Sign In New user? Start here.

मदर्स डे हि संकल्पना मला फारशी पटत नाही.

मदर्स डे/मातृ दिन हि संकल्पना मला फारशी पटत नाही. खर तर आपल्या आई बद्दल आपुलकी, प्रेम व्यक्त करण्यासाठी एक जन्म पण पुरेसा होणार नाही, पण कसंय इंग्रज जे जे करतील त्याच डोळे झाकून अनुकरण करण्याची आपल्याला जुनी सवय आहे. असो. मला आनंद एकाच गोष्टीचा आहे, कि ह्या सगळ्याच्या निमित्ताने मला माझ्या आई बद्दल चार ओळी लिहिण्याची संधी मिळाली. जशी समज आली तसा घरा बाहेर पडलोय शिकण्यासाठी नंतर नोकरी साठी, पण खरी समज तर घरापासून, आई - वडिलां पासून लांब आल्यावरच आलीये. शाळेत मार्क्स मिळावेत म्हणून घोकून पाठ केलेल्या कवितेचा खरा अर्थ आज कळतोय,

आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी
समईतली जागा.

आई असते एक शिदोरी
सरतही नाही अन उरतही नाही.

आपणा सर्वांना मातृ दिनाच्या शुभेच्छा, आणि आई ला साष्टांग नमस्कार..!


प्रशांत काडके 

cssmothersday