Sign In New user? Start here.

Example of Category Blog layout (FAQs/General category)

आसवांची याद

pramod kharade

प्रमोद खराडे
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
  .

 

कालची जी मैफलीला दाद होती
ती कुणाच्या आसवांची याद होती ?..

स्वर कसा कानी पडे इतका दयाळू
की फुलाची पाकळीला साद होती..

शोधतो तू काय लपण्याला निवारा
कोणती वस्ती इथे आबाद होती ?..

मी कुणाच्या सोबतीने गीत गावे ?
यावरी सा-याजणांचे वाद होती..

नेमके टाळून गेलो मी सुखाला
वेदनांची ही भली फिर्याद होती...

- प्रमोद खराडे, पुणे