Sign In New user? Start here.

तिने दिलेल्या संस्कारांची शिदोरी

काही चुकल तर प्रसंगी कान पकडणारी तर कधी आधार देणारी, सुख-दुखांच्या वादळात हेलकावे घेणाऱ्या आपल्या मुलांसाठी मार्गदर्शनाचा दीपस्तंभ बनणारी,जिच्या पायांना स्पर्श करताच असंख्य अपराधांच प्रायश्चित्त मिळाव आणि जिच्या केवळ स्मरणान संपूर्ण आयुष्याच सार्थक व्हावे अशी कारुण्यमूर्ती म्हणजे 'आई'.....आपल्या अस्तिवाचा उगम म्हणजे आई ...

'जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी' अस मानणारी आपली संस्कृती आहे. पाश्चात्य देशात आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे.आपल्याकडे मातृदिनाचे फारसे कौतुक नाही परंतू तेथे 'मदर्स डे' हा एक विशेष दिन म्हणून साजरा केला जातो. आपला प्रत्येक दिवस आईपासुनच सुरु होतो आणि तिच्यापशीच संपतो त्यामुळे त्या सहवासात श्रीमंत झालेला प्रत्येक क्षण हा सेलिब्रेशनच असतो मातृत्वाचा !!!!!! स्त्रीच्या अस्तित्वाला एकाच वेळी बहिन,मुलगी,पत्नी,सुन,माता असे वेगवेगळे पैलू असतात त्यामुळे घराचा अविभाज्य भाग झालेली तिची प्रत्येक कृती हे तिचे 'कर्त्तव्य' म्हणून आपण सोडून देतो पण तिच्याच त्यागावर आपले घर उभे राहते हे आपण सोइस्कररित्या विसरतो. त्याग आणि वात्सल्य यांच्या संगमातून तयार झालेली 'आई' ही फार चमत्कारिक संकल्पना आहे. स्त्री ही क्षणकाळाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे हे काही खोटे नाही म्हणुनच तिने दिलेल्या संस्कारांची शिदोरी कायम आपल्या सोबत राहते. संस्करातुन मन घडवताना ती आपल्या मुलांची मनगटही बळगट करते.एक सामान्य बालकातून असामान्य व्यक्तिमत्व घडवण्याची किमया फक्त आईच करू शकते. जिजामातेने स्वतः कधीच हाती तलवार धरली नव्हती पण त्याच तलवारीच्या परक्रमाने स्वराज्य उभे करणारे हात तिने घडवले. हा देश जितका कर्तृत्ववान महापुरुषांसाठी ओळखला जातो त्याही आदि हा या महापुरुषांना घडवणाऱ्या जिजाऊ, सुभद्रा आणि देवकीसारख्या मातांचा आहे.

आई मुलावर केलेल्या उपकरांचा हिशेब कधीच ठेवत नाही आणि कित्येक जन्म घेतले तरी त्या उपकारातुन आपण ऋणमुक्त होण कदापि शक्य नाही पण कामाच्या आणि धकाधकीच्या जीवनात मुलच तिच्या उपकारांची जाणीव ठेवत नाहीत,ही दुर्देवी बाब आहे. आजच्या २१व्या शतकात सुभद्रा आहे पण अभिमन्यु नाहीत,जिजाऊ आहेत पण शिवबा नाही.श्रावणबाळ आणि पुंडलिक तर आता केवळ पुराणातच वाचावित हीच ह्या शतकाची शोकांतिका आहे. सत्ता,संपत्ति हे सारे आईच्या मायेपुढे कवडीमोल आहे, म्हणुनच म्हणतात - ' स्वामी तिन्ही जगाचा आइविना भिकारी' म्हणुनच ह्या मातृदिनी महागड्या गिफ्ट्स ऐवजी व्यस्त कामातून थोडा वेळ काढून आइबरोबर बसून चार प्रेमाचे शब्द बोला आणि पहा काय जादू होते ती ..........

- दीपाली नेवरेकर 

cssmothersday