Sign In New user? Start here.

Example of Category Blog layout (FAQs/General category)

जातो जवळ फ़ुलाच्या तो गुदमरून येतो

nishabda dev

सुधीर मुळीक

.

 

Jato javal fulachya to gudamarun yeto

जातो जवळ फ़ुलाच्या तो गुदमरून येतो
तितकाच गंध घ्यावा जितका दुरून येतो !..

चुकलाय पतझडीचा येथे ऋतू कुणाला ?
गुलमोहरा कशाला तू मोहरून येतो ?..

बरसेल या इथेही द्यावा कुणी भरोसा ?
आधीच पावसाळा दुनिया फ़िरून येतो !..

वाया तुझा तरी मी का घालवू तडाखा
तू थांब वादळा मी घर आवरून येतो !..

प्रत्येक काळजाच्या असते मुळात आळे
माणूस सांत्वनाला डोळे भरून येतो !..

त्याच्याच वेदनांचे निर्माल्य तू करावे
जो ओंजळीत अश्रू गोळा करून येतो !..

इतकी महाग झाली आहे इथे प्रतिष्ठा ?
बदल्यात आज जो तो निष्ठा हरून येतो !..

येते इथे कवीच्या तेव्हां खिशात कविता
प्रत्येक शब्द जेव्हां कॉलर धरून येतो !..

- सुधीर मुळीक