Sign In New user? Start here.

 

बरेच लोकं म्हणतात की, आई बद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी एकच दिवस कशाला पाहिजे..? पण मला वाटतं की, आजकाल प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात इअका गुरफटलेला आहे की, त्याला क्षणभराचीही उसंत नाही. म्हणूनच मदर्स डे साजरा केला जातो. ' To make every mom feel special' आणि मदर्स डे ची ही संधी आणि या दिवसाचे औचित साधून मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते. सहा महिन्यांपूर्वी दुर्दैवाने माझा अपघात झाला होता. हॉस्पिटल मधून बाहेर पडल्यावर साधारण दोन महिने मला कम्प्लिट रेस्ट घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. त्यामुळे मी दोन महिने घरीच होतो. या अपघातामुळे माझं खुप मानसिक आणि शारिरीक खच्चीकरण झाल्याने खुप चिडचिड व्हायची. प्रचंड वेदना मला सहन कराव्या लागल्या होत्या. अशात एकच आधार मला महत्वाचा वाटत होता. तो म्हणजे आईचा...!

या दोन महिन्यात मला मानसिक आधार देणारी आईच होती. भररात्री माझं काही दुखले तर तर तेवढ्या रात्री झोपेतून उठून iodex लावणारी आईच होती. हाच प्रसंग नाही तर आयुष्यातला प्रत्येक कठीण प्रसंगी ती मागे उभी राहिली. आईचे केवळ दोन शब्द जग जिंकण्याचे सामर्थ्य देऊन जायचे. पण या दोन महिन्यात एका गोष्टीची चांगलीच जाणिव झाली की, मुले कितीही मोठी झाली तरी, आईसाठी ती लहानच असतात. झगमगच्या रूपाने मला माझ्या भावनांना वाट मिळाली, त्याबद्दल आभार...!

ज्ञानेश रेगे 

cssmothersday