Sign In New user? Start here.

Example of Category Blog layout (FAQs/General category)

"मन "

lata vinodमझ्या मनीचे रंग, मलाच नाही कळले
विचार करण्या आधीच, सारे रंग बदलून गेले
 

"मन "

मझ्या मनीचे रंग, मलाच नाही कळले
विचार करण्या आधीच, सारे रंग बदलून गेले

कधी सूर्य प्रकाश, तर कधी काळे ढग साचून यावे
ना वेळ अवेळ ह्याला, आठवणीत चींब भिजूनी जावे
वादळी पाऊस बरसती गारा, छप्परावरती ताल धरती
कासावीस जीव हा होई, मनातच अवती भवती
विचारांचे भोवरे, यशा अपयशाची चींता करिती

मुले, भावंडे, आप्तेष्ठ सारे आपुलेच असती
नित्य जीवनात जणू हे, रंगीत गोफ वीणीती
असता संगती एकमेका, विविध रंग उलगडती
गोड आशा, घोर निराशा, मनी चलबिचल करती
कसे असावे मन, की असावी जादूची पेटीच ती?

कधीही न समजलेले गूढ रहस्य हे
शोधून पाहू म्हणता, प्रयत्न फसलेले
रंगी बे रंगी छटांनी, नटले सजलेले
खळखळत्या झऱ्या सारखे, सतत वहात असलेले
धरून ठेऊ म्हणता, आधीच हातून निसटलेले

आनंदी, दुख्खी, कधी खट्याळ हे मन असत
न दिसताही, आपुल्यावर वर्चस्व करणारं असत
ना रंग, ना वांस, सारा एक आभास असत
घटकेत एका, कधीच गवसणारं नसत
"हे सारे मनाचे खेळ", म्हणत फसवणारं असत

- लता विनोद

----------------------------------------