Sign In New user? Start here.

Satish Rajwade

 

सिनेमाच सतिशचा 'फर्स्ट प्रेफरन्स'

 
 
 

'अग्निहोत्र', 'असंभव' सारख्या छोटा पडदा हादरविणाऱ्या टीव्ही सिरियल्स असोत किंवा 'गैर' सारखा वेगळ्या वाटेवरचा चित्रपट असो....सतिश राजवाडे हे नाव सगळीकडं कॉमन झालंय...! मराठीतल्या आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये सतिश पाहता पाहता पोहोचला. स्थिरावला. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातला सतिश टीव्ही आणि मुव्हीज् या दोन्ही प्रकारांमध्ये चमक दाखवतोय. त्याचं यश भल्या-भल्यांना अचंबित करणारं. ‘मृगजळ’सारखा त्याचा पहिलाच प्रयत्न समिक्षकांनी गौरवला आणि सतिश यशाच्या पायऱया चढू लागला.

Zagmag च्या टीमने नुकताच त्याच्याशी संवाद साधला आणि या तरूण दिग्दर्शकांने अनेक विषयांवर आपले मत ठामपणाने मांडले. या मुलाखतीचा सारांश -

प्रश्न - टीव्ही सिरियल्स आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमांमध्ये काम करतोस तू. काय फरक वाटतो दोन्ही कामांमध्ये?

उत्तर - काम करताना तसा फारसा फरक जाणवत नाही. मी या दोन्हींमध्ये कधी भेदभाव केलेला नाही. अमुक एक गोष्ट म्हणजे टीव्हीची आणि तमूक एक म्हणजे मुव्हीज्ची असं कधी केलेलं नाही. जितका impact मुव्हीमध्ये मिळतो, तितकाच टीव्हीमध्येही मिळवता येतो, यावर माझा विश्वास आहे. मुळात, मी टीव्हीला कधी गृहित धरून काम करत नाही. कारण, टीव्ही तसा जास्त चॅलेंजिंग असतो.

प्रश्न – कोणतं माध्यम जास्त चॅलेंजिग वाटतं?

Audience has remote control in its hand & my job is की त्यांना वीस मिनिटे रिमोट कंट्रोलचा विसर पडला पाहिजे. हे जास्त चॅलेंजिंग आहे. मुव्हीसाठी तुम्ही एकदा थिएटरमध्ये आला, की तुमच्या हाती फारसं काही राहात नाही. नाही आवडला सिनेमा तर बाहेर पडणं, इतकंच शक्य असतं.

प्रश्न - दोन्ही माध्यमांमध्ये कोणाला जास्त पसंती देशील?

उत्तर - Of course movie. Cinema is forever. It has a great shelf-value. टीव्हीमध्ये तुम्ही फक्त वीस मिनिटे असता. It’s like if you have thousands of ornaments & one diamond...! Cinema is a diamond.

प्रश्न - टीआरपी-जीआरपी आणि बॉक्स् ऑफिस या गोष्टींवर ताबा ठेवणं दिग्दर्शक म्हणून किती हातात असतं तुमच्या?

उत्तर - आता तसं काही राहिलेलं नाही. म्हणजे टीआरपी कमी होतोय म्हणून सिरियल्स्मध्ये बदल करण्याचे दिवस राहिलेले नाही. एकतर तुम्ही दर्जेदार सिरियल काढा. दर्जेदार चित्रपट काढा. किंवा सोडून द्या. लोकांना सातत्याने तुमची गोष्ट आवडेलच, असं खात्रीनं नाही सांगता येत. What I do is I do my best. मी इतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, फक्त माझ्या कामाचा आणि त्यात सर्वोत्कृष्ट देण्याचा विचार करतो. एखादी फिल्म् पडायची असेल, तर ती पडतेच. बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन होतेय, हे काही तुमच्या हातात नसते. माझ्या नशीबानं whatever I am doing is wildely appreciated.

प्रश्न - तुझा पहिल्या चित्रपटाचा अनुभव कसा होता?

उत्तर - २००० मध्ये मी या क्षेत्रात पदार्पण केलं. पहिला चित्रपट होता 'मृगजळ'. व्यावसायिक दृष्ट्या पडला. पण, या चित्रपटानं २३ पुरस्कार मिळवून दिले. समीक्षकांच्या पसंतीला हा चित्रपट उतरला. फारच वाईट ! कुणी विश्वासच ठेवायला तयार नव्हते माझ्यावर. मी लोकांकडे फेऱ्या मारत होतो. लोकं निराश करत होते...! पुढं या फिल्मला खूपसारी पारितोषिके मिळाली.

प्रश्न - टीव्ही आणि चित्रपटांत एकाचवेळी काम करताना काय अनुभव असतो?

उत्तर - टीव्ही आणि चित्रपटाचं एकच मीडियम आहे. कॅमेरा. दोन्हीकडं फक्त सॉफ्टवेअर बदलतं. सिरियलमध्ये रिवाईंडचं बटन असतं. शुटिंग करताना रिवाईंड करून मागचे शॉटस् पाहून नको ते कट करता येतं. चित्रपटाच्या शुटिंगला रिवाईंड नसते. फक्त कट असतो. खूप काळजी घ्यावी लागते. टीव्ही सिरियलमध्ये मार्जिनल एरर असतो. चित्रपटात तो नाही चालत. हे भान कलाकारांनाही असतं. त्यामुळं उदय टिकेकर, मुक्ता, विद्याधर जोशी, इला भाटे, मोहन जोशी, सागर तळाशीकर असे कलाकार माझ्यासोबत चित्रपट आणि टीव्ही सिरियलमध्येही एकत्र असतात...

प्रश्न - टीव्ही सिरियल्स आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून कथेकडे कसे पाहतोस?

उत्तर - सिरियल्समध्ये स्टोरीचा ग्राफ ठरलेला असतो. दीडशे-दोनशे भागांच्या सिरियल्ससाठीचा हा ग्राफ असतो. पुढे चॅनेलला सिरियल वाढवायची असेल, तर गोष्ट वेगळी. अर्थातच, ती सेन्सिबली केली, तरच सिरियल टिकते. सिनेमात अडिच तासांत सगळ्यांच्या गोष्टी सांगायच्या असतात. टीव्हीसारख्या प्रत्येकाच्या गोष्टी भरपूर वेळ सांगण्याइतकं स्वातंत्र्य त्यात नसतं. I will say TV Serial is a long vacation & Movie is a short trip. In Long vacation you can take freedom of locations & destinations whereas in Short Trip everything is fixed & you can’t change destinations...चित्रपटात पसारा वाढवून नाही चालत.

प्रश्न - तुझे आवडते दिग्दर्शक कोण आणि कोणाबरोबर काम करण्याचं तुझं स्वप्न आहे?

उत्तर - मुकुल आनंद मला दिग्दर्शक म्हणून आवडतात. पण, मनमोहन देसाई हे या खेळाचे राजा होते. His lost & found formula always worked ! My biggest ambition is to work with Amitabh Bachchan it's a dream and I am sure God will take care...आजही 'शोले' हाच माझा आवडता चित्रपट आहे...!