Sign In New user? Start here.

‘पारो’ला मी जगले - सोनाली कुलकर्णी

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

‘सत ना गत’मधील नामीच्या आव्हानात्मक भूमिकेत पाखी हेगडे.

   महाराष्ट्राची अप्सरा म्हणून परिचीत असलेल्या सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीने अवघ्या महाराष्ट्राला तिच्या नृत्याविष्काराने भारावून सोडलं आहे. वेगवेगळ्या भूमिका करत तिने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. ‘नटरंग’ या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यावरील धमाल नृत्याने तर ती रातोरात स्टार अभिनेत्री झाली. नटरंगतील तिच्या धमाकेदार भूमिकेनंतर सोनाली आता एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. नितीन चंद्रकांत देसाई निर्मित आणि दिग्दर्शित ‘अजिंठा’ या सिनेमात ती पारोच्या रूपात तुम्हाला पहायला मिळणार आहे. येत्या ११ मे ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाविषयी आणि तिच्या भूमिकेविषयी सोनालीने झगमग डॉट नेटशी केलेली खास बातचीत....

   * ‘अजिंठा’ तील तुझ्या भूमिकेबद्दल सांग?

   - ‘अजिंठा’मध्ये मी ‘पारो’ नावाची भूमिका करते आहे. माझ्यासाठी पारो भूमिकेपेक्षा जास्त आहे. कारण, पारो हे ना.धो. महानोर यांचं स्वप्न आहे. त्यामुळे ती एक व्यक्तीरेखा राहत नसून त्यापलिकडे जाते. त्या व्यक्तीरेखेशी एक इमोशनल कनेक्शन आहे आणि महानोरांनी त्यावर इतकी वर्ष रिसर्च केलं आहे. पारो विषयी बोलतांना ते नेहमीच भारावून जातात. पहिल्यांदा जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा तिच्याविषयीची करूणा त्यांच्या डोळ्यात दिसत होती. तिला न मिळालेला न्याय दिसत होता. या चित्रपटाच्या माध्यमातून तिला न्याय मिळेल, अशी त्यांची एक भावना आहे. कुणाचं तरी स्वप्न साकारलं जाणार आहे, या पातळीवर जाऊन मी यात काम केलंय. शूटींगच्या संपुर्ण दिवसात मी पारोला जगले आहे. ‘अजिंठा’ नसता तर रॉबर्ट आला नसता. तो नसता आला, तर त्याला पारो नसती भेटली. त्या चित्रांमध्ये आपण बघीतलं, तर भारतीय स्त्री नेहमी सावळी दाखवली गेली आहे.

   * * ही भूमिका साकारण्यासाठी वेगळा काही अभ्यास करावा लागला का? ?

   - खरंतर सगळ्याच पद्धतीने मला अभ्यास करावा लागला. स्वत:ला तसं घडवावं लागलं. पारो तशी महानोरांच्या काव्यामुळे आपणा सर्वांना माहिती झाली. पण नेमकी पारो काय होती? कशी दिसायची? हे कुणालाच माहिती नाहीये. तिची एक समाधी आहे एवढंच सर्वांना माहिती आहे. त्या समाधीवरून या सत्य घटनेची पाळं-मुळं शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण खरं काय ते कुणाला कळलंच नाही. पण असं होतं ना की, जुने लोक सांगतात, मग त्यांच्याकडून आपल्याला बरंच काही कळतं. तसंच महानोरांनी गावोगावी जाऊन माहिती मिळवली. पण तिचे फोटो नव्हते, ती कशी होती याचे पुरावे नव्हते. अपु-या माहितीमुळे मला या भूमिकेसाठी बरेच एक्सपरीमेंट करावे लागले. ना.धो.महानोरांच्या डोळ्यातील पारो मला समजावी, यासाठी दिग्दर्शकांना माझ्यावर खुप प्रयोग करावे लागलेत.

Sonalee Kulkarni interview

   * यात तुझं मेकअप आणि कॉस्च्युम अतिशय वेगळं आहे, त्याबद्द्ल सांग.

   - अठराशे च्या काळातील पारो नेमकी कशी होती हे कुणाला माहिती नसल्याने आणि तसा काही पुरावा नसल्याने ठरलं असं की, जर आपल्याला सर्व काल्पनिकच दाखवायचं आहे. तर मग काल्पनिकच कॅरेक्टर उभं करूया. मग त्यानुसार असं ठरलं की, तिचा वर्ण सावळा दाखवूया. त्याचं कारण हे की, संपूर्ण जगभरात भारतीय स्त्रीची प्रतिमा ही शक्यतो सावळीच प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिचं रूप हे सावळं आहे. दुसरं कारण म्हणजे ती लोकं फिरत्या जमातीची होती. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी उन्हात त्यांना फिरावं लागायचं. डोंगर द-यात आणि उन्हात फिरल्याने रंग कसा असू शकतो याचा विचार करून हे एक लॉजीक वापरलं. हे कारण मला सर्वात महत्वाचं होतं. की, हा सिनेमा अजिंठाच्या चित्रांवर आधारीत आहे.तर त्या चित्रात आणि पारोत साम्य असायला हवं. त्यामुळे त्या चित्रांसारखा तिचा गेटअप ठेवावा असा सर्वांचा विचार झाला. या चित्रपटातील कॉस्च्युम सुद्धा या चित्रातील कपड्यांसारखेच तयार करण्यात आले आहेत. निता लुल्ला यांनी कॉस्च्युमसाठी खुप मेहनत घेतली आहे. आमच्याकडे दुसरा कुठलाही पुरावा नसल्याने कॉस्च्युमसाठी सुद्धा लेण्यांतील चित्रांचा आधार घेतला गेला. निदान त्या काळातील लूक अ‍ॅन्ड फिल देण्यासाठी...

   * या चित्रपटातील भाषा कशी आहे? तुला वेगळी भाषा शिकावी लागली का?

   - खरंतर ‘अजिंठा’ हे गाव मराठवाड्यात येतं. मुळात या सिनेमात महाराष्ट्रातील साधी-सोपी भाषा ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही विशिष्ट भागाची भाषा यात घेण्यात आली नाहीये. कारण आधीच यात तीन भाषा आहे. एक ब्रिटीश, दुसरी हिंदी आणि तिसरे म्हणजे मराठी भाषा आहे. एवढ्या भाषा असल्याने कॉम्प्लिकेटेड मराठी भाषा यात जोडण्याचा प्रयत्न केला नाही. दुसरं कारण म्हणजे आपल्याकडे कुठलाच ठोस पुरावा नसल्यामुळे कुठल्याही विशिष्ट गोष्टीला दाखवण्यापेक्षा आम्ही साधी मराठी वापरली आहे. पारो ही एक महाराष्ट्रीयन मुलगी आहे, हेच आम्हाला यातून दाखवायचं आहे. महानोरांचं जे काव्य आहे, कवितेचीच साधी भाषा आम्ही यात घेतली आहे. कारण, जसं चित्रपटाच्या जाहीरातीत आम्ही म्हणतोय की, ‘प्रेमाला कुठलिही भाषा नसते’. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रॉबर्ट आणि पारोच्या प्रेमाविषयी हे सर्व आहे. दोघांनाही एकमेकांची भाषा कळत नाही. तो इंग्रजीत बोलतो, ती मराठीत बोलते. अशावेळी त्यांना प्रेम होणं आणि ते त्यांना समजणं हे जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे सिनेमाला एक सोपी भाषा ठेवली आहे.

   * या चित्रपटातील नॄत्याबद्दल काही सांग.

   - या चित्रपटाचा काळ हा अठराशेचा दाखवण्यात आला आहे. त्यात रानोरान फिरणा-या लोकांचं जीवन त्यांची संस्कॄती कशी असेल याचा विचार करून, अभ्यास करून यात त्यांचं जीवन दाखवण्यात आलं आहे. प्रत्येक लोकांची एक वेगळी संस्कृती असते. आणि प्रत्येक संस्कृतीचा संगीत आणि नृत्य हा महत्वाचा भाग असतो. त्यामुळे यात अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे डान्स दाखवण्यात आले आहेत. मुळात ही एक एक प्रेमकहाणी असल्याने पारोचे काही नाजूक डान्स आणि एक रांगडा डान्स फॉर्म सुद्धा आहे. मोठ मोठे ढोल घेऊन नाचण्याची जी पद्धत आहे, ती सुद्धा यात दाखवण्यात आली आहे. होळीचा वेगळा डान्स आहे. यात जे डान्स मी केलेत ते आत्तापर्यंत कधीच केले नव्हते. त्यामुळे माझ्या वेगळ्या लूक सोबतच एक वेगळा डान्स फॉर्म सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Sonalee kulkarni interview

  

  * नितीन चंद्रकांत देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचा अनुभव कसा होता?

   - खरंतर आधी खुप भिती वाटली होती. कारण ते खुप मोठे आहेत. त्यांचं काम खुप मोठं आहे. सुरवातीला वाटलं होतं की, मला त्यांच्याशी संवाद साधणं जरा कठीण जाईल. ब-याचदा असं असतं की, काही दिग्दर्शकांसमोर तुम्ही नाही बोलू शकत. कारण त्यांची मतं आधीच ठरलेली असतात. पण नितीनजींबद्दल सांगायचं झाल्यास, ते कलाकारांना खुप सहकार्य करतात. म्हणजे मला माझं स्वत:चं मत होतं या सिनेमात. जे मला महत्वाचं वाटतं. कारण, कलाकार म्हणून जेव्हा काम करण्यात तुमचा वाटा असतो, तेव्हा तुमच्या विचारांनाही महत्व असणं आवश्यक असतं. तेव्हाच तुमचं काम जास्त चांगलं आणि सोपं होऊ शकतं. त्यांनी नेहमीच मला स्पेस दिली की, असं माझं मत आहे, तुझं काय मत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता.

  

Sonalee kulkarni interview

* यात तू एका पाश्चात्य अभिनेत्याबरोबर काम केलं आहे, कसं वाटलं त्यांच्याबरोबर काम करून?

   - खरंतर खुप मजा आली. कारण रॉबर्टचं(फिलिप स्कॉट वॅलेस) कॅरेक्टर खुप महत्वाचं आहे. आजपर्यंत आपण रोमियो-ज्युलिएट, हिर-रांझा, लैला-मजनू यांच्या लव्ह स्टोरीज ऎकल्या. तशीच ही पण एक लव्ह स्टोरी आहे. पण ती लोकांसमोर जास्त आली नाही. त्यामुळे रॉबर्टचं पात्रही तेवढंच महत्वाचं होतं (फिलिप स्कॉट वॅलेस). तसंच त्याच्याबरोबरची केमिस्ट्री जुळनं खुप महत्वाचं होतं. मी जरी इंग्लीश मिडीयम मध्ये होते, तरी मला ते विसरायचं होतं की, मला इंग्रजी कळतं. कारण पारोला इंग्रजी समजत नाही. आमच्यासाठी ते एक चॅलेन्ज होतं. सेटवर आम्ही फार बोलायचो नाही...आम्ही असं ठरवलं होतं की, मला इंग्लिश ऎकूच येत नाही. जे आपल्याला येतं, पण येत नाही असं स्वत:ला कन्व्हेन्स करणं थोडं कठीण असतं. मात्र, पारोसाठी मला ते करावं लागलं. जसजशी त्यांची प्रेमकहाणी फुलत जाते, तसे आम्ही रिअल लाईफमध्ये हळूहळू बोलायला लागलो. फिलिपने थिएटर केलं आहे. त्यामुळे सर्व अभ्यास करून अभिनय करणं त्याला चांगलं जमतं. जेवढा अभ्यास मला नव्हता या स्टोरीबद्दल आणि अजिंठाबद्द्ल तेवढा त्याचा अभ्यास झालेला होता. खुप रिसर्च केलं होतं त्याने...मी इथलीच असून माझा अभ्यास कमी असण्याचं कधी कधी मला खुप वाईट वाटायचं. पण आम्ही या पात्रांशी एकरूप होऊन काम चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि लोकांना ते नक्कीच आवडेल.

   * पारोच्या भूमिकेला पुरेपुर न्याय देण्यासाठी तुला फिटनेसकडेही लक्ष द्यावे लागलं असेल..?

   - हो अगदी....! पन्नास दिवसांचं शूटींग होतं. त्याच्या आधी मी जिम जॉईन केलं होतं. मी डाएट करत होते,कारण माझी यातील भूमिका रानावनात फिरणा-या एका रांगड्या मुलीची दाखवली आहे. माझी शरीयष्टी कशी असायला हवी, त्या अनुशंगाने मी तयारी केली होती. माझ्या आधीच्या चित्रपटांमद्ये कधीच न केलेल्या गोष्टी या सिनेमात मला करायला लागल्या. जसे स्टंट्स करणे, चप्पल न घालता फिरणे, झाडांवर चढणे, रांगडा डान्स करणे आदी गोष्टी कराव्या लागल्या. अर्थातच पारोच्या या रांगड्या लूकसाठी मला फिटनेस खुप महत्वाचं होतं.

  

Sonalee kulkarni interview

  * सेटवर काय काय धमाल केली?

   - खरंतर आम्हाला धमाल करायला वेळंच मिळत नव्हता. १८ तास आम्ही काम करायचो. त्यातून जेवढा वेळ मिळायचा, तो थोडाफार आराम करण्यात जायचा. पण आम्ही शूटींग संपल्यानंतर त्या गावात एक मस्त जंगी पार्टी केली. सर्वांनी खुप एन्जॉय केली ती पार्टी. मोस्टली तिथे आम्ही त्या कॅरेक्टरच्याच वातावरणात रहायचो. त्यामुळे वेगळी काही धमाल करताच आली नाही. मी पहिल्यांदा सतत ५० दिवस काम केलं आहे. बाहेरचा एकही स्टेज शो मी या दिवसात केला नाही. मी कधी घरीही गेली नाही. सिनेमाच्या कथानकाच्या मुड मधून आम्ही दूर जाऊ नये यासाठी संपूर्ण टीमने खुप प्रयत्न केलेत. एक अतिशय वेगळा आणि भावस्पर्शी असा हा सिनेमा तयार झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच हा सिनेमा आवडेल याची खात्री मला आहे.

   - अमित इंगोले