Sign In New user? Start here.

 

Interview of vaibhav tatvavadiपेईंग घोस्ट मधील माधव हा लाजरा बुजरा : उमेश कामत

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

पेईंग घोस्ट मधील माधव हा लाजरा बुजरा : उमेश कामत

उमेश कामत हा मराठी इंडस्ट्रीमध्ये चॉकलेट बॉय म्हणून ऒळखला जातो. त्याचा पेईंग घोस्ट हा चित्रपट रिलीज होत आहे. या चॉकलेट बॉयशी केलेल्या खास गप्पा झगमग वाचकांसाठी

१. तुझी पेईंग घोस्ट आणि बाळकडू मधील भूमिका सारखी आहे का?

नाही अजिबात नाही, म्हणतातना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती प्रत्येक माणसात वेगळेपण असत. त्यामुळे मी आधी गोष्ट ऎकतो जेव्हा ती मला आवडते तेव्हाच मी करायचे ठरवतॊ. बाळकडू मधील गोष्ट वेगळी होती.त्यातला नायक अ‍ॅग्रेसिव्ह अन्याया विरूध्द आवाज उठवणारा होता तो. पण पेईंग घोस्ट मधील माधव हा नक्कीच लाजरा बुजरा आहे. पण याच्यात होणारे बदल वेगळे आहे.त्यामुळे कॅरेक्टर नक्कीच वेगळ आहे.खूपदा त्या कॅरेक्टर मध्ये आपण बसतो की नाही किंवा ते आपल्याला सूट होत की नाही याची थोडी काळजी असते. पण सुश्रृत म्हणाला की हे कॅरेक्टर लिहीताना तूच आमच्या डोळ्यासमोर होता त्यामुळे ते मला आणखी सोप गेलं.

२. तुझी आणि स्पृहाच्या केमीस्ट्री बद्दल काय सांगशील

स्पृहा सोबत मी या आधी एका लग्नाची तिसरी गोष्ट मध्ये काम केलंय. त्यामुळॆ आम्ही एकमेकांना खूप चांगले ऒळखतो ..मुळात मालिका फक्त आठ महिन्यांची होती म्हणूनच मी ती करायला घेतली. पण जेव्हा ही मालिका संपायला आली तेव्हा असं वाटल की ही मालिका थांबू नये. लकीली मालिका संपताच दुस-या दिवशीच सुश्रृत ने चित्रपटासाठी विचारल आणि मी लगेच हो म्हणालो.जे मला वाटत होतं काम थांबू नये ते असच सुरू रहाव आणि नेमक तसच झालं. आमच्या दोघांची केमिस्ट्री छोट्या पडद्यावर प्रेक्षकांनी पाहिली आहे. खूप वेळा मी म्हणतो की जे छोट्या पडद्यावर नाही करायला मिळाल ते मी मोठ्या पडद्यावर करतो. यापूर्वी मला अस रोमॅटींक गाणं पडद्यावर करायला मिळाल नव्हत ते या चित्रपटात केलं आहे. कर्म्फट झोन जेव्हा तुमचा सहकलाकारां बरोबर असतो तेव्हा ते काम आणखी सोप्या पध्दतीने होतं.

३. पडद्यावर प्रेक्षकांना रातभर हे गाणं एवढं रोमॅटींक दिसत त्यामगची खरी स्टॊरी काय आहे?

अरे बापरे..! चित्रपट रिलीज व्हायचा आधीजर मी सगळे पत्ते ऒपन केले तर त्याची एवढी मजा येणार नाही. तुम्हां प्रेक्षकांना हे गाणं खूप रोमॅटींक वाटतय म्हणजे नक्कीच आमचे प्रयत्न सफल झाले आहेत. पण कॅमेरावर तो इफेक्ट दिसण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात. जसे की रातभर या गाण्यांत स्पृहाचा पदर काही केल्या नीट उडत नव्हता आणि सश्रृतला तो पदर सरळ उडताना हवा होता त्यासाठी आमचे खूप रिटेक झाले. त्याचबरोबर यांच गाण्यात शेवटी आम्ही दोघे बेडवर असतो असा सिन आहे पण घामाच्या धारा आजूबाजूला आमची ५० लोंकाची टीम यामध्ये आम्ही हा शॉट दिला. पण मला वाटत हेच आम्हा कलाकारांच काम आहे . टेक्निकली आम्ही सगळ्या गोष्टी करत असलो तरी ते लोंकाना रियल वाटल पाहिजे.

४.सध्या तू तेजस नरूळेकर सोबत फूट शूट केलं तर त्यामगच रिझन काय आहे?

खरतर मला चॉकलेट बॉय म्हणून ऒळखल जातं.मी चांगला दिसतोच प्रेक्षकांना आवडतो. पण माझ्या चाहत्यांना वेगळ काही तरी देता यावं किंवा मी या लूक मधे ही वेगळा किंवा चांगला दिसू शकतो यासाठी हे फोटोशूट होत. हा मी स्वत:साठी केलेला प्रयोग होता. तो माझा फोटो पाहून माझा वेगळ्या रोल साठी लोक विचार करू लागलेत. आणि मला वाटतं कलाकारांने असे वेगवेगळे प्रयोग करत रहावे.

५. सध्या कोणत्या प्रोजेक्टवर काम करतोयस?

पेईंग घोस्ट तर रिलीज होतयंच. त्याचबरोबर मुंबई टाइम नावाचा चित्रपट येतोय त्यात मी गॅगस्टरची भूमिका करतोय.त्याच बरोबर जी आर नावाचा चित्रपट येतोय शिवाजी लोटन पाटील याचे दिग्दर्शक आहेत.त्याचं शुटींग चालू आहे.

६. प्रिया सोबत प्रेक्षकांना तुला कधी पाहता येईल

मला ही नक्की आवडेल प्रिया सोबत काम करायला, किबंहुना आम्ही दोघे वाट पाहतोय की आम्ही दोघे परत एकत्र कधी काम करणार ते. प्रेक्षकांना आमची जोडी पडद्यावर ही पहायला आवड्ते यातंच आमच्या दोघांच यश आहे.

-गायत्री तेली