Sign In New user? Start here.

मी काहीसा निशाद सारखाच आहे

 

Interview of vaibhav tatvavadiवैभव तत्ववादी: मी काहीसा निशाद सारखाच आहे

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

वैभव तत्ववादी: मी काहीसा निशाद सारखाच आहे

"कॉफी आणि बरचं काही" या चित्रपटात मी निशादच कॅरेक्टर करत आहे. हा फार कमी कम्युनीकेट करतो. त्यामुळे ब-यांचदा त्याच्या मनातल्या गोष्टी मनातच राहून जातात. आयुष्य खूप छोट आहे त्यामुळे तुम्हांला दुस-या बद्दल काय वाटत हे मनात न ठेवता आपल्या भावना एक्सप्रेस करायला शिकवणार हे कॅरेक्टर आहे. आणि मी पण काहीसा निशाद सारखाच आहे कारण मी पण माझ्या भावना लवकर एक्सप्रेस नाही करत. असंच काहीस म्हणन आहे अभिनेता वैभव तत्ववादी यांच. वैभव तत्ववादी सोबत आमची प्रतिनीधी गायत्री तेली हीने मारलेल्या खास गप्पा.

१.अभिनयाला सुरवात कशी झाली?

मी मुळचा नागपूरचा आहे. माझे वडील इंजिनीअरींग कॉलेज मध्ये प्राध्यापक आहेत आणि आई गृहिणी आहे. नागपूर मध्ये असतानाच मी शाळेत किंवा जिथे संधी मिळेल तिथे नाटकांमध्ये सहभाग घेत असे त्यामुळे अभिनयांची आवड मला लहाणपनापासूनच आहे. त्यांचबरोबर मी शाळेत पण चांगला असल्यामुळे चांगले मार्क्स पडायचे. त्यामुळे इंजिनीअरींगला अ‍ॅडमिशन घेतली आणि कॉलेजच्या एकांकिका मध्ये सहभाग घेतला आणि तिथून मग मी मागे वळून पाहिल नाही.

२. तुला असं वाटत नाही का इंजिनीअरींग केलं नसत तरी चालंल असतं?

मला अस नाही वाटत कारण उच्च शिक्षणामुळे तुमच्या विचारात प्रग्लभता येते. तुमची विचार करण्याची पध्दत किंवा दृष्टीकोन बदलतो त्यामुळे इंजिनीअरींग मी केलं यात मला आनंदच आहे. आणि कॉलेजची त्या ४ वर्षामध्ये मी खूप काही शिकलो आहे आणि त्यांचा फायदा मला आताही होतो.

३. तू सिनेमा आणि मालिंकामध्ये काम केलं आहेस दोन्ही माध्यमांबद्दल काय सांगशिल?

दोन्ही माध्यंम वेगळी आहेत. मला वाटतं दोन्हींच टेमंपरामेंट वेगळ असतं कन्सेप्ट, दोन्ही गोष्टी पडद्यावर आणण्यासाठी लागणारा वेळं य गोष्टीमंध्ये फरक पडतो. मालिका करायची म्हंटल्यास त्यासाठी वेळॆच बंधण येतं त्यामुळे कमी वेळात कधी कधी जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. मी आता पर्यंत मांजेकरांची मालिका तुझं आणि माझ जमेना, अमर प्रेम,डिस्कव्हर महाराष्ट्रा अशा मालिकांमध्ये काम केल आहे. चित्रपटाला वेळॆचं बंधण नसतं त्यामुळे तिथे काम करताना थोडं रिलॅक्स असतं सध्या मी "कॉफी आणि बरंच काही" या चित्रपटात काम करतोय.त्याचबरोबर मी रंगभूमीवर मांजेरकरांच ऑल द बेस्ट हे नाटक केलं आहे. मुळात मला अभिनय आवडत असल्यामुळे सर्वच माध्यमं आवडतात.

४.मुंबई आवडत की पुणे?

ज्या शहरातून तुम्ही ग्रॅज्युएशन करता ते तुंम्हाला नेहमीच आवडंत. मुंबईची लाईफ ही खूप फास्ट आणि डायनॅमिक आहे. नेहमी इथे धावपळ असते फॅमेली लाईफ इथे फार कमी भेटते. पुण्यात कस सुट्टीच्या दिवशी मिंत्रानसोबत बाहेर आऊटींगला जाण जमंत होत पण ते इथे फारस फारस जमंत नाही प्रत्येक शहराच्या वेगवेगळ्या पध्दती असतात त्यामुळे तिथल्या लाईफस्टाईल प्रमाणे जुळवूण घ्यावं लागतं.

५. फिटनेस साठी काय करतोस?

मुळात मी डायट वैगेरे करण्यावर जास्त विश्वास ठेवत नाही. मला जे आवडत आणि त्याचबरोबर जे हेल्दी आहे ते मी खातो. आणि आवडत फुड म्हंटल तर आईने बनवलेल्या सर्व प्रकारचे पदार्थ मला आवडतात. आणि व्यायाम बद्दल बोलयच झालं तर शुटींगमधून वेळ मिळेल तसा मी जिम मध्ये वर्कआऊट करतो. वर्कआऊटसाठी असं कोणतच फिक्स टाईमिंग नाही ठेवतं.

६. आवडती कार आणि मोबाईल कोणता?

मी कारचा फार शौकीन आहे. मला वाटत प्रत्येक यंगस्टरला त्यांच अ‍ॅटरॅक्शन असत तस मला ही कारंच फार अ‍ॅटरॅक्शन आहे.तशी मला होंडा सिटी आवडते आणि बाजारात नविन नविन मॉडेल येत असतातं त्यामुळे त्याबद्दल नेहमीच कुतूहल असतं. मोबाईलच्या संदर्भात बोलायच झालं तर मला मोबाईल मध्ये जास्त इंटरेस्ट नाहिये कॉलिंग आणि थोड्यफार गोष्टी मोबाईल वर मॅनेज करता आलं म्हणजे झालं कारची जेवढी क्रेझ आहे तेवढी मोबाईल संदर्भात नाही.

७. हिंदी चित्रपटाच्या काही ऑफर्स आहेत का?

सध्या माझा "हंटर" हा चित्रपट प्रदर्शित झालां आहे, त्याचबरोबर प्रकाश झा यांचा "लिपस्टीक" आणि संजय लिला भन्साली यांचा "बाजीराव मस्तानी" चित्रपट करत आहे. मुळात मराठी चित्रपटामध्ये बरीच सुधारणा झाली असल्यामुळे हिंदी मध्ये काम करण एंवढ वेगळ वाटंत नाही फक्त हिंदी मध्ये सर्व गोष्टी लार्ज कॅन्हव्हसवर केल्या जातात. त्यामुळे हिंदी आणि मराठी या दोन्हीमध्ये काम करण सारखंच वाटंत.

८. आवडता अभिनेता आणि ड्रिम रोल कोणता?

मला सर्वच अभिनेते आवडतात असाचं एक अभिनेता आवडतो असं काही नाहीये. आणि ड्रिम रोल म्हणाल तर आता मी खरी सुरवात केली आहे लोंकाना माझ्या चाहत्यांना आवडेत तो माझा ड्रिम असेल.

९. कॉफी आणि बरंच काही मध्यल्या तुझ्या रोल बद्दल काय सांगशिल?

या चित्रपटात मी निशादच कॅरेक्टर करत आहे. हा फार कमी कम्युनीकेट करतो त्यामुळे ब-यांचदा मनातल्या गोष्टी मनातच राहून जातात. आयुष्य खूप छोट आहे त्यामुळे तुंम्हांला दुस-या बद्दल काय वाटत हे मनात न ठेवत आपल्या फिलींग एक्सप्रेस करायला शिकवणार हे कॅरेक्टर आहे. आणि मी पण काहीसा निशाद सारखाच आहे कारण मी पण माझ्या फिंलींग लवकर एक्सप्रेस नाही करत.

-गायत्री तेली