Sign In New user? Start here.

नशीब घडविण्यासाठी पहात रहा साम टिव्ही! -सुनिल बर्वे

नशीब घडविण्यासाठी पहात रहा साम टिव्ही! -सुनिल बर्वे

 
 
 

मराठीचा चॉकलेट हिरो म्हणून पटकन डोळ्यासमोर एकच नाव येते आणि ते म्हणजे सुनिल बर्वे. भूमिका कुठलही असो सुनिल त्यात चपकळ बसतो. कसलेला अभिनेता सुनिलने गेल्यावर्षी सोडलेल्या संकल्पाद्वारे रंगभूमिवरील गाजलेल्या जुण्या नाटकांचे केवळ 25 प्रयोगांद्वारे पुनरज्जीवन करुन गाजलेल्या कलाकृतींचा पुन्हाप्रतय नव्या जुन्या पिढीला करुन दिला आहे. साम टिव्हीवरील नव्या को-या नशिब नवाचे द्वारे आता पुन्हा एकदा सुनिल बर्वे टेलिव्हिजन गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा शो 28 जून पासून गुरूवार ते शनिवार रात्री 9 वाजता सुरू होत आहे. या नव्या रिऍलिटी गेम शोमध्ये सुनिल प्रथमच सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या नव्या प्रवासाविषयी केलेली ही बातचित..

• चित्रपट, मालिका आणि नाटकांकडून टेलिव्हिजन शोज का वळलासं वाटलं?

नेहमीच्या कामापेक्षा मला नविन काहीतरी करायचं होतं. याच दरम्यान दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि साम टीव्हीने नशीब नवाचे या रिऍलिटी शो ची ऑफर दिली. या शोचा फॉरमेट मला खूप आवडल्याने मी ही ऑफर लागलीच स्वीकारली. आणि ऑफर स्वीकारून मी फारच खूश आहे.

Sunil Barve Interview

नशीब नवाचे या शोविषयी काय सांगाल?

नशीब नवाचे हा एक कौटुंबिक गेम शो आहे. या शोमध्ये निवडलेल्या कुटुंबाला सहभागी होता येईल. आणि या कुटुंबाची निवड आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिह्यातून केलेली असते. सामान्य ज्ञानाविषयी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्यायची आहेत. साप-शिडीतल्या ८१ घरांपर्यंत पल्ला गाठायचा असतो. यामध्ये यश - अपयशालाही सामोरं जावं लागतं. तसेच पुढे-पुढे हा खेळ अधिक रंजक होत जातो. ह्या शोची संपूर्ण संकल्पना ही डॉ. श्री. बालाजी तांबे यांची आहे. मराठी टेलिव्हिजनचा नशीब नवाचे हा बिग बजेट गेम शो आहे. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या शीर्षक गीताला शशांक पोवार यांनी संगीत दिले असून हे शीर्षकगीत स्वप्निल बांदोडकर यांनी गायलं आहे. या शोचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे या शोसाठी उभारलेला भव्य दिव्य असा शानदार सेट. इतर रियालिटी शो पेक्षा हा सेट नक्कीच वेगळा आहे आणि त्यासाठी भरपूर संशोधन करावे लागले होते.

या शोच्या नावातच नशीब घडण्याचा उल्लेख दिसतो, काय काय बक्षिसे असणार आहेत?

या शोमध्ये गुरुवार आणि शुक्रवारच्या भागांमध्ये चांगला खेळ खेळून शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सर्वात जास्त गुण मिळविणाऱया कुटुंबाला एक फॅमिली कार दिली जाईल. आणि त्याहून सोन्याहून पिवळं म्हणजे इथे आम्ही स्पर्धकांना अपेक्षा वाढवायला सांगतोय. अंतिम फेरीत 81 घरे चालून जाणाऱया अंतिम स्पर्धक महाविजेत्याला तब्बल सव्वा किलो सोने जिंकता येणार आहे.

Sunil Barve Interview

या शोच्या निर्मात्यांविषयी काय सांगशील?

- या आगळ्या वेगळ्या शोची निर्मिती केली आहे सुप्रसिध्द अभिनेते रमेश देव यांच्या रमेश देव प्रॉडक्शने. ही संस्था गेली अनेक वर्षे जाहिरात निर्मितीसोबतच वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांची निर्मिती करण्यात अग्रेसर आहे. तसेच या शोच्या निर्मिती अगोदर अनेक रिऍलिटी शोजची निर्मिती केली असल्याने त्यांचा याप्रकारातला अनुभव दांडगा आहे आणि त्यामुळेच काम करायला अधिक मजा येतेय. हा शो यशस्वी करण्यासाठी स्वत: अभिनेता अजिंक्य देव, त्याच्या निष्णात टिमसोबत भक्कमपणे उभा असतो. तो सेटवर असल्याने सर्वांचा हुरुप वाढत राहतो, माझ्या मते अजिंक्य हा या गेम शोची खरी ताकद असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

• टेलिव्हिजन मध्ये तुला कोणत्या सेलिब्रिटींची अँकरिंग प्रभावी वाटते?

टेलिव्हिजनमध्ये काम करत असताना मला सिध्दार्थ बासू आणि सिध्दार्थ काक यांच्याकडून प्रेरणा मिळतेच शिवाय स्टार सुत्रसंचालनामध्ये शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन तर मोठ्यापडद्यासोबतच छोट्या पडद्यावरही शहेनशाह आहेत.

Sunil Barve Interview

हर्बेरियमचे प्रयोग पुन्हा सुरू होणार का?

होय नक्कीच! अगदी पहिल्या प्रयोगापासून प्रेक्षकांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला. या प्रतिसादामुळे आम्ही हमिदाबाईची कोठी, आणि सुर्याची पिल्ले या नाटकांचे केवळ 25 प्रयोग सादर केले होते. त्याप्रमाणेच या पुढेही सुरु राहील. सध्या मी झोपी गेलेला जागा झालाचे प्रयोग करतोय आणि ह्याही नाटकाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय.

Sunil Barve Interview

या पुढे तूझी वाटचाल कशी असणार आहे.?

प्रेक्षकांचे कायम मनोरंजन करणे हे कलाकारच कर्तव्यच आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी पुढेही मी चित्रपट, नाटक आणि टी.व्ही मालिका आणि शोजमध्ये वेगवेगळे काम करण्यालाच प्रायोरिटी देणार आणि मायबाप प्रेक्षकांचे मनोरंजन करतच राहणार आहे.

आगामी कोणते कोणते प्रोजेक्ट करणार आहेस?

आता सुत्रसंचालकाची सगळी जबाबदारी घेतल्यामुळे एक परिपूर्ण कलाकार होण्याची जाणीव मला होतेय. सामच्या या नशीब नावाचे गेम शो बरोबरच दोन आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होतील. तसेच काही नाटकंही असतील तसेच मालिकाही.

- झगमग टीम