Sign In New user? Start here.

Example of Category Blog layout (FAQs/General category)

छोटी गोष्ट कळाली डोळ्यांना पुसल्यावर

nishabda dev

सुधीर मुळीक

 

छोटी गोष्ट कळाली डोळ्यांना पुसल्यावर

छोटी गोष्ट कळाली डोळ्यांना पुसल्यावर .
की मन हलके होते थोडेसे रडल्यावर ..

सरळ चालणे मजला शिकविले कशाला तू
सदा अपघात होतो बघ रस्ता वळल्यावर..

प्रेमाचा काटा या हृदयाला रुततो बघ
गालाची खळी तुझ्या जरा कधी फुलल्यावर .

तू असतांना असतो, हरेक क्षण जागेवर
...आठवांचा पसारा होतो तू नसल्यावर .

सारया जवाबदारया,पार पाडेल मी,पण ..
आई खूप आठवते कधी शांत बसल्यावर.

- नि:शब्द(देव)