण अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांपर्यंत पोहचत नाहीत. त्याच यातून मांडल्या आहेत.